दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, अथिया शेट्टी, अनुष्का शर्मा, प्रियंका चोप्रा आणि रिचा चड्डा या सगळ्यांना पहिली मुलगी झाली.(Bollywood actress) पण रिचा चड्डा म्हणतेय की, लेक झाली तर काय या कल्पनेनेच मला भीती वाटत होती.(Parenting tips) आता तिची मुलगी एक वर्षाची झाली, एका मुलाखतीत तिनं सांगितलं की काही काळ तिला डिप्रेशनचाही त्रास झाला पण मुलगी झाली तर आपण तिचा सांभाळ पुढे भविष्यातही नीट करु ना अशी भीतीही वाटत होती.(Richa Chadha pregnancy fear)
तडतड्या -मस्तीखोर लहान मुलांसाठी खास नाचणी-डिंकाचे लाडू! किडकिडीत मुलंही होतील गुटगुटीत
रिचा म्हणते, बाळ जन्माला येण्याआधीच मी द्विधा मनस्थितीत होते. आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती पाहून मुलगी झाली तर ती सुरक्षित राहील ना असेही विचार मनात आले. पालकत्वाचा प्रवास कोणासाठीही सोपा नसतो. बाहेरच्या जगात जे काही सुरु असतं त्याचा आपल्या मानसिक आणि शारीरिकतेवर परिणाम होत असतो. इतकेच नाही तर गर्भधारणेवेळीही भीती वाटत होती, हवामानात होणारा बदल, जगात सुरु असणारा गोंधळ याचा त्रास होत होता. मूल होणं हा आनंद असतो. जेव्हा आपण स्वतंत्र असतो तेव्हा कोणत्याही नकारात्मक गोष्टींविषयी काही वाटत नाही. पण आपल्या पोटात बाळ असतं, जबाबदारी वाढते तेव्हा मनावर सतत दडपण येतं राहते.
मला मुलगी झाली तेव्हा वाटलं होतं की मला आता बंदूक खरेदी करावी लागेल का?रिचाचं हे म्हणणं ऐकून अर्थातच ती ट्रोल झाली. कुणी म्हणालं एवढी थोडीच काही वाईट परिस्थिती आहे. अतिरेक करतात बोलताना. कुणी म्हणालं, आईला वाटूच शकते भीती. मात्र अशी भीती वाटून ज्या जगात आपण मूल जन्माला घातलं त्याविषयी किती अविश्वास दाखवायचा, किती काळ घाबरुन जगायचं असाही प्रश्न आहेच. प्रश्न असतो पालकांनीही सजगपणे मुलांच्या वाढीकडे पाहण्याचा, त्यांना सुरक्षित भवताल देताना इतरांनाही तसाच भवताल मिळेल याची खबरदारी घेण्याचा. मुलांना योग्य ते संस्कार देताना स्वत:ही तसं वागण्याचा. अतिरेक करुन ना प्रश्न सुटतात ना मुलांसमोर योग्य आदर्श उभे राहतात. तात्पुरतं मुलाखतीत बोलून लाइक्स मिळवण्याइतकं सोपं नसतंच पालकत्व.