प्रियांका चोप्रा ही एक फॅशन आयकॉन आहे. प्रियांका वेस्टर्नमध्येही सुंदर दिसते आणि देसी लूकमध्येही. सध्या सगळीकडे चर्चा आहे ती तिच्या Globetrotter या इव्डेंटमधील लेहेंग्याची. अनामिका खन्ना हिने डिझाइन केलेला हा पांढराशुभ्र लेहेंगा फारच लोकप्रिय ठरला. तसेच त्यावर प्रियांकाने घातलेले दागिने आणखी आकर्षक ठरले. (Hot jewelry, Priyanka Chopra wore it and the discussion of Indian waist belt started all over the world)त्यात तिने कंबरपट्टाही घातला होता. सध्या २०२५ मधील सगळ्यात हॉट दागिना म्हणून प्रियांकाच्या कंबरपट्ट्याला संबोधले जात आहे. मध्यंतरी जान्हवी कपूर, खुशी कपूर आदी अभिनेत्री कंबरपट्टा बांधताना अनेकदा दिसतात. पूर्वी माधुरी दिक्षित, रेखा, श्रीदेवी यांच्या पेहरावात कंबरपट्टा कायम दिसायचा. नृत्यांगनांसाठी हा एक खास अलंकार आहे. कंबरपट्ट्याला भारतीय पोशाखात एक विशिष्ट स्थान आहे.
मुळात हा दागिना वर्षानुवर्षे भारतात वापरला जात आहे. कंबरपट्टा वापरण्याचे प्रमाण आता अगदी कमी झाले आहे. मात्र हा दागिना अत्यंत सुंदर दिसतो. साडी, लेहेंगा, घागरा आदी विविध प्रकारच्या कपड्यांवर तो उठून दिसतो. विविध संस्कृतींमध्ये विविध प्रकारचे कंबरपट्टे वापरले जातात. जाड - बारीक, गोरी - सावळी काहीही असो हा दागिना सगळ्यांचेच सौंदर्य वाढवतो. महिलांच्या अंगकाठीला हा दागिना उठाव देतो. प्राचीन काळातील शिल्पांवरही कंबरपट्टा असल्याचे आढळते. फक्त सौंदर्य वाढवण्यासाठी नाही तर साडीला किंवा ड्रेसला सावरण्यासाठी आकारात छान बांधण्यासाठी कंबरपट्टा उपयोगी ठरतो. पूर्वी सोन्या - चांदीचे कंबरपट्टे असायचे. मात्र अता मोती, क्रिस्टल, स्टोन्स ,साखळी, वेस्टर्न बेल्ट्स असे विविध प्रकार असतात.
आजकाल आता कंबरपट्टा फक्त साडी, लेहेंग्यासाठी नाही तर विविध प्रकारे फॅसन करण्यासाठी वापरता येतो. त्यात अनेक प्रकार आहेत. फक्त भारतातच नाही तर इतरही देशांत आता फॅशन आयकॉन्स कंबरपट्टा वापरताना दिसतात. पारंपरिक पट्ट्याला जरा ट्विस्ट देऊन त्याचा मॉडर्न स्टाइलिंगमध्ये वापर केला जात आहे. मात्र तरीही कंबरेच्या जवळ छान नाजूक असा पारंपरिक कंबरपट्टा बांधल्यावर रुप काही औरच दिसते.
Web Summary : Priyanka Chopra's lehenga and waist belt at a recent event sparked global interest. The Indian waist belt, once worn by actresses like Madhuri Dixit, is now a trending accessory, adding beauty and shape to various outfits. Modern styling incorporates traditional designs.
Web Summary : प्रियंका चोपड़ा के एक हालिया कार्यक्रम में लहंगे और कमरबंद ने वैश्विक रुचि जगाई। भारतीय कमरबंद, जिसे कभी माधुरी दीक्षित जैसी अभिनेत्रियों ने पहना था, अब एक ट्रेंडिंग एक्सेसरी है, जो विभिन्न परिधानों में सुंदरता और आकार जोड़ता है। आधुनिक स्टाइलिंग में पारंपरिक डिजाइनों को शामिल किया गया है।