चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सेलिब्रिटींएवढेच आता यूट्यूबर प्रसिद्ध आहेत. आज ते उत्तम पैसे कमवत असले तरी आधी स्वत:चे व्हिडिओ साध्या फोन मध्ये तयार करून पोस्ट करायचे. (Prajakta Koli Is Now a Celebrity But Once She Was..) तसेच आजकाल अनेक महिला, मुली यूट्यूबर आहेत, पण आधी मुलींना विनोद जमत नाही असे मानले जायचे आजही असे मानणारे आहेत. प्रचंड ट्रोल केलं जायचं. अशा काळामध्ये एका मुलीचे यूट्यूब व्हिडियो व्हायरल व्हायला लागले. बघता-बघता काही काळासाठी ती सगळ्यात जास्त फॉलोवर्स असणारी यूट्यूबर झाली. (Prajakta Koli Is Now a Celebrity But Once She Was..)ती म्हणजे मोस्टलीसेन. प्राजक्ता कोळीने मोस्टलीसेन या नावाने यूट्यूब चॅनल सुरू केले होते.
२०१६ साली तिचे काही व्हिडियो व्हायरल झाले. बीटीएस आर्मीसारखी प्राजक्ताची ही आर्मी तयार झाली. तिच्यासाठी तरुण - तरुणी पार वेडे होऊन जायचे. त्यांनी स्वत:ला डमडम्स असं म्हणायला सुरवात केली. बघता बघता हा ट्रेंड फारच गाजला. प्राजक्ताचे डमडम्स असं तिचे चाहते स्वतःला म्हणवू लागले.
नंतर मिसमॅच सारख्या सिरीजमुळे प्राजक्ताला खुप जास्त लोकप्रियता प्राप्त झाली. प्राजक्ता सुरूवातीला जेव्हा व्हिडिओ तयार करायची तेव्हा सगळ्या व्यक्तिरेखा एकटीच साकारायची. लोकांना प्राजक्ता आणि रोहीत सराफची जोडी आवडते. त्यांचेच लग्न व्हावे असे लोकांना वाटत होते. मात्र प्राजक्ता गेले ११ वर्ष वृषांक खनाल याच्या बरोबर रिलेशनशीपमध्ये आहे. तिने त्याच्याशीच लग्न केले. प्राजक्ताचे २५ फेब्रुवारीला लग्न झाले. एका मुलीचा हा जिद्दीचा प्रवास कौतुकास्पद आहे.