आजकाल ताण-तणावामुळे (Stress) लोकांना केसांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. केस गळती थांबवण्यासाठी बाजारात बरीच उत्पादनं आहेत पण या केमिकल्सयुक्त उत्पादनांच्या वापरामुळे केसांचे नुकसानही होऊ शकते. काही घरगुती उपाय करून तुम्ही केस गळतीची समस्या टाळू शकता.
या उपायानं फक्त तुमचे केस चांगले होणार नाहीत तर चेहऱ्यावरही ग्लो येईल. योग गुरू कैलाश बिश्नोईनं आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतील दाव्यानुसार काही दिवसांतच याचा रिजल्ट दिसून येतो. (Yoguru Kailash Bishnoi Recommended Healthy Drink To Stop Hairfall Know How To Make It)
हे हेल्दी ड्रिंक कसं तयार करावं?
हे हेल्दी ड्रिंक तयार करण्यासाठी तुम्हाला सफरचंद, डाळिंब, बीट, गाजर, आवळा हे पदार्थ घ्यावे लागतील. हेअरफॉल रोखणारे हे हेल्दी ड्रिंक तयार करणं खूपच सोपं आहे यासाठी तुम्हाला पाच पदार्थ मिक्सरमधून एकत्र बारीक करून घ्यावे लागतील. तेव्हा या पदार्थांचा ज्यूस तयार होईल. हा ज्यूस रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. हे ड्रिंक मिक्सरमधून फिरवल्यानंतर गाळू नका.
योगगुरू सांगतात की या ड्रिंकच्या सेवनानं केस गळणं कमी होते तसंच केस मजबूतही होतात. याशिवाय या ड्रिंकमध्ये व्हिटामीन, मिनरल्स, एंटी ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे केस हेल्दी राहण्यास मदत होते. याशिवाय शरीरातील टॉक्सिन्स निघून त्वचा ग्लोईंग दिसण्यास मदत होते. चेहऱ्याचा नॅच्युरल ग्लो वाढवण्यासाठी तुम्ही या ड्रिंकचे नियमित सेवन करू शकता.
ओटी पोट लटकतंय-फिगरच बिघडली? सकाळी उठल्यावर १ काम करा-मेणासारखी वितळेल चरबी
बीटामध्ये नायट्रेट्स असतात जे टाळूच्या भागातील रक्ताभिसरण वाढवतात. यामुळे केसांच्या मुळांना पुरेसं ऑक्सिजन आणि पोषण मिळतं. ज्यामुळे केस गळणं कमी होतं. बीट हा लोहाचा उत्तम स्त्रोत आहे शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे अनेकदा केस गळतात. बीटाचा रस प्यायल्यानं रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि केस मजबूत होतात.
पाय दुखेपर्यंत चालता पण पोट कमीच होईना? वॉकनंतर 5 गोष्टी करा, पटकन बारीक व्हाल
व्हिटामीन सी साठी लिंबू, संत्री किंवा आवळा यांसारखी फळं खाल्ल्यानं त्यातून भरपूर व्हिटामीन सी मिळते. व्हिटामीन शरीरात लोह शोषून घेण्यास मदत करते आणि कोलोजनची निर्मिती वाढवते. ज्यामुळे केसांची लवचिकता टिकून राहते. बीटामधील एंटी ऑक्सिडेंट्स आणि दाहशामक गुणधर्म टाळूवरील खाज आणि कोंडा कमी करण्यास मदत करतात. फळांच्या रसातील पोषक घटकांमुळे नैसर्गिक चकाकी मिळते आणि केसांचा पोत सुधारतो.
