Lokmat Sakhi >Fashion > कॉटनची जुनीच साडी नेसून कान्समध्ये गेलेल्या रत्ना पाठकच्या 'देसी लूक'ने वेधले लक्ष, काय त्याचं कारण?

कॉटनची जुनीच साडी नेसून कान्समध्ये गेलेल्या रत्ना पाठकच्या 'देसी लूक'ने वेधले लक्ष, काय त्याचं कारण?

Cannes 2024: ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी कान्स महोत्सवासाठी केलेल्या देसी लूकची जबरदस्त चर्चा होत आहे... (Ratna Pathak Shah's desi look in cotton saree and handmade himroo blouse)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2024 01:12 PM2024-05-21T13:12:07+5:302024-05-21T15:02:24+5:30

Cannes 2024: ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी कान्स महोत्सवासाठी केलेल्या देसी लूकची जबरदस्त चर्चा होत आहे... (Ratna Pathak Shah's desi look in cotton saree and handmade himroo blouse)

cannes 2024: Ratna pathak shah's desi look in cotton saree and handmade himroo blouse attracts everyone | कॉटनची जुनीच साडी नेसून कान्समध्ये गेलेल्या रत्ना पाठकच्या 'देसी लूक'ने वेधले लक्ष, काय त्याचं कारण?

कॉटनची जुनीच साडी नेसून कान्समध्ये गेलेल्या रत्ना पाठकच्या 'देसी लूक'ने वेधले लक्ष, काय त्याचं कारण?

Highlightsत्यांचा साडीमधला लूक चाहत्यांना खूप आवडला असून कान्समध्ये जाण्यासाठी त्यांनी भारतीय पेहरावाची निवड केली, यामुळे त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

फॅशन जगतातले जे काही मोठे, भव्य सोहळे होत असतात, त्यापैकी एक सोहळा म्हणजे कान्स महोत्सव (cannes 2024). या महाेत्सवाची आणि त्यामध्ये सहभागी झालेल्या सेलिब्रिटींच्या फॅशनची जबरदस्त चर्चा सध्या सगळ्या जगभरातच सुरू आहे. कारण हा एक अतिशय प्रतिष्ठित आणि मानाचा सोहळा मानला जातो. आपल्याकडेही ऐश्वर्या राय, कियारा आडवाणी यांच्या लूक्सची, त्यांच्या स्टाईलची खूप चर्चा झाली. पण त्यानंतर मात्र सगळे लक्ष वेधून घेतले ते ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांच्या देसी लूक ने. त्यांचा साडीमधला लूक चाहत्यांना खूप आवडला असून कान्समध्ये जाण्यासाठी त्यांनी भारतीय पेहरावाची निवड केली, यामुळे त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. (Ratna pathak shah's desi look in cotton saree and handmade himroo blouse)

 

शाम बेनेगल यांच्या 'मंथन' या चित्रपटाचा स्क्रिनिंग साेहळा कान्स येथे आयोजित करण्यात आला हाेता. त्यानिमित्ताने चित्रपटातील प्रमुख कलावंत रत्ना पाठक शाह, प्रतिक बब्बर यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. या स्क्रिनिंग साेहळ्यासाठी येताना रत्ना यांनी हिरवट- पिवळ्या रंगाची कॉटन साडी नेसली होती.

मनासारखं न झाल्यास मुलं रडून गोंधळ घालतात- चिडचिड करतात? ३ टिप्स- मुलं होतील शांत, समजूतदार

कान्समध्ये येण्यासाठी सेलिब्रिटी जे आऊटफिट्स घालतात ते अनेक बड्या फॅशन डिझायनरनी डिझाईन केलेले असतात. पण री-सेरेमोनियल या ब्रॅण्डने एक्स्प्रेस ग्रुपला दिलेल्या माहितीनुसार मात्र रत्ना यांनी स्वत: डिझाईन केलेली साडी नेसली होती.

पोटातून सारखा गुडगुड आवाज येतो? तज्ज्ञ सांगतात त्यामागची कारणं, आवाजाकडे दुर्लक्ष नकोच कारण....

तसेच या साडीचा रंग पानांच्या हिरव्या रंगापासून पुर्णपणे नैसर्गिक प्रक्रियेतून तयार करण्यात आला होता. ही साडी यापुर्वीही त्यांनी काही वेळा नेसली आहे. पण यावेळी त्यांनी तीच साडी खूप वेगळ्या पद्धतीने नेसली होती. साडीचा पदर ओढणीप्रमाणे गळ्याला लपेटून घेतला होता. 

 

या साडीवर त्यांनी हिमरू ब्लाऊज घातले होते. ब्लाऊज आणि जॅकेट असं युनिक कॉम्बिनेशन असलेलं ते फिकट गुलाबी रंगाचं ब्लाऊज अतिशय लक्षवेधी ठरलं.

त्वचा सुंदर- ग्लोईंग होण्यासाठी फेसमास्कची निवड परफेक्ट हवी, बघा त्वचेनुसार कसा निवडावा फेसपॅक

तसेच साडी- ब्लाऊजवर मॅच करण्यासाठी त्यांनी ऑक्सिडाईज दागिन्यांची निवड केली होती. ठसठशीत गळ्यातलं, कानात झुमके, अंगठी आणि हातात कडे असा त्यांचा एकंदरीत लूक होता. या लूकमध्ये त्या जेव्हा पती नसरुद्दीन शाह यांच्यासोबत कान्सच्या रेड कार्पेटवर आल्या तेव्हा सगळ्यांच्याच नजरा त्यांच्याकडे वळाल्या.


 

Web Title: cannes 2024: Ratna pathak shah's desi look in cotton saree and handmade himroo blouse attracts everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.