अक्षर पटेल. म्हणायला व्हाइस कप्तान. पण त्याला पहिल्या सामन्यात ड्रॉप करण्यात आलं. अपमानाचा कडु घोट तो प्यायला, त्यानं इगो इश्यू न करता संधी मिळताच संघासाठी उत्तम कामगिरी केली. बॉलिंग तर उत्तम होतीच पण अफलातून कॅच घेत सामनेही फिरवले. टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर लेकाला म्हणजेच हक्षला कडेवर घेऊन बायकोसोबत त्यानं आपला आनंद साजरा केला. अक्षर पटेलची बायको मेहा पटेल, तिनंही अक्षरला आजवर त्याच्या प्रवासात उत्तम साथ दिली आहे. त्यांची लव्हस्टोरीही अगदी साधी पण परस्परांचा आदर करत नातं जपणारी आहे..(Axar Patel & Meha Patel love story).
अक्षर आणि मेहा लहानपणापासून मित्र होते. त्यांच्यात चांगली मैत्री होती. ते आजही एकमेकांना आपले बेस्ट फ्रेंड म्हणतात. २०११ नंतर त्यांच्या प्रेमाच्या नात्याला सुरुवात झाली. अक्षरने एकदम फिल्मी स्टाइल डेकोरेशन करुन, गुडघ्यावर बसून तिला प्रपोजही केलं. त्याकाळात ती शिकत होती, करिअर घडवत होती. त्याचंही करिअर वेग घेत होतं. एकमेकांना हो म्हंटलं पण पुढे १० वर्षे ते नात्यात राहिले.आणि मग २०२२ मध्ये त्यांनी साखरपूडा केला. पुढे वडोदरात लग्नही केलं.आता एक छान गोडुला मुलगा आहे. आणि ते कुटूंब अत्यंत साधेपणानं आपलं मध्यमवर्गीय आयुष्य जगताना दिसतं.अक्षरच्या करिअरच्या चढउतारात मेहा त्याच्यासोबत होतीच. ती एक प्रोफेशनल न्यूट्रिशनिस्ट आहे, त्यामुळे ती अक्षरच्या फिटनेस आणि आहाराची विशेष काळजी घेते(Akshar Patel Love Story).
मेहाचं स्वत:चं उत्तम करिअर आहे. नवरा क्रिकेटपटू म्हणून ती काम थांबवून घरी बसलेली नाही तर ती आपलं काम अत्यंत शिस्तीने करते. अक्षर पटेलही सांगतो की आमचं परस्परांवरचं प्रेम विश्वास आणि आदर हे आमच्या नात्याचा पाया आहे. आमची मैत्री आम्हाला महत्वाची वाटते.जोडीदाराची अशी भक्कम साथ करिअरच्या प्रवासातच नाही तर जगण्यातही महत्वाची असते. अक्षर आणि मेहा यांची साधीशी जोडी साधेपणानंच जगण्याची एक गोष्ट सांगते. जी आजच्या चमकधमकवाल्या उथळ नात्यांच्या काळात म्हणून वेगळी दिसते.
Web Summary : Akshar Patel and Meha's love story began as friends, blossoming after 2011. A decade-long relationship led to marriage and a child. Meha, a nutritionist, supports Akshar's career, emphasizing their bond of love, trust, and mutual respect.
Web Summary : अक्षर पटेल और मेहा की प्रेम कहानी दोस्ती से शुरू हुई, जो 2011 के बाद विकसित हुई। एक दशक लंबे रिश्ते ने शादी और एक बच्चे को जन्म दिया। मेहा, एक पोषण विशेषज्ञ, अक्षर के करियर का समर्थन करती हैं, जो प्रेम, विश्वास और आपसी सम्मान के बंधन पर जोर देती हैं।