Join us  

कतरिना कैफने नेसलेली १९ हजारांची पिवळी साडी पाहताच आलिया भट म्हणाली.... वाचा व्हायरल पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2023 9:25 AM

Katrina Kaif's Viral Photos in Yellow Saree: कतरिना कैफने पिवळ्या रंगाच्या साडीतले तिचे काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ते फोटो आणि त्यावर आलेली आलिया भटची कमेंट दोन्ही गोष्टी सध्या व्हायरल आहेत.

ठळक मुद्देएकंदरीतच त्या साडीत कतरिनाचा लूक SIMPLE BUT CATCHY असा झाला आहे. 

नवरात्रीमध्ये झालेल्या दुर्गापुजेमध्ये बॉलीवूडच्या अनेक तारका मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या. कतरिनाही नवरात्रीतला एक दिवस दुर्गापुजेसाठी जाऊन आली. यावेळी तिने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. दुर्गा पुजेदरम्यानचे तिचे काही फोटो साेशल मिडियावर व्हायरल झाले आहेतच. पण साडीचं खरं सौंदर्य दिसून आलं ते तिने तिच्या इस्टाग्राम हॅण्डलवरून शेअर केलेल्या फोटोंमधून. कतरिनाने नेसलेली ती साडी १९ हजार रुपये एवढ्या किमतीची असून तिच्या फोटोंना अभिनेत्री आलिया भटकडून आलेली कमेंट खूपच जास्त व्हायरल झाली आहे (Alia Bhatt's comment on Katrina Kaif's yellow saree worth Rs. 19K).

 

आता आपल्याला माहितीच आहे की आलिया भटशी लग्न करण्यापुर्वी अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ हे दोघे रिलेशनमध्ये होते. दोघांच्या नात्याची बरीच चर्चाही झाली होती. त्यानंतर दोघांचं ब्रेकअप झाला.

केस गळणं थांबवायचे तर प्या १ खास ज्यूस, केस भराभर वाढतीलच- त्वचेवरही येईल ग्लो

आता सध्या दोघांनीही आपले जीवनसाथी निवडले असून दोघेही त्यांच्या पार्टनरसोबत खूश आहेत. त्यामुळेच तर आलियाने कतरिनाला दिलेल्या कमेंटची एवढी चर्चा होत आहे. “So beautiful Katy” अशा शब्दांत आलियाने कतरिनाच्या सौंदर्याचं कौतूक केलं आहे.

 

कशी आहे कतरिना कैफची साडी?

कतरिनाची साडी चमकदार पिवळ्या रंगाची असून ती रॉ मँगो या ब्रॅण्डची आहे. ऑर्गेंझा सिल्क या प्रकाराच्या या साडीचे काठ सोनेरी असून त्यावर सोनेरी धाग्याने विणकाम केले आहे. कमल बुटी म्हणून ती डिझाईन ओळखली जाते.

दिवाळीत गिफ्ट देण्यासाठी आकर्षक वस्तू घ्यायच्या? बघा २५० रुपयांहून कमी किंमतीत सुंदर पर्याय

या बुटीमध्ये साडीवर कमळाच्या फुलांच्या आकाराची एम्ब्रॉयडरी केलेली असते. साडीला मॅचिंग होण्यासाठी तिने पोलकी डिझाईन झुमके घातले असून हातात जाडसर अशा भरीव बांगड्या आहेत. एकंदरीतच त्या साडीत कतरिनाचा लूक SIMPLE BUT CATCHY असा झाला आहे. 

 

टॅग्स :फॅशनकतरिना कैफआलिया भटरणबीर कपूरसाडी नेसणे