सौंदर्याची नक्की व्याख्या काय? कोण सुंदर आणि कोण नाही, हे कसे ठरवायचे? असे प्रश्न आपण बरेचदा ऐकत असतो. वेगवेगळी उत्तरेही ऐकत असतो. (What does it mean to be beautiful?)अर्थात, प्रत्येकाची ही व्याख्या सारखी नसते. कोणत्याही कल्पनांबाबत प्रत्येकाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. प्रत्येकजण स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार करतो. मात्र काही जणांच्या मतांमध्ये एखाद्याचा दृष्टिकोन बदलण्याची ताकद असते. सौंदर्याच्या व्याख्येचेही तसेच आहे. प्रत्येकजण रूपाने व स्वभावाने वेगवेगळा असतो.(What does it mean to be beautiful?) त्यानुसार तो सौंदर्याचा अर्थ लावत असतो. २००० ची मिस युनिव्हर्स लारा दत्ताला मिस युनिव्हर्स २००० मध्ये वहीदा रेहमाननी सौंदर्याची व्याख्या विचारली असता, तिने फार छान उत्तर दिले. तिला अंतिम फेरीत विचारलेला प्रश्न होता की, सुंदर असणे किंवा बनणे कठीण असते का? या प्रश्नाचे तिने दिलेले उत्तर तिच्या विजयाचे कारण ठरले. लोकांनाही ते उत्तर भावले.
लाराचे उत्तर होते, सौंदर्य फक्त बाह्यच नसते. तुमच्या अंतर्गत असते. ते जर तुम्ही शोधू शकलात, तर तुम्ही सुंदर आहात. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात. तुमच्यात आत्मविश्वाससुद्धा आहे. चुकीच्या गोष्टींचा प्रतिकार करण्याची क्षमता तुमच्यात आहे. विजय मिळवण्याची क्षमता आहे. अशा सगळ्या गुणांनी तुम्ही परीपुर्ण आहात. तर तुम्ही सुंदर आहात. असे सौंदर्य जोपासणे नक्कीच कठीण नाही.
लाराचे उत्तर सौंदर्याच्या व्याख्येला नवी दिशा देणारे ठरते. चेहऱ्यावरील सौंदर्य काही काळापुरते असते. मात्र मनाचे सौंदर्य माणसाची मानसिकता व व्यक्तिमत्त्व घडवते. जे आयुष्यभर माणसाबरोबर राहते. २००० साली लाराने दिलेले उत्तर आत्ताच्या पिढीसाठी फार महत्त्वपूर्ण आहे. सध्या सौंदर्याला नको तेवढं महत्त्व दिले जाते. बाह्य सौंदर्य आपल्या हातात नाही.(What does it mean to be beautiful?) मात्र मन साफ ठेवणं नक्कीच आपल्या हातात आहे. या विचाराने दिलेले लाराचे उत्तर तिला फायद्याचे ठरले. मिस युनिव्हर्स २००० जिंकण्यासाठी लारा पात्र होती, हे तिच्या विचारांतून सिद्ध होते.