Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Day 2026 : कपाळी शोभते चंद्रकोर- अभिमान मराठी बाणा! स्वराज्याच्या स्वाभिमानाचे पारंपरिक प्रतीक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2026 09:40 IST

Maharashtra Day 2026: मराठी स्त्रियांची ओळख सांगणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यापैकी एक आहे चंद्रकोर टिकली...(types of chandrakor bindi)

दिवाळी असो,  पाडवा असो किंवा घरात एखादं लग्नकार्य असो... ज्या ज्या वेळी मराठी स्त्री पारंपरिक वेशभुषा करते, छान नऊवारी साडीन नेसून अंगभर दागिने घालते किंवा पैठणी, शालू नेसून छान सजून धजून तयार होते तेव्हा तिच्या कपाळावर हमखास चमकते ती मराठमोळी चंद्रकाेर... नाकात नथ, गळ्यात ठुशी ही जशी मराठी महिलांची ओळख आहे तशीच तिची आणखी एक ओळख म्हणजे कपाळावरची चंद्रकोर.. ज्या महिलेच्या कपाळावर चंद्रकोर असेल तिला ती मराठी असल्याची वेगळी ओळख द्यावीच लागत नाही (types of chandrakor bindi). अशी ही चंद्रकोर दरवेळी महिलांचं सौंदर्य खुलविणारी ठरते...(Chandrakor Tikali Tradition)

 

साधारणपणे असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांच्या काळपासून कपाळावर चंद्रकोर लावली जाते. त्या काळात फक्त महिलाच नाही तर पुरुषही कपाळावर चंद्रकोर लावायचे. तांब्याचे एक खास साधन त्यासाठी मिळायचे. ते ओल्या कुंकवामध्ये बुडवून चंद्रकोर रेखली जायची. म्हणूनच तर शिवाजी महाराजांच्या काही प्रतिमांमध्येही त्यांच्या कपाळावर चंद्रकोर दिसते. पुर्वी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांच्याच कपाळावर अभिमानाने मिरविणारी चंद्रकोर आजही मराठी महिलांचे सौंदर्य खुलवत आहे. काही अभ्यासकांच्या मते चंद्रकोर ही शिव महादेवाचं प्रतिकही मानली जाते.

 

आजही शहरातल्या स्थानिक बाजारपेठांमध्ये तांब्याचा चंद्रकोरीच्या आकाराचा एक छापा मिळतो. तो वापरून चंदनाने किंवा कुंकवाने कपाळावर चंद्रकोर रेखाटली जाते. अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये या पद्धतीने चंद्रकोर काढतात. आता तर चंद्रकोर आकाराच्या टिकल्यांचे कित्येक वेगवेगळे प्रकार मिळतात. अगदी लहान आकारापासून उपलब्ध आहेत. त्यांना खडे, मोती लावून सजवलेलंही दिसतं. ही चंद्रकोर म्हणजे मराठी महिलांची शान होती आणि नेहमीच राहील...

 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Day: The Chandrakor Bindi, Pride of Marathi Women

Web Summary : The Chandrakor bindi, a crescent-shaped mark, symbolizes Marathi women's identity and beauty. Historically worn by both men and women since Shivaji Maharaj's era, it's now a cherished emblem of Maharashtrian culture, adorning women during festivals and celebrations.
टॅग्स :फॅशनस्टायलिंग टिप्समहाराष्ट्र