Join us
Daily Top 2Weekly Top 5

केमिकल न वापरताही पांढरे केस नॅचरली करता येतील काळे, कढीपत्ता आणि खोबऱ्याच्या तेलाचा हा उपाय सगळ्यात बेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 11:44 IST

How to blacken white hair Naturally : आपण एक सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय करूनही वेळेआधीच पांढरे झालेले केस काळे करू शकता. यासाठी आपल्याला लागेल फक्त मुठभर कढीपत्ते आणि थोडसं खोबऱ्याचं तेल.

How to blacken white hair Naturally : कमी वयातच केस पांढरे होणं ही आजची एक मोठी गंभीर समस्या बनली आहे. ज्यामुळे कमी वयातच आपण म्हातारे दिसू लागतो. जर वेळीच केसांच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर केस अधिक पांढरे होऊ शकतात. जर आपल्याला पांढरे झालेले केस काळे करायचे असतील तर पार्लरमध्ये जाऊन महागडे डाय लावण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. आपण एक सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय करूनही वेळेआधीच पांढरे झालेले केस काळे करू शकता. यासाठी आपल्याला लागेल फक्त मुठभर कढीपत्ते आणि थोडसं खोबऱ्याचं तेल. हा उपाय कसा करावा हे जाणून घेऊया.

सगळ्यात आधी एका पॅनमध्ये थोडं खोबऱ्याचं तेल काढा. नंतर गॅस सुरू केला. त्यानंतर तेलात मुठभर कढीपत्ते टाका. आता हे मिश्रण चांगलं गरम होऊ द्या. पानांचा रंग काळा होईपर्यंत हे गरम करा. नंतर हे मिश्रण थंड होऊ द्या आणि नंतर काचेच्या बॉटलमध्ये हे मिश्रण स्टोर करा. 

कसा कराल वापर? 

हे तेल केस धुण्याच्या कमीत कमी एक तास आधी केसांवर लावा. चांगला फायदा मिळवण्यासाठी दोन गोष्टींकडे लक्ष द्या. पहिली बाब म्हणजे हे तेल जेव्हाही केसांवर लावाल तेव्हा हलकं कोमट करा आणि दुसरी बाब म्हणजे केस धुण्याच्या एक रात्री आधीच तेलाचा वापर करा. नंतर एखाद्या माइल्ड शाम्पूने केस धुवावे.

कसा मिळतो फायदा? 

भरपूर औषधी गुण असलेल्या या खास तेलाने मेलेनिनचं प्रोडक्शन अधिक वाढतं. हेच कारण आहे की, हे तेल पांढरे केस काळे करण्यासाठी उपयुक्त ठरतं. कढीपत्ते आणि खोबऱ्याच्या तेलाने केसांना पोषण मिळतं. केसांची वाढ करायची असेल, केसगळती थांबवची असेल तर त्यासाठी सुद्धा हे तेल खूप फायदेशीर ठरतं. काही आठवड्यांमध्येच आपल्याला फरक दिसून येईल.  

केस काळे करण्याचा दुसरा उपाय

केस काळे करण्याचा हा उपाय करण्यासाठी १ लिटर पाणी, १० चमचे चहा पावडर किंवा टी बॅग लागतील. एका भांड्यात पाणी टाका. ते उकडण्यासाठी ठेवा. नंतर त्यात चहा पावडर घाला. आता गॅसची आस मध्यम ठेवा आणि पाणी चांगलं उकडू द्या. गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्या. नंतर एका हेअर ब्रशच्या मदतीने हे पाणी केसांसोबत केसांच्या मुळात लावा. हे पाणी आंघोळीच्या ३० मिनिटांआधी लावा. नंतर कोमट पाण्याने केस धुवावे.

English
हिंदी सारांश
Web Title : Naturally Blacken White Hair: Curry Leaves & Coconut Oil Solution

Web Summary : Reverse grey hair naturally with curry leaves and coconut oil. Boil leaves in oil, apply to hair, and wash after one hour. Tea powder rinse is another option.
टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स