lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fashion > पाहा शिवानी सुर्वेच्या मंगळसूत्राची खासियत, पारंपरिक डिझाईनला पसंती देत घेतले आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन...

पाहा शिवानी सुर्वेच्या मंगळसूत्राची खासियत, पारंपरिक डिझाईनला पसंती देत घेतले आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन...

Actress Shivani Surve actor Ajinkya Nanaware wedding Mangal sutra design : कोणालाही कळू न देता या दोघांनी गपचूप साखरपुडा आणि लग्न केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2024 03:39 PM2024-02-04T15:39:24+5:302024-02-04T15:51:41+5:30

Actress Shivani Surve actor Ajinkya Nanaware wedding Mangal sutra design : कोणालाही कळू न देता या दोघांनी गपचूप साखरपुडा आणि लग्न केले.

Actress Shivani Surve actor Ajinkya Nanaware wedding Mangal sutra design : See the specialty of Shivani Surve's mangalsutra, married with a bang by favoring the traditional design... | पाहा शिवानी सुर्वेच्या मंगळसूत्राची खासियत, पारंपरिक डिझाईनला पसंती देत घेतले आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन...

पाहा शिवानी सुर्वेच्या मंगळसूत्राची खासियत, पारंपरिक डिझाईनला पसंती देत घेतले आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन...

प्रसिद्ध 'झिम्मा २', 'वाळवी' फेम मराठी अभिनेत्री अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि सातव्या मुलीची सातवी मुलगी या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे हे दोघं लग्न करणार हे सगळ्यांना माहित होतं. मात्र अचानक त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आणि सगळ्यांना आनंदाचा धक्काच बसला. आता साखरपुडा झाला म्हणजे ते एंगेज झाले असे अनेकांवा वाटते न वाटते तोच दुसऱ्या दिवशी त्यांच्या लग्नाचेही फोटो सोशल मीडीयावर व्हायरल झाले आणि चाहत्यांकडून या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. शिवानी आणि अजिंक्य २०१६ पासून एकमेकांना ओळखत होते. त्यांची ओळख 'तू जीवाला गुंतवावे' या मालिकेच्या सेटवर झाली.  तर मागील जवळपास ४ ते ५ वर्षांपासून ते एकत्र राहत होते. सोशल मीडियावरही दोघांनी अनेकदा एकमेकांसोबत फोटो शेअर केले होते (Actress Shivani Surve actor Ajinkya Nanaware wedding mangal sutra design). 

(Image : Google)
(Image : Google)

अखेर काल त्यांनी कोणालाही कळू न देता गपचूप साखरपुडा आणि लग्न केले. सेलिब्रिटींच्या  लग्नसोहळ्यात महत्त्वाचे आकर्षण असते म्हणजे त्यांचे कपडे, दागिने आणि त्यांचे लूक. शिवानी आणि अजिंक्य यांनी पेस्टल रंगाचे अतिशय सोबर असे कपडे घातले होते. साखरपुड्याला शिवानीने बेबी पिंक रंगाची डिझायनर शिफॉन साडी नेसली होती तर अजिंक्यने मोतीया रंगाचा शेरवानी घातला होता. शिवानीच्या लग्नाच्या घागऱ्याचा रंगही बेबी पिंक होता. यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. सर्वात जास्त आकर्षणाची बाब ठरली ते अजिंक्यने शिवानीला घातलेले मंगळसूत्र.

अतिशय पारंपरीक अशी डिझाईन असलेले शिवानीचे मंगळसूत्र खूपच छान आणि नाजूक असल्याचे पाहायला मिळाले. बाजुने सोन्याच्या चेन आणि मध्यभागी काळे आणि सोन्याचे मणी अशी पारंपरिक डिझाईन असलेले हे सोन्याचे मंगळसूत्र आहे. परंपरेप्रमाणे २ वाट्या असलेले हे मंगळसूत्र दिसायला सोबर आणि तरीही परंपरेचा मेळ साधणारे असे असल्याने छान वाटते. हल्ली मंगळसूत्राच्या बऱ्याच फॅन्सी डिझाईन्स बाजारात उपलब्ध असताना असे पारंपरिक आणि तरीही नाजूक असे मंगळसूत्र साडी, पंजाबी ड्रेस, घागरा अशा कोणत्याही कपड्यांवर छान दिसते हे नक्की. लग्नाचे या दोघांचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर झाले असून त्यात हे कपल अतिशय सुंदर दिसत आहे. 

Web Title: Actress Shivani Surve actor Ajinkya Nanaware wedding Mangal sutra design : See the specialty of Shivani Surve's mangalsutra, married with a bang by favoring the traditional design...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.