Join us

Anant- Radhika Wedding: अन्नसेवा कार्यक्रमात राधिका मर्चंटने घातलेल्या गुलाबी कुर्त्याची बघा खासियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2024 16:17 IST

Anant Ambani Radhika Merchant Wedding: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या होणाऱ्या सुनबाईंनी म्हणजेच राधिका मर्चंट हिने अन्नसेवा कार्यक्रमात घातलेला कुर्ता अनेकांना खूपच आवडून गेला.

ठळक मुद्देअतिशय गोड चेहऱ्याची आणि लाघवी हास्य असणारी राधिका देखणी तर आहेच. पण ती ज्या पद्धतीने स्वत:ला कॅरी करते, त्यामुळे तिचे सौंदर्य खुलून येते.

अख्ख्या भारतात सध्या अंबानी कुटूंबात होणाऱ्या विवाह साेहळ्याची चर्चा आहे. उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा सगळ्यात धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा विवाह सोहळा लवकरच गुजरातमधील जामनगर येथे होत आहे (Anant Ambani- Radhika Merchant wedding). विवाहापुर्वीच्या कार्यक्रमांना तसेच विधींनी सुरुवात झाली असून अंबानी परिवारातर्फे नुकतेच अन्नसेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अनंत अंबानी अणि राधिका मर्चंट यांच्या हस्ते गरीबांना अन्नदान करण्यात आले. यावेळी राधिकाने घातलेला ड्रेस लक्षवेधी ठरला.  (Radhika's pink kurta patiyala in Anna seva program was stunning and beautiful)

 

राधिका मर्चंट हिची स्टाईल आणि फॅशन सेन्स यांची नेहमीच चर्चा होते. अतिशय गोड चेहऱ्याची आणि लाघवी हास्य असणारी राधिका देखणी तर आहेच. पण ती ज्या पद्धतीने स्वत:ला कॅरी करते, त्यामुळे तिचे सौंदर्य खुलून येते.

रोज रात्री 'हा' पांढरा पदार्थ कणभर खा, ॲसिडिटी- पायांतले क्रॅम्प्स असे बरेच त्रास होतील छुमंतर...

तिच्या याच वैशिष्ट्यामुळे तिने अन्नसेवा कार्यक्रमातही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमासाठी तिने जो कुर्ता- पटियाला घातला होता, तो सब्यासाची यांच्या 'Heritage Bridal' या कलेक्शनमधला होता. गुलाबी रंगाच्या त्या शॉर्ट कुर्त्यावर पुढच्या बाजुने गळ्याच्या भोवती आणि खालच्या काठांवर तसेच बाह्यांवर गोटा पट्टी वर्क करण्यात आले होते. तसेच त्या संपूर्ण कुर्त्यावर आकर्षक बुटी वर्क होते.

 

जे वर्क कुर्त्यावर होते, तसेच वर तिच्या केशरी रंगाच्या ओढणीच्या काठांवरही दिसून आले. या ड्रेसवर राधिकाने अतिशय बॅलेन्स मेकअप केला होतो.

सुटलेलं पोट, कंबरेचा घेर दिसू नये म्हणून कसे कपडे घालावे- ५ टिप्स, लठ्ठपणा जाणवणार नाही

मधून भांग पाडून केस मोकळे सोडले होते आणि त्यांना थोडा वेव्ही लूक दिला होता. कानात मोठे झुमके आणि हातात झुमक्यांचे लटकन असणाऱ्या बांगड्या, अशा थाटात सजलेली राधिका अतिशय गोड दिसत होती. 

 

टॅग्स :फॅशनमुकेश अंबानीनीता अंबानीलग्नजामनगरगुजरात