Join us
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोट झाला, नातं संपलं, तरी 'रेहना हे तेरे दिल मै, किरण रावच्या मनात अजूनही नाव आमिरच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2025 17:11 IST

Aamir Khan Kiran Rao divorce: Kiran Rao Aamir Khan relationship: किरण रावला अपेंडिक्सचा त्रास झाला, त्यामुळे तिला हॉस्टपिटलमध्ये नेण्यात आलं.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची एक्स वाइफ किरण रावला रुग्णालयात नेण्यात आलं. किरण रावची अपेंडिक्सची सर्जरी झाली.(kiran rao appendix surgery) याबाबतची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.(kiran roa health issue) तिने काही हॉस्पिटलमधील फोटो देखील शेअर केले. पण तिच्या हातावर असणाऱ्या हॉस्पिटलच्या टॅगने मात्र सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. 'किरण आमिर राव खान...'(Aamir Khan Kiran Rao divorce)

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप, घटस्फोट होणं काही नवीन गोष्ट नाही. मात्र काही नाती अशी असतात जी कायदेशीररित्या संपल्या तरी भावनिक आणि मानसिक पातळीवर पूर्णपणे तुटत नाहीत. सुपरस्टार आमिर खान आणि त्याची एक्स बायको किरण राव. नातं कायदेशीररित्या संपलं तरी कुटुंब, पालक म्हणून आणि मित्र म्हणून ते आजही जोडलेले दिसतात.

५० रुपये खर्च आणि घ्या हळदी- कुंकवाच्या वाणासाठी १० हटके पर्याय, कमी खर्चात- कामाची वस्तू

असंच काहीसं चित्र ऋत्विक रोशन आणि त्याची एक्स-वाइफ सुजैन खान यांच्या बाबतीतही पाहायला मिळतं. घटस्फोटानंतरही दोघे मुलांसाठी एकत्र वेळ घालवतात, कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सोबत दिसतात आणि एकमेकांबद्दल नेहमीच सन्मानाने बोलतात.

आमिर खान आणि किरण राव यांनी २००५ साली लग्न केलं होतं. आमिर खानच्या लगान चित्रपटादरम्यान दोघांची सेटवर ओळख झाली आणि हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांना एक मुलगा देखील आहे. पण तब्बल १५ वर्षांनंतर त्यांनी २०२१ रोजी घटस्फोटाची बातमी दिली. घटस्फोटाचं कारण सांगताना दोघांनी कोणताही वाद, गैरसमज किंवा कोणत्या व्यक्तीचाही उल्लेख केला नाही. आम्ही 'आयुष्याच्या नवीन टप्प्याकडे जात आहोत' असं स्पष्ट मत मांडलं. 

कामातील बदल, वैयक्तिक विचारांची वेगळी दिशा आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळे हा निर्णय त्यांनी घेतला असं ही म्हटलं. पण पालक, कुटुंब आणि क्रिएटिव्ह पार्टनर म्हणून कायम एकत्र राहू असं वचन एकमेकांना दिलं.  पण पुन्हा प्रश्न उभा राहतो. सेलिब्रिटी लोक घटस्फोटानंतरही इतक्या सहजतेने नातं का सांभाळू शकतात, पण सामान्य माणसाला ते का जमत नाही? याचं मुख्य कारणं त्यांची वैचारिक परिपक्वता आणि सामाजिक दबावातील फरक. सेलिब्रिटींना थेरपी, काउन्सेलिंग, आर्थिक स्थैर्य आणि वैयक्तिक स्पेस सहज मिळते. त्यांना “लोक काय म्हणतील?” या भीतीपेक्षा स्वतःच्या मानसिक आरोग्याला जास्त महत्त्व देता येतं. उलट सामान्य माणूस मात्र समाज, कुटुंब, नातेवाईक, मान-अपमान, आर्थिक असुरक्षितता यामध्ये अडकतो.

आपल्याकडे आजही घटस्फोटाला अपयश समजण्याची मानसिकता खोलवर रुजली आहे. त्यामुळे कायमच राग, अहंकार, सूडभावना यांना खतपाणी मिळतं. नातं संपलं की सगळ्यात जास्त त्रास कुटुंबाला आणि मुलांना करावा लागतो. पण सेलिब्रिटी आजही आपली जबाबदारी स्वीकारतात. आमिर-किरण किंवा ऋत्विक-सुजैन यांच्यासारख्या जोड्या आपल्याला हेच शिकवतात की प्रेम संपलं तरी माणुसकी, आदर आणि संवाद टिकवता येतो. फक्त दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Divorced, but not detached: Kiran Rao's enduring bond with Aamir.

Web Summary : Kiran Rao's hospital tag revealed 'Kiran Aamir Rao Khan' after her surgery, sparking discussion about her bond with ex-husband Aamir Khan. Despite divorce, they, like Hrithik-Sussanne, prioritize family, demonstrating respect and shared responsibility, suggesting maturity over societal pressure.
टॅग्स :सेलिब्रिटीआरोग्यआमिर खानकिरण राव