Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fashion > ओटीपोट फारच मोठे दिसते? सुटलेले ओटीपोट लपवण्यासाठी.. वापरा 'या' ट्रिक्स, पोट दिसेल नाजूक - सुंदर

ओटीपोट फारच मोठे दिसते? सुटलेले ओटीपोट लपवण्यासाठी.. वापरा 'या' ट्रिक्स, पोट दिसेल नाजूक - सुंदर

Does your belly look too big? To hide it use these tricks, your belly will look beautiful : ओटीपोट वाढल्यामुळे काय कपडे घालावेत असा प्रश्न पडत असेल तर पाहा कसे लपवावे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2025 16:37 IST2025-12-29T16:35:55+5:302025-12-29T16:37:12+5:30

Does your belly look too big? To hide it use these tricks, your belly will look beautiful : ओटीपोट वाढल्यामुळे काय कपडे घालावेत असा प्रश्न पडत असेल तर पाहा कसे लपवावे.

Does your belly look too big? To hide it use these tricks, your belly will look beautiful | ओटीपोट फारच मोठे दिसते? सुटलेले ओटीपोट लपवण्यासाठी.. वापरा 'या' ट्रिक्स, पोट दिसेल नाजूक - सुंदर

ओटीपोट फारच मोठे दिसते? सुटलेले ओटीपोट लपवण्यासाठी.. वापरा 'या' ट्रिक्स, पोट दिसेल नाजूक - सुंदर

ओटीपोट थुलथुलीत दिसणे ही अनेकांची सामान्य तक्रार असते. वजन फार वाढलेले नसतानाही पोटाचा भाग जास्त उठून दिसतो आणि त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. पोटाचा भाग जरा विचित्र दिसतो. खास म्हणजे मुलींचे ओटीपोट. (Does your belly look too big? To hide it use these tricks, your belly will look beautiful)हार्मोन्स, मासिक पाळी आणि इतरही अनेक कारणांमुळे फक्त ओटीपोट फुगीर दिसायला लागते. ते अगदी नैसर्गिक आहे. काही साध्या सवयी आणि योग्य कपड्यांची निवड केली तर ओटीपोट कमी उठून दिसते आणि शरीराचा आकार अधिक सुंदर वाटू शकतो.

ओटीपोट जास्त दिसण्यामागे चुकीची बसण्याची पद्धत, सतत बसून राहणे, अपचन, वायू, बद्धकोष्ठता किंवा चुकीची खाण्याची वेळ अशी अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे सर्वात आधी शरीराची ठेवण सुधारणे गरजेचे आहे. उभे राहतानाही आणि बसतानाही पाठ सरळ ठेवणे, खांदे सैल ठेवणे आणि पोट आत घेतलेले नसले तरी सैल सोडलेले न ठेवणे यामुळे पोटाचा आकार कमी जाणवतो. नियमित चालणे, हलका व्यायाम आणि पचन सुधारा. या सवयी ओटीपोटावरची सूज आणि फुगवटा कमी होण्यास मदत करतात.

कपड्यांची निवड ओटीपोट कमी दिसण्यासाठी फार महत्त्वाची ठरते. फार घट्ट कपडे टाळावेत, विशेषतः पोटाच्या भागावर घट्ट बसणारे टॉप्स, कुर्ते किंवा पँट. सैल पण योग्य फिट असलेले कपडे शरीराला अधिक सडपातळ दाखवतात. सरळ कटचे कुर्ते, ए-लाइन ड्रेसेस, थोडे लांब टॉप्स किंवा स्ट्रेट पँट्स ओटीपोट झाकण्यास मदत करतात. तसेच पँट वेस्ट कव्हर असणारी वापरा. कंबर जास्त खाली किंवा फार वर असलेले कपडे टाळून मध्यम उंचीची कंबर असलेले कपडे निवडावेत.

रंग आणि डिझाइनचाही मोठा फरक पडतो. गडद आणि एकसंध रंग शरीराला सुट करतात तर फार मोठे प्रिंट्स किंवा पोटाच्या भागावर आडव्या रेषा असलेले डिझाइन पोट जास्त वाढवून दाखवतात. उभ्या रेषा, साधे प्रिंट्स किंवा थोडे फ्लोई फॅब्रिक असलेले कपडे अधिक योग्य ठरतात. जाड आणि कडक कापडाऐवजी हलके कापड वापरल्यास पोटावर घट्ट बसत नाही आणि फुगवटा कमी जाणवतो. तसेच अगदी फिके रंग वापरणे टाळा. 

कपड्यांमध्ये पोट जास्त वाटू नये यासाठी आतले कपडेही महत्त्वाचे असतात. योग्य साईजचे, आरामदायक इनरवेअर वापरल्यास शरीराचा आकार नीट दिसतो. फार घट्ट किंवा चुकीच्या मापाचे इनरवेअर पोटाला अधिक दाखवतात. कधी कधी हलके शेपवेअरही उपयोगी ठरते, पण त्याचा अतिवापर टाळावा.

Web Title : बड़ा पेट छुपाएं: स्लिम दिखने के आसान उपाय

Web Summary : पेट फूलना आम है। मुद्रा सुधारें, व्यायाम करें और पाचन ठीक रखें। सही कपड़े चुनें: तंग कपड़े न पहनें, ए-लाइन ड्रेस या सीधी पैंट चुनें। गहरे रंग, ऊर्ध्वाधर धारियां और हल्के कपड़े पेट को कम दिखाने में मदद करते हैं। सही इनरवियर भी ज़रूरी है।

Web Title : Hide a Big Belly: Tricks for a Slimmer Look

Web Summary : Bloating is common. Improve posture, exercise, and digestion. Choose clothes wisely: avoid tight fits, opt for A-line dresses or straight pants. Dark colors, vertical stripes, and light fabrics help minimize belly appearance. Proper innerwear is also important.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.