Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Celebrity Corner > मी अब्सेंट बाप होतो, मुले मोठी झाली पण मी.. ! राम कपूरने सांगितली खंत, बापाची अस्वस्थ गोष्ट

मी अब्सेंट बाप होतो, मुले मोठी झाली पण मी.. ! राम कपूरने सांगितली खंत, बापाची अस्वस्थ गोष्ट

Ram Kapoor interview: Ram Kapoor confession: Ram Kapoor family life: राम कपूरने सांगितलं की, तब्बल १० वर्षे त्याने आपल्या मुलांचे बालपण नीट पाहिलेच नाही. मुले मोठी झाली, त्यांनी रांगायला सुरुवात केली, ते बोलायला लागले, शाळेत गेले, पण या प्रवासात त्यांचा बाप त्यांच्यासोबत नव्हता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2026 12:59 IST2026-02-22T12:58:26+5:302026-02-22T12:59:18+5:30

Ram Kapoor interview: Ram Kapoor confession: Ram Kapoor family life: राम कपूरने सांगितलं की, तब्बल १० वर्षे त्याने आपल्या मुलांचे बालपण नीट पाहिलेच नाही. मुले मोठी झाली, त्यांनी रांगायला सुरुवात केली, ते बोलायला लागले, शाळेत गेले, पण या प्रवासात त्यांचा बाप त्यांच्यासोबत नव्हता.

Ram Kapoor says he was an absent father Ram Kapoor emotional confession about his children Ram Kapoor interview about parenting regrets why Ram Kapoor feels guilty as a father Bollywood actor opens up about family life | मी अब्सेंट बाप होतो, मुले मोठी झाली पण मी.. ! राम कपूरने सांगितली खंत, बापाची अस्वस्थ गोष्ट

मी अब्सेंट बाप होतो, मुले मोठी झाली पण मी.. ! राम कपूरने सांगितली खंत, बापाची अस्वस्थ गोष्ट

ग्लॅमरसच्या जगात चमकणारे कलाकार आपल्याला बाहेरुन खूप सुखी समाधानी वाटतात. त्यांच यश, प्रसिद्धी आणि त्यांच्याकडे असलेला पैसा पाहून अनेकांना हे आयुष्य स्वप्नवत वाटतं.(Ram Kapoor interview) पण या झगमगाटाच्या मागे अनेकदा काही अशा गोष्टी दडलेल्या असतात, ज्याची किंमत त्या कलाकाराला आपल्या वैयक्तिक आयुष्यात मोजावी लागते.(Ram Kapoor confession) टेलिव्हिजन सुपरस्टार राम कपूर याच्या बाबतीतही असंच काहीस घडलं. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या पालकत्वाबद्दल खुलासा केला आहे. केवळ एका अभिनेत्याची व्यथा नाही, तर आजच्या धावपळीच्या युगात जगणाऱ्या प्रत्येक 'कामात मग्न' बापाची अस्वस्थ करणारी गोष्ट आहे.(Ram Kapoor family life)

अनुष्का शर्मा ते दीपिका पादुकोण, बॉलीवूड अभिनेत्रींच्या मंगळसुत्राची किंमत ऐकून बसेल धक्का, मंगळसुत्रांच्या सुंदर डिझाइन्स

मी एक अब्सेंट बाप होतो ही राम कपूरची खंत ऐकताना अनेकांना धक्का बसला. ज्या काळात राम कपूर 'बडे अच्छे लगते हैं' किंवा 'कसम से' सारख्या मालिकांमधून घराघरात पोहचत होता, त्याच काळात त्याच्या स्वतःच्या घरात त्याची मुले त्याला ओळखत नव्हती. राम कपूरने सांगितलं की, तब्बल १० वर्षे त्याने आपल्या मुलांचे बालपण नीट पाहिलेच नाही. मुले मोठी झाली, त्यांनी रांगायला सुरुवात केली, ते बोलायला लागले, शाळेत गेले, पण या प्रवासात त्यांचा बाप त्यांच्यासोबत नव्हता.

राम कपूर आणि गौतमी कपूर यांची भेट 'घर एक मंदिर' या टीव्ही सिरीयलच्या सेटवर झाली. तिथे त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीच प्रेमात रुपांतर झालं. १६ फेब्रुवारी २००३ मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले. २००६ मध्ये त्यांना सिया नावाची गोंडस मुलगी झाली. पण गौतमी म्हणते त्यावेळी मी आई होण्यासाठी रेडी नव्हते. राम नेहमीच माझ्यापासून लांब असायचा. 

नयनदीप रक्षितच्या युट्यूब चॅनलेवर गौतमीनं सांगितलं की फॅमिली प्लॅनिंग आम्ही केलही नव्हतं. मला जेव्हा समजलं मी प्रेग्नेंट आहे तेव्हा मी रामला सांगितलं. तो म्हणाला आपल्याला बाळ होणार आहे का?, आपण काय करणार आहोत?, तू सगळं काही माझ्यावर सोड. गौतमीबद्दल बोलतना राम म्हणाला, तिला प्रत्येक नवीन गोष्टीत दडपण येते, ती घाबरते. 

गौतमी म्हणाली की सियाच्या जन्मावेळी रामच्या करिअरमध्ये मोठे बदल झाले. तिच्या येण्याने रामचे नशिब बदलले. रामला त्यावेळी 'कसम से' सिरियल मिळाली. हा झी किंवा बालाजीचा सर्वात मोठा शो नव्हता. पण सियाचा जन्म झाल्यानंतर हा शो नंबर वन वर आला. परिस्थिती बदलली, मला मागे वळून पाहावे लागले नाही, गौतमीने सर्व काही नीट सांभाळलं. 

मी आज जो काही आहे ती फक्त माझ्या बायकोमुळे. तिने घराची आणि मुलांची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. ज्यामुळे १५ वर्ष मी माझ्या करिअरवर फोकस करु शकलो. या काळात तिने कोणालाही आपल्या जवळ येऊ दिल नाही. कोणताही यशस्वी पुरुष यशस्वी होण्यामागे त्याच्यासोबत उभी असणारी स्त्री असते. हे तिने कायम सिद्ध केलं. गौतमीने मुलांना वडिलांची उणीव भासू दिली नाही, पण तरीही माझ्या मनात ती एक 'बाप' म्हणून उपस्थित नसल्याची रुखरुख कायम राहिली.

सध्या मी माझ्या कामाचे स्वरुप बदलले आहे. आता मी पूर्वीसारखा काम करत नाही. कामातून हळूहळू ब्रेक घेतो. ज्यामुळे मुलांसोबत मला वेळ घालवता येईल. मला जाणीव झाली आहे, मी माझ्या मुलांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची १० वर्ष गमावली यांची खंत आहेच म्हणून आता मी ते भरुन काढण्याचा प्रयत्न करत आहे. 
 

Web Title : राम कपूर को बच्चों के बचपन में अनुपस्थित पिता होने का पछतावा।

Web Summary : अभिनेता राम कपूर ने अपने व्यस्त करियर के कारण बच्चों के शुरुआती वर्षों को याद करने पर अफसोस जताया। उन्होंने घर और परिवार को संभालने में अपनी पत्नी के बलिदानों को स्वीकार किया, जिससे उन्हें करियर पर ध्यान केंद्रित करने की अनुमति मिली। अब, वह खोए हुए समय की भरपाई करने के उद्देश्य से अपने परिवार के साथ समय बिताने को प्राथमिकता देते हैं।

Web Title : Ram Kapoor regrets being an absent father during children's childhood.

Web Summary : Actor Ram Kapoor confesses regret over missing his children's early years due to his demanding career. He acknowledges his wife's sacrifices in managing home and family, allowing him career focus. Now, he prioritizes spending time with his family, aiming to compensate for lost time and experiences.