lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > केस गळणं थांबवायचे तर प्या १ खास ज्यूस, केस भराभर वाढतीलच- त्वचेवरही येईल ग्लो

केस गळणं थांबवायचे तर प्या १ खास ज्यूस, केस भराभर वाढतीलच- त्वचेवरही येईल ग्लो

Beauty Tips For Hair And Skin Care: केस खूपच गळत असतील, केसांची वाढ खुंटली असेल तर हा एक ज्यूस दररोज प्या... फक्त केसच नाही, तर त्वचाही होईल सुंदर- चमकदार (herbal juice for strong hair and glowing skin)....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2023 03:52 PM2023-10-30T15:52:53+5:302023-10-30T15:53:36+5:30

Beauty Tips For Hair And Skin Care: केस खूपच गळत असतील, केसांची वाढ खुंटली असेल तर हा एक ज्यूस दररोज प्या... फक्त केसच नाही, तर त्वचाही होईल सुंदर- चमकदार (herbal juice for strong hair and glowing skin)....

Natural remedies for reducing hair fall and glowing skin, herbal juice for strong hair and glowing skin | केस गळणं थांबवायचे तर प्या १ खास ज्यूस, केस भराभर वाढतीलच- त्वचेवरही येईल ग्लो

केस गळणं थांबवायचे तर प्या १ खास ज्यूस, केस भराभर वाढतीलच- त्वचेवरही येईल ग्लो

Highlights हा ज्यूस प्यायलयाने केस तर चांगले होतातच, पण त्वचेवरही चमक येते. 

हल्ली प्रदुषणाचे वाढते प्रमाण, खाण्यापिण्यातून पुरेशी पोषणमुल्ये न मिळणे, खूप जास्त कॉस्मेटिक्सचा वापर करणे अशा अनेक कारणांमुळे सध्या केसगळतीचे प्रमाण वाढले आहे. काही जणींचे केस तर एवढे जास्त गळत आहेत की अशीच केसगळती सुरू राहिली तर एक दिवस टक्कल पडेल की काय अशी भीती वाटते (Beauty Tips For Hair And Skin Care). केसगळती थांबविण्यासाठी आपण वरवर कितीही उपाय केले तरी त्याचा म्हणावा तसा परिणाम दिसून येत नाही. म्हणूनच आता हा एक उपाय करून पाहा. यात आपण एक ज्यूस तयार करणार आहाेत. तो ज्यूस रोज किंवा आठवड्यातून ३ ते ४ दिवस घेतला तरी त्यामुळे केसांना पोषण मिळेल. आणि फक्त केसच नाही तर त्वचा आणि आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरेल (herbal juice for strong hair and glowing skin).

 

केस गळणं कमी करण्यासाठी उपाय

केस गळणं कमी करण्यासाठी नेमका कोणता ज्यूस करायचा, त्यासाठी कोणते पदार्थ वापरायचे याविषयीची माहिती देणारा एक व्हिडिओ missherbofficial या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

बघा छोट्याशा कुंडीत कशी लावायची कोथिंबीर, एकदम सोपी पद्धत- रोजच खाता येईल घरची ताजी कोथिंबीर

हा ज्यूस करण्यासाठी आपल्याला २ ते ३ आवळे किंवा २ टेबलस्पून आवळा पावडर, कडीपत्त्याची ८ ते १० पाने, ३ टेबलस्पून बीटरूट, १ चमचा मध आणि पाणी एवढे साहित्य लागणार आहे. 

 

हे सगळं साहित्य मिक्सरमधून वाटून घ्या आणि गाळणीतून गाळून घ्या. हा ज्यूस आठवड्यातून दोन ते तीन वेळा प्यावा.

फुलका फुगतच नाही- वातड होतो? बघा नेमकं कुठे चुकतं, ५ टिप्स, भरभर करा मस्त फुगलेले फुलके

हा ज्यूस प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढते. तसेच बीटरुटमधून भरपूर प्रमाणात लोह मिळते. आवळा आणि कडीपत्ता तर केसांसाठी पोषक आहेच. त्यामुळे हा ज्यूस प्यायलयाने केस तर चांगले होतातच, पण त्वचेवरही चमक येते. 

Web Title: Natural remedies for reducing hair fall and glowing skin, herbal juice for strong hair and glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.