Lokmat Sakhi >Celebrity Corner > बारीक आहे म्हणून इतकं घाणेरडं ट्रोलिंग झालं की शेवटी मी..! अनन्या पांडे सांगते भयानक अनुभव

बारीक आहे म्हणून इतकं घाणेरडं ट्रोलिंग झालं की शेवटी मी..! अनन्या पांडे सांगते भयानक अनुभव

I was trolled so much for being thin - Ananya Pandey : शरीरावरूनसुद्धा लोकं ट्रोल करतात. ऐका अनन्या काय सांगते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2025 19:37 IST2025-01-24T19:34:21+5:302025-01-24T19:37:32+5:30

I was trolled so much for being thin - Ananya Pandey : शरीरावरूनसुद्धा लोकं ट्रोल करतात. ऐका अनन्या काय सांगते.

I was trolled so much for being thin - Ananya Pandey | बारीक आहे म्हणून इतकं घाणेरडं ट्रोलिंग झालं की शेवटी मी..! अनन्या पांडे सांगते भयानक अनुभव

बारीक आहे म्हणून इतकं घाणेरडं ट्रोलिंग झालं की शेवटी मी..! अनन्या पांडे सांगते भयानक अनुभव

बॉलिवूड नेपोकिड्स आणि ट्रोलिंग या त्रिकूटाबद्दल आपण सगळे जाणून आहोत. बरेच कलाकार त्यांच्या मुलांना आणि मुलींना सिनेमामध्ये काम मिळवून देण्यासाठी कष्ट घेतात. सध्या तरी अर्ध बॉलिवू़ड नेपोकिड्सनी भरलेले आहे. त्यामुळे इतर कलाकारांना आपण नेपोटीझमचा शिकार होताना बघतो. (I was trolled so much for being thin - Ananya Pandey)सतत ट्रोल होणारी नेपोकिड म्हणजे अनन्या पांडे. सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने ती ट्रोल होतच असते. 

तिच्याबद्दल सोशल मिडिया पेजेस सतत मिमस् तयार करत असतात.  सिद्धार्थ चतुर्वेदीने तिला एका शोमध्ये ट्रोल केलं होतं. त्यानंतर ती सतत ट्रोल होत राहिली. अनन्याला ट्रोलिंग बद्दल विचारल्यावर ती म्हणाली," तिला त्याचा फरक पडत नाही." ती हेटर्सकडेसुद्धा सकारत्मकदृष्टीने बघते. पुढे तिने सांगितले की, तिला कमेंट्स ऐकण्याची सवय आधी पासूनच आहे. (I was trolled so much for being thin - Ananya Pandey)

'शी द पिपल स्पॉटलाइट' बरोबरच्या एका मुलाखतीत अनन्याने सांगितले की, तिला लोक फ्लॅटचेस्ट म्हणतात. चिकनलेग्ज आणि केसाळ असंही म्हणतात. हेटर्स तर सतत ट्रोल करतात. पण शरीरावरून झालेल्या ट्रोलिंगचा अनन्याला फार त्रास झाल्याचे तिने सांगितले. सतत अश्लील कमेंट्स वाचलयावर, तिला मानसिक त्रास झाला होता. तो त्रास इतका वाढला की, तिला मानसोपचारतज्ज्ञ्यांची मदत घ्यावी लागली.  पुढे ती म्हणते, "मला कळले आहे की, हे फक्त माझ्याबरोबर होतं नाही. अनेक बारीक मुलींना अशा कमेंट्सना सामोरं जावं लागतं. पण आता मला अशा ट्रोलिंगचा त्रास होतं नाही. आणि मी कोणतीही ट्रिटमेंट करून घेणार नाही. माझं शरीर जसं आहे तसंच मला आवडतं." 

लोकांना एखादी अभिनेत्री किंवा अभिनेता आवडत नाही. मग असे लोक त्या सेलेब्रिटीला ट्रोल करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधतात. पण एखादा आवडत नाही म्हणून व्यंगावरून बोलणे योग्य आहे का? बॉडीशेमिंगचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अनन्याच नाही तर, अनेक मुलींना अशा ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. इंस्टाग्रामवर याचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. ट्रोलिंग करणं तरूणांना 'कुल 'वाटायला लागलं आहे. मात्र कोणालाही असं बॉडीशेमिंग करणं चुकीचंच आहे. अनन्यासारखे नेपोकिड्स असोत किंवा सामान्य माणूस असो अशा कमेंट्स करणे वाईटच आहे. 

Web Title: I was trolled so much for being thin - Ananya Pandey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.