Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fashion > दिवाळीत फोटो काढताना द्या सेलब्रिटी पोझ, सई ते प्राजक्ता बघा त्यांची स्टाइल

दिवाळीत फोटो काढताना द्या सेलब्रिटी पोझ, सई ते प्राजक्ता बघा त्यांची स्टाइल

Diwali Poses Celibrity दिवाळीत पारंपारिक पोशाक परिधान करताय, फोटोसाठी तेच तेच पोझ देऊन कंटाळलात, पहा या अभिनेत्रींचे खास पोझ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2022 17:50 IST2022-10-23T17:26:01+5:302022-10-23T17:50:11+5:30

Diwali Poses Celibrity दिवाळीत पारंपारिक पोशाक परिधान करताय, फोटोसाठी तेच तेच पोझ देऊन कंटाळलात, पहा या अभिनेत्रींचे खास पोझ 

Give celebrity poses while taking photos on Diwali | दिवाळीत फोटो काढताना द्या सेलब्रिटी पोझ, सई ते प्राजक्ता बघा त्यांची स्टाइल

दिवाळीत फोटो काढताना द्या सेलब्रिटी पोझ, सई ते प्राजक्ता बघा त्यांची स्टाइल

ir="ltr">झगमगत्या दिवाळी या सणानिमित्त महिलावर्गामध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. घराची सजावट, फराळ, मिठाई ते स्वतःला ट्रेंडनुसार बदलणारी ती महिला दिवाळीत सर्वात स्पेशल दिसण्यासाठी देखील खटाटोप करताना दिसून येते. या दिवाळीनिमित्त काही विशेष अभिनेत्रींकडून पारंपारिक पोशाकात खास आणि हटके पोझ कसे द्यायचे याची आयडिया मिळवा. आणि वर्षभर वापरता येतील असे सुंदर आणि मनमोहक फोटोंचा संच जमवा.

सई ताम्हणकर

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या नावाचा डंका गाजवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या पारंपारिकसह माॅर्डन लुकसाठी नेहमी चर्चेत असते. तिचा पारंपारिक नऊवारी लुक साकारून अश्या पोझमधील फोटो आपण क्लिक करू शकता.

अमृता खानविलकर

मराठी सिनेसृष्टीची चंद्रा अर्थात अमृता खानविलकरचा सिंपल परंतु, मनमोहक लुक सोशल मिडीयावर प्रचंड चर्चेत आला होता. अश्या सिंपल साडीमधील लुक आपण साकारू शकता.

हृता दुर्गुळे

महाराष्ट्राची क्रश म्हणजेच हृता दुर्गुळेची पारंपारिकसह माॅर्डन लुकचं कौतुक सोशल मिडीयावर होतंच असतं. या दिवाळीनिमित्त हा पारंपारिक लुक साकारून असे पोझ देऊ शकता.

सोनाली कुलकर्णी

महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी नेहमी आपल्या मनमोहक अदांनी नेटकऱ्यांना घायाळ करण्यास यशस्वी ठरली आहे. तिचा हा घायाळ करणारा लुक आणि हा पोझ आपण ट्राय करू शकता.

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळीचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. तिच्या लूकचे बरेच चाहते दिवाने आहेत. काठापदराच्या साडीवर तिने गजरा माळला आहे. साडी आणि हेअरस्टाईल दर्शवण्यासाठी तुम्ही हा लुक साकारून पोझ देऊ शकता. 

Web Title: Give celebrity poses while taking photos on Diwali

टॅग्स :fashionDiwaliफॅशनदिवाळी 2022