धनश्री वर्मा ((Dhanshree Verma) आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत बरीच चर्चेत असते. युजवेंद्र चहलच्या घटस्फोटाच्या चर्चा बरेच दिवस सोशल मीडियावर होत्या. याच दरम्यान धनश्रीची डान्सिंग स्टाईल आणि लांब केस याबाबतसुद्धा सोशल मीडियावर चर्चा होती. लोक त्यांना विचारतात की त्यांच्या लांब, सुंदर दाट केसांचं सिक्रेट काय आहे. (Dhanshree Verma Revels The Secret Of Long And Thick Hairs)
धनश्रीच्या सुंदर केसाचं सिक्रेट नेमकं काय
या पॉडकास्टमध्ये केसांबाबत तिला विचारण्यात आले तेव्हा तिनं सांगितलं की धनश्रीनं फक्त जेनेटिक असा शब्द वापरला. तिनं सांगितलं की कुटुंबातील महिला आणि पुरूषांचेही केस नैसर्गिकरित्या काळे आणि दाट आहेत. म्हणूनच तिला एक्स्ट्रा हेअर केअर उत्पादनांची गरज भासत नाही. पॉडकास्टमध्ये ती म्हणाली की आजकाल लोक हेअर केअरच्या नावावर वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात.
पण यात बरेच केमिकल्स असतात ज्यामुळे केस कमकुवत होऊ लागतात. धनश्री आपल्या केसांसाठी एकच शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करते. सतत नवीन उत्पादनांचा वापर करत नाही. कारण यामुळे केस डॅमेज होऊ शकतात. धनाश्रीच्या मते तुम्ही कोणतं तेल वापरता हीच हेल्दी केसांची योग्य किल्ली आहे. केस धुण्याच्या २ तास आधी डोक्याला तेल लावून ठेवा.
केसांना तेल कधी लावावं?
रात्रभर तेल लावून सकाळी माईल्ड शॅम्पूनं केस धुवा. यामुळे केस मजबूत होतील आणि हेअर फॉल कमी होण्यासही मदत होईल. तिनं पुढे सांगितलं की आठवड्यातून २ वेळा केस धुणं गरजेचं आहे. ज्यामुळे स्काल्पवर घाण, घाम येणार नाही आणि अतिरिक्त तेल काढून टाकलं जाईल याशिवाय केसांमध्ये कोंडा होण्याची समस्याही टाळता येईल. रात्री झोपताना केसांची वेणी बांधायला हवी. पण वेणी जास्त घट्ट असू नये अन्यथा केस तुटू शकतात.