Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Celebrity Corner > रोज सायंकाळी 'हे ' प्यायल्याशिवाय मला काही सुचत नाही! करीना कपूर सांगते तिच्या व्यसनाची डेंजर गोष्ट

रोज सायंकाळी 'हे ' प्यायल्याशिवाय मला काही सुचत नाही! करीना कपूर सांगते तिच्या व्यसनाची डेंजर गोष्ट

Bebo chi shaam chi chai: Kareena Kapoor tea and Parle G: Kareena Kapoor diet tips in Marathi: करोडोंची मालकीण आणि टॉपची अभिनेत्री असूनही करीनाचा जीव एका साध्या गोष्टी अडकला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2026 12:10 IST2026-03-04T12:09:28+5:302026-03-04T12:10:59+5:30

Bebo chi shaam chi chai: Kareena Kapoor tea and Parle G: Kareena Kapoor diet tips in Marathi: करोडोंची मालकीण आणि टॉपची अभिनेत्री असूनही करीनाचा जीव एका साध्या गोष्टी अडकला आहे.

Kareena Kapoor Khan Kareena Kapoor tea lover Kareena Kapoor diet secrets Kareena Kapoor evening tea ritual Parle-G biscuits Bollywood celebrity food habits fitness mantra Indian celebrity snacks | रोज सायंकाळी 'हे ' प्यायल्याशिवाय मला काही सुचत नाही! करीना कपूर सांगते तिच्या व्यसनाची डेंजर गोष्ट

रोज सायंकाळी 'हे ' प्यायल्याशिवाय मला काही सुचत नाही! करीना कपूर सांगते तिच्या व्यसनाची डेंजर गोष्ट

बॉलीवूडची 'बेबो' म्हणजेच करीना कपूर खान तिच्या स्टाईल आणि फिटनेससाठी नेहमीच चर्चेत असते. करोडोंची मालकीण आणि टॉपची अभिनेत्री असूनही करीनाचा जीव एका साध्या गोष्टी अडकला आहे, ती गोष्ट म्हणजे'संध्याकाळचा चहा आणि पार्ले-जी बिस्किट!'(Kareena Kapoor diet tips in Marathi)
नुकतेच तिने इंस्टाग्रामला एक स्टोरी टाकली होती. शाम की चाय प्रकारची मी व्यक्ती आहे. पार्ले जी आणि संध्याकाळची चहा. आणि काहीतरी वेगळे, तुम्हाला माहित आहे मला काय म्हणायचे आहे.(Bebo chi shaam chi chai) असं तिने लिहिलं. चकाचक पार्ट्या आणि महागड्या डाएट फूडपेक्षा तिला घरचा चहा आणि त्यासोबत बुडवून खाल्लेलं पार्ले-जी बिस्किट जास्त आनंद देतो.(Kareena Kapoor tea and Parle G)
करीना कपूर खानने झिरो फिगरचा ट्रेंड आणला असला, तरी आज ती खऱ्या अर्थाने 'शाश्वत फिटनेस' (Sustainable Fitness) कडे वळली आहे. करीना सांगते की, तिला डाएटच्या नावाखाली कडक उपवास करणं किंवा फक्त सॅलड खाऊन जगणं आवडत नाही. तिचे फिटनेस गुपित तिच्या साध्या सवयींमध्ये दडलेले आहे.

Women's Day 2026 : स्पेशल डेट प्लान करताय? जुने टिपिकल गाऊन विसरा, घ्या १० सुंदर मॅक्सी ड्रेस- दिसा स्टायलिश

करीनाची आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर नेहमीच सांगते की, वजन कमी करण्यासाठी महागड्या किंवा परदेशी पदार्थांऐवजी स्थानिक आणि घरगुती पदार्थांना कायम प्राधान्य द्यावे. करीना कपूर हा डाएट अगदी तंतोतंत पाळते. ती तूप, भात, डाळ आणि खिचडी यांसारखे पदार्थ आवडीने खाते. चहा आणि बिस्किट खाल्ल्यावर ती तिचं पुढचं जेवण (रात्रीचं जेवण) हलकं ठेवते, ज्यामुळे कॅलरीज बॅलन्स होतात.

अनेक भारतीय घरांमध्ये चहा आवडीने प्यायाला जातो. सकाळच्या दिवसाची सुरुवातपासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत चहाचे घोट प्यायले जातात. अगदी घरी पाहुणे आले तरी कपभर चहा बनवला जातो. पण रोज संध्याकाळी चहा पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? 

बीएचएमएस पोषणतज्ज्ञ आणि आहारातज्ज्ञ डॉ. स्मृती झुनझुनवाला म्हणाल्या की, चहा पिण्याची देखील योग्य वेळ असते. मग तो दुधासोबत घ्यावा की साखरेसोबत की अजून कशासोबत हे देखील समजणं महत्त्वाचं आहे. अनेकजण ब्लॅक टी पितात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि संयुगांनी समृद्ध असे घटक असतात जे आपल्या पेशींचे नुकसान टाळतात. यामुळे शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते.

ज्यांची रात्रीची शिफ्ट असते अशा लोकांनी संध्याकाळी चहा प्यायला हवा. अॅसिडीटी किंवा पोटाच्या समस्या नसणारे किंवा ज्यांची पचनक्रिया चांगली आहे. अशा लोकांनी चहा पिऊ नये. जर तुम्ही दिवसभरात एक कप चहा पित असाल तरच संध्याकाळी चहा प्या. 

करीना कपूर तिच्या चहामध्ये रिफाइंड साखरेऐवजी गूळ किंवा सेंद्रिय साखरेचा वापर करते. ती चहा संध्याकाळी ७ च्या आधी पिते. रात्री उशिरा चहा किंवा कॅफीन घेणे ती टाळते, ज्यामुळे झोपेवर परिणाम होणार नाही. पुरेशी झोप हे देखील वजन कमी ठेवण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे.
 

Web Title : करीना कपूर का शाम का चाय का शौक: एक साधारण आनंद।

Web Summary : करीना कपूर को शाम को पार्ले-जी बिस्किट के साथ चाय पीना पसंद है। सख्त आहार से बचते हुए, वह सरल, स्थानीय खाद्य पदार्थों और टिकाऊ फिटनेस को पसंद करती हैं। पोषण विशेषज्ञ बेहतर नींद और वजन प्रबंधन के लिए रिफाइंड चीनी का सेवन सीमित करने, गुड़ चुनने और देर रात कैफीन से बचने की सलाह देते हैं।

Web Title : Kareena Kapoor's evening tea ritual: A simple pleasure revealed.

Web Summary : Kareena Kapoor loves evening tea with Parle-G biscuits. Eschewing strict diets, she favors simple, local foods and sustainable fitness. Nutritionists advise limiting refined sugar intake, opting for jaggery and avoiding late-night caffeine for better sleep and weight management.