Ibrahim Ali Khan Disease: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) अलिकडेच त्याच्या रिलीज झालेल्या पहिल्या 'नादानियां' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. सिनेमा निमित्ताने दिलेल्या मुलाखतींमध्ये त्यानं त्याच्या आजाराबाबतही काही माहिती दिली ज्याची सुद्धा चर्चा आहे. इब्राहिमला बालपणापासूनच काही समस्यांचा सामना करावा लागला होता. ज्याचा त्याच्या जीवनावर प्रभाव पडला. बरेच उपचार आणि मेहनतीनंतर त्याचा आजार बऱ्यापैकी दूर झाला. इब्राहिम अली खान याला बालपणीच काविळ झाली होती. ज्यामुळे त्याला ऐकण्यास आणि बोलण्यास समस्या होता होती. इतके वर्ष उलटून गेले तरी या आजारामुळे त्याला बोलण्यात अजूनही समस्या होते.
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत इब्राहिमनं सांगितलं की, जन्मानंतर त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्याला काविळ झाली होती. ज्याचा प्रभाव त्याच्या मेंदुवरही झाला होता. काविळ गंभीर झाल्यावर त्याच्या बोलण्याच्या आणि ऐकण्याच्या क्षमतेवरही प्रभाव पडला होता. कुटुंबियांनी त्याला 14 वर्षांचा असताना इंग्लंडमध्ये स्कूलमध्ये पाठवलं होतं. जिथे त्याला एक एकटं राहणं आणि या आजारांचा सामना करणं अधिक अवघड गेलं. मात्र, इथे अनेक मित्रांच्या मदतीनं त्यानं आपल्या अडचणीवर मात करण्यावर मेहनत घेतली.
काय आहे काविळ?
काविळ एक असा आजार आहे जो शरीरात बिलारूबिनचं प्रमाण अधिक झाल्यावर होतो. जेव्हा शरीरातील लाल रक्तपेशी तुटतात तेव्हा पिवळ्या रंगाचे बिलारूबिन तयार होतात. बिलारूबिन लिव्हरमधून फिल्टर होऊन बाहेर निघतात. पण जेव्हा असं होत नाही तेव्हा शरीरात याचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे काविळ होते. जन्मावेळी जास्तीत जास्त बाळांना काविळ होते. वेळीच जर यावर उपचार केले नाही तर सेप्सिस होऊ शकतो. गंभीर स्थितीत लिव्हर फेल होण्याचाही धोका असतो.
काविळची लक्षण
ताप आणि थकवा
वजन कमी होणे आणि कमजोरी
भूक कमी होणे
पोटात वेदना होणे
डोकेदुखी
शरीरात जळजळ होणे
बद्धकोष्ठतेची समस्या होणे
लघवीचा रंग पिवळा होणे
शरीरात खाज येणे
मळमळ होणे
डोळ्यांचा रंग पिवळा होणे