Join us

अकाली पांढरे झालेले केस काळे करण्याचा रामबाण उपाय, कही दिवसातच दिसून येईल फरक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 09:51 IST

White Hair : एका प्रभावी उपाय योगगुरू दीपक शर्मा यांनी शेअर केला आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला घरातीलच काही गोष्टींची गरज लागेल.

Hair Care: केस पांढरे होण्याची समस्या आजकाल चांगलीच गंभीर बनली आहे. योग्यपणे केसांची काळजी न घेणे, केमिकल्सचा वापर, वाढतं वय या आणि इतरही काही कारणांनी केस पांढरे होतात. अशात कमी वयातच पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. ज्यांचा फायदा होतोच असं नाही. मात्र, काही एक्सपर्टनी सांगितलेले काही उपाय असे आहेत पांढरे केस काळे करण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. 

असाच एका प्रभावी उपाय योगगुरू दीपक शर्मा यांनी शेअर केला आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला घरातीलच काही गोष्टींची गरज लागेल. त्यामुळे तुम्हाला वेगळा खर्चही करण्याची गरज पडणार नाही. चला जाणून घेऊ काय आहे हा उपाय...

पांढरे केस काळे करण्याचा उपाय

योग गुरूंनी सांगितलं की, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटी मोहरीचं तेल, एक चमचा हळद आणि एक चमचा कॉफी पावडर लागेल. या गोष्टी चांगल्या मिक्स करा. हे मिश्रण तव्या टाकून चांगलं होऊ द्या. नंतर त्यात लिंबाचा रस टाकून पेस्ट करा. हे पेस्ट कोमट असेल तेव्हा केसांवर लावल्यास नॅचरल काळा रंग मिळण्यास मदत होईल. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता.

इतरही काही उपाय

केस गडद काळे करण्यासाठी इतरही काही उपाय आहेत. असाच एक उपाय म्हणजे आवळा. पांढरे केस काळे करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात आवळा कापून टाका आणि हे तेल गरम करा. आवळा चांगला शिजल्यावर गॅस बंद करा. हे तेल केसांवर नियमितपणे लावा. काही दिवसात पांढरे केस काळे झालेले दिसतील.

काळ्या कलौंजीला बारीक करून खोबऱ्याच्या तेलात टाका आणि हे तेल गरम करा. तेल थंड झाल्यावर केसांवर लावा. यानंही केस काळे करण्यास मदत मिळेल.

कढीपत्ते आणि खोबऱ्याचं तेलाचं मिश्रण सुद्धा पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी फायदेशीर ठरतं. कढीपत्त्यातील औषधी गुण केसांना नॅचरल काळा रंग देतात. तसेच केसांना मुळापासून मजबूत करतात.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स