lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fashion > ऑफीस लूक परफेक्ट असावा तर लक्षात ठेवा ५ गोष्टी, प्रोफेशनल लूकमध्ये दिसा स्मार्ट

ऑफीस लूक परफेक्ट असावा तर लक्षात ठेवा ५ गोष्टी, प्रोफेशनल लूकमध्ये दिसा स्मार्ट

How to avoid fashion mistakes which are unprofessional : प्रसिद्ध फॅशन एक्सपर्ट शिल्पा तोलानी देतात महत्त्वाच्या टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2024 06:13 PM2024-02-14T18:13:35+5:302024-02-14T18:15:56+5:30

How to avoid fashion mistakes which are unprofessional : प्रसिद्ध फॅशन एक्सपर्ट शिल्पा तोलानी देतात महत्त्वाच्या टिप्स...

How to avoid fashion mistakes which are unprofessional : If office look is to be perfect then remember 5 things, look smart in professional look | ऑफीस लूक परफेक्ट असावा तर लक्षात ठेवा ५ गोष्टी, प्रोफेशनल लूकमध्ये दिसा स्मार्ट

ऑफीस लूक परफेक्ट असावा तर लक्षात ठेवा ५ गोष्टी, प्रोफेशनल लूकमध्ये दिसा स्मार्ट

आपण कायम प्रेझेंटेबल असलो तर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडतो. विशिष्ट कार्यक्रमाला अनुसरुन आपले कपडे आणि राहणी असेल तर व्यक्तिमत्त्व खुलून येण्यास मदत होते. त्यासाठी आपल्याला फॅशनबाबत आणि राहणीमानाबाबत किमान ज्ञान असणे आवश्यक असते. अन्यथा आपण सगळ्यांमध्ये गबाळे दिसण्याचीच शक्यता जास्त असते. एरवी एकवेळ ठिक आहे पण ऑफीसमध्ये आपले प्रोफशनल रिलेशन्स असल्याने त्याठिकाणी आपण आपले पद, कामाची आवश्यकता आणि आजुबाजूचे वातावरण यांना साजेसा पेहराव करावा. तरच आपण सगळ्यांमध्ये उठून दिसू शकतो (How to avoid fashion mistakes which are unprofessional).

पण याबाबत आपण पुरेशी काळजी घेतली नाही तर मात्र आपल्याकडे पद आणि अधिकार असूनही अनेकदा आपल्याला दुय्यम स्थान दिले जाण्याची शक्यता असते. ऑफीसला जाताना प्रोफेशनल लूक कॅरी करायचा असेल तर फॅशनच्या बाबतीतल्या काही गोष्टींची आपल्याला पुरेशी माहिती असायला हवी. या गोष्टी नेमक्या कोणत्या याबाबत प्रसिद्ध फॅशन एक्सपर्ट शिल्पा तोलानी महत्त्वाच्या टिप्स देतात, त्या कोणत्या पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

१. रंगांची निवड

ऑफिससाठी शक्यतो खूप गडद रंगांचे कपडे वापरू नयेत. त्या ऐवजी थोडे शांत, गडद असतील तरी काळा, चॉकलेटी, करडा, राखाडी असे रंग जास्त चांगले वाटतात. याशिवाय पांढरा, ऑफ व्हाईट, पेस्टल शेडही ऑफिस वेअरसाठी चांगले दिसतात. .

२. शर्ट निवड करताना

ऑफिसला प्रोफेशनल वेअर म्हणून आपण बरेचदा फॉर्मल शर्ट घालणे पसंत करतो. काही वेळा आपला ब्लेझर, कुर्ता यांनाही बटणे असतात. पण ही बटणे जास्त घट्ट असतील आणि ती समोरून ताण दिसत असतील तर ते अजिबात चांगले दिसत नाही. 

३. ज्वेलरी निवडताना 

खूप लोंबणारी, आवाज होईल अशी ज्वेलरी ऑफिससाठी न वापरता सिंपल आणि सोबर अशी ज्वेलरी घालायला हवी. कानातले, ब्रेसलेट यांची निवड करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. 


४. नखं 

अनेक मुलींना लांब नखे आवडतात. म्हणून त्या एकतर नखं वाढवतात आणि त्यांना शेप देतात किंवा पार्लरमध्ये जाऊन नेल आर्ट करून येतात. पण अशी खूप मोठी नखं प्रोफेशनली चांगली दिसत नाहीत त्यामुळे ती योग्य पद्धतीने कापलेली असावीत

५. बॅग बाबत

फिरायला जाताना किंवा खरेदीला जाताना मोठ्या आकाराच्या, मोठ्या प्रिंट असलेल्या बॅग घेतल्या तर ठीक आहे. पण ऑफिससाठी मात्र मध्यम आकाराची शक्यतो प्रिंट नसलेली अशी बॅग वापरायला हवी. तुम्ही कॅरी करत असलेली बॅगही तुमच्या प्रोफेशनल लुकमध्ये भर घालते. त्यामुळे एकूण लूकचा विचार करताना बॅगचाही विचार करायला हवा. 
 

Web Title: How to avoid fashion mistakes which are unprofessional : If office look is to be perfect then remember 5 things, look smart in professional look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.