Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > यामी गौतमच्या सौंदर्याचं सिक्रेट- 'एक चुटकी हलदी'! तिच्यासारखं सुंदर दिसायचं तर 'या' पद्धतीने हळद लावा.. 

यामी गौतमच्या सौंदर्याचं सिक्रेट- 'एक चुटकी हलदी'! तिच्यासारखं सुंदर दिसायचं तर 'या' पद्धतीने हळद लावा.. 

Yami Gautam Shared Her Beauty Secret: अभिनेत्री यामी गौतम हिच्यासारखी चमकदार, सुंदर त्वचा हवी असेल तर नेमकं काय करायला हवं ते पाहा..(Yami Gautam shared her turmeric face mask tips)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2026 16:37 IST2026-02-07T16:36:51+5:302026-02-07T16:37:59+5:30

Yami Gautam Shared Her Beauty Secret: अभिनेत्री यामी गौतम हिच्यासारखी चमकदार, सुंदर त्वचा हवी असेल तर नेमकं काय करायला हवं ते पाहा..(Yami Gautam shared her turmeric face mask tips)

yami gautam shared her beauty secret, beauty tips by yami gautam, yami gautam shared her turmeric face mask tips  | यामी गौतमच्या सौंदर्याचं सिक्रेट- 'एक चुटकी हलदी'! तिच्यासारखं सुंदर दिसायचं तर 'या' पद्धतीने हळद लावा.. 

यामी गौतमच्या सौंदर्याचं सिक्रेट- 'एक चुटकी हलदी'! तिच्यासारखं सुंदर दिसायचं तर 'या' पद्धतीने हळद लावा.. 

Highlightsभारतातच नाही तर जगभरात सौंदर्योपचारांसाठी हळद वापरली जाते. त्याच हळदीचा वापर यामी कसा करते ते पाहूया...

अभिनेत्री यामी गौतम ही मुळची हिमाचल प्रदेशची. आता तिथल्या थंडगार, शुद्ध हवेत ती वाढलेली असल्याने त्याचा परिणाम साहजिकत तिच्या त्वचेवर दिसून येतो. पण तरीही वयानुसार त्वचेमध्ये होणाऱ्या बदलांसाठी ती देखील अपवाद नाही. पण हे बदल आपल्या चेहऱ्यावर फार दिसू नयेत यासाठी ती एक अगदी सोपा उपाय करते. हा उपाय बहुतांश भारतीय लोक वर्षांनुवर्षांपासून करत आलेले आहेत. तो उपाय आहे हळदीचा. आपल्याला माहितीच आहे की हळद जशी आरोग्यासाठी गुणकारी असते तशीच ती त्वचेसाठी सौंदर्यवर्धक असते (Yami Gautam Shared Her Beauty Secret). म्हणूनच तर आता भारतातच नाही तर जगभरात सौंदर्योपचारांसाठी हळद वापरली जाते. त्याच हळदीचा वापर यामी कसा करते ते पाहूया...(Yami Gautam shared her turmeric face mask tips)

 

सौंदर्य खुलविण्यासाठी यामी गौतम वापरते हळद

यामी गौतमच्या एका मुलाखतीचा भाग नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तिने तिच्या ब्यूटी टिप्स शेअर केल्या आहेत.

फुलझाडांची छाटणी केल्यानंतर २ गोष्टी करायलाच हव्यात, तरच रोपं वाढतील जोमाने- फुलंही येतील भरपूर

यामी म्हणते की तिची आई लहानपणापासून हळदीचे वेगवेगळे फेसपॅक करते आणि ते यामीला लावण्यासाठी देते. हळदीसोबत दुसरं काही मिळालं नाही तर फक्त हळद आणि पाणी किंवा हळद आणि दूध एकत्र करून चेहऱ्यावर हळूवारपणे चोळलं तरी तुमच्या चेहऱ्यात लगेच खूप चांगला फरक दिसून येतो असं ती सांगते.

 

यामी म्हणते की अमेरिकेतही आता हळदीचं महत्त्व लोकांच्या लक्षात आलं असून तिथे तर टरमरिक शॉट्स पिण्यासाठी मिळतात. हे शॉट्स म्हणजे आपण नेहमी पितो तेच हळदीचं दूध होय.

पोट नेहमीच जड- फुगलेलं वाटतं? ५ गोष्टी चुकूनही करू नका, अपचनाचा त्रास कायमचा जाईल

हळदीचं दूध आणि हळद घालून तयार केलेले वेगवेगळे घरगुती फेसमास्क यामुळे त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यात खूप मदत होते, असं यामीचं स्पष्ट मत आहे. 


 

Web Title : यामी गौतम का सौंदर्य रहस्य: दमकती त्वचा के लिए एक चुटकी हल्दी।

Web Summary : हिमाचल की मूल निवासी यामी गौतम अपनी चमकदार त्वचा का श्रेय हल्दी फेस पैक को देती हैं। अपनी माँ की सलाह पर चलते हुए, वह हल्दी को पानी या दूध में मिलाकर लगाती हैं। हल्दी के सौंदर्य लाभों और स्वस्थ त्वचा बनाए रखने में इसके उपयोग को मानती हैं।

Web Title : Yami Gautam's beauty secret: A pinch of turmeric for glowing skin.

Web Summary : Yami Gautam, originally from Himachal, attributes her radiant skin to a simple turmeric face pack. Following her mother's advice, she mixes turmeric with water or milk and gently applies it, highlighting turmeric's global recognition for beauty benefits and its use in maintaining healthy skin.