Join us

तुम्ही पाहिला का आलिया भटचा २. ६८ लाखांचा चमचमता सेक्विन मॅक्सी ड्रेस? बघा तिने कुठून केली खरेदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2023 15:18 IST

Alia Bhat's Expensive Glittery Sequin Maxi Dress: आलिया भटचा हा चमचमता मॅक्सी ड्रेस किंवा पार्टी गाऊन तब्बल २. ६८ लाखांचा असून सोशल मिडियावर या ड्रेसची चांगलीच चर्चा रंगली आहे....

ठळक मुद्देपुन्हा एकदा आलिया तिच्या हटके ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत आली असून यावेळी तिने घातलेला ड्रेस तब्बल २. ६८ लाखांचा आहे.

अभिनेत्री आलिया भट तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे. फॅशन, कपड्यांचं सिलेक्शन, स्टाईल याबाबत बॉलीवूडमध्ये ज्या काही ट्रेण्ड सेटर अभिनेत्री आहेत, त्यापैकीच एक म्हणून आलिया भटकडे पाहिले जाते. तिच्या लग्नापासूनच नवरीचा मेकअप, नवरीचे कपडे, दागिने यांचा एक नवा ट्रेण्ड बॉलीवूडमध्ये आला आहे. राष्ट्रीय पुरस्कार स्विकारण्यासाठी ती ज्या पेहेरावात गेली होती, त्याचीची चांगलीच चर्चा झाली. आता पुन्हा एकदा आलिया तिच्या हटके ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत आली असून यावेळी तिने घातलेला ड्रेस तब्बल २. ६८ लाखांचा आहे. (Alia Bhat's glittery sequin maxi dress worth Rs. 2.68 lacs)

 

अभिनेत्री आलिया भट आणि तिची नणंद म्हणजेच अभिनेत्री करिना कपूर ( Kareena Kapoor) यांनी नुकतीच 'कॉफी विथ करण' (Coffee With Karan program) या कार्यक्रमात एकत्रितपणे हजेरी लावली होती.

केस खूपच रुक्ष- कोरडे झाले? ३ पदार्थ वापरून घरच्याघरी १० रुपयांत करा हेअर स्पा, केस होतील सिल्की- शाईनी

यावेळी त्या दोघींच्याही लूक्सची चांगलीच चर्चा झाली. या कार्यक्रमात आलियाने जो ड्रेस घातला होता तो मॅक्सी ड्रेस किंवा लाँग पार्टी गाऊन या प्रकारातला होता. गडद मरून रंगाच्या या ड्रेसवर भरगच्च सेक्विन वर्क केलेले होते. शिवाय या ड्रेसचा फ्रंट नेकही अतिशय वेगळ्या प्रकारचा होता. या ड्रेसवर आलियाने हाय पेन्सिल हिल्स घातले होते, शिवाय मेकअप स्मोकी शेडचा केला होता. या दोन्ही गोष्टींमुळे तसेच कोणतेही भडक ॲक्सेसरीज न घातल्याने आलियाचा लूक एकदम डिसेंट आणि क्लासी झाला होता. 

 

आलियाने कुठून खरेदी केला महागडा ड्रेस?एवढा महागडा ड्रेस पाहिल्यावर आलियाने तो कोणाकडून डिझाईन करून घेतला होता, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना आणि फॅशन लव्हर मंडळींना पडणारच.

'हा' त्रास असणाऱ्या लोकांनी गूळ खाऊ नये, बघा गूळ खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ कोणती 

तर आलियाचा हा ड्रेस 16ARLINGTON या प्रसिद्ध अमेरिकन ब्रॅण्डचा असून त्याची किंमत तब्बल ३२२० डॉलर्स आहे. भारतीय चलनानुसार ही किंमत २ लाख ६७ हजार ९८८ रुपये एवढी होते. 

 

टॅग्स :फॅशनआलिया भटकरिना कपूरकरण जोहर