राणी मुखर्जी ही एक फार लोकप्रिय आणि गाजलेली अभिनेत्री आहे. राणी तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेच मात्र तिच्या अभिनयाची चर्चा कायमच असते. सॉफ्ट गर्लच्या भूमिका निभवणाऱ्या राणीने गेल्या काही वर्षांत सशक्त आणि सबला महिलांच्याही भूमिका निभावल्या. त्यासाठी तिला प्रेक्षकांची दाद मिळाली. यंदाच्या ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राणी मुखर्जीलाही पुरस्कार मिळाला. (While accepting the National Award, Rani Mukherjee wore a chain with her daughter's name around her neck, a story of a mother fighting for her daughter)या वर्षीचा सोहळा अनेक अर्थांनी खास ठरला. यंदा अनेक प्रतिभावान कलाकारांना सन्मानित करण्यात आलं. त्यामध्ये एक महत्त्वाचं नाव ठरलं, राणी मुखर्जी. तब्बल तीन दशके बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर राणीला तिच्या कारकिर्दीतील पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'Mrs. Chatterjee vs Norway' या चित्रपटातील दमदार आणि भावनिक भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.
या चित्रपटात राणीने एका आईची भूमिका साकारली आहे, जी नॉर्वेमध्ये आपल्या मुलांना वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणेविरुद्ध लढा देते. तिचा अभिनय प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा ठरला, आणि त्यामुळेच राष्ट्रीय पुरस्कार समितीने तिच्या या अभिनयाची दखल घेतली. राणीची या चित्रपटातील भूमिका फार प्रेरणादायी ठरते. एक आई मुलांसाठी काहीही करु शकते. तसेच मातृप्रेमाची शक्ती दाखवून देण्यात राणी अजिबात कमी पडली नाही.
पण या पुरस्कार सोहळ्यानंतर राणीचे कौतुक तर झालेच. मात्र सगळ्यांचे लक्ष वेधले ते राणीच्या गळ्यातील चेन ने. राणीने त्या दिवशी पारंपरिक साडीमध्ये सुरेख आणि साजेशी साज-शृंगार तर केलेला होताच. परंतु, तिच्या गळ्यातील एका चेनकडे सगळ्यांचे लक्ष गेले. ती फार महागातली किंवा भरलेली वगैरे नव्हती तरी तिने सगळ्यांचे लक्ष वेधले कारण त्यावर राणीच्या मुलीचे नाव लिहिले होते. राणीने गळ्यात घातलेल्या चेनवर Adira असे लिहिले होते.
राणीच्या या यशामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तिच्या अभिनयाला मिळालेली ही दाद तिच्या मेहनतीमुळेच मिळाला आहे. एका आईच्या भूमिकेसाठी मिळणारा पुरस्कार घेताना गळ्यात स्वतःच्या मुलीच्या नावाची चेन घालण्यात राणीला फार आनंद मिळाला. तिला तिच्या मुलीबद्दल किती प्रेम आहे याची जाणीव तिच्या वागणुकीतून होते अशा कमेंट्स अनेकांनी केल्या. राणीच्याच गळ्यातील चैन फारच लोकप्रिय ठरली.
Web Summary : Rani Mukerji received her first National Award for 'Mrs. Chatterjee vs Norway.' She wore a necklace with her daughter Adira's name, highlighting the powerful bond between mother and child. Her act resonated deeply with fans.
Web Summary : रानी मुखर्जी को 'मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे' के लिए पहला राष्ट्रीय पुरस्कार मिला। उन्होंने अपनी बेटी आदिरा के नाम का हार पहना, जो माँ और बेटी के बंधन को दर्शाता है। उनके इस कार्य से प्रशंसक बहुत प्रभावित हुए।