Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > यामी गौतम म्हणते, आजीचे पारंपरिक घरगुती उपाय देतात नितळ त्वचा! सुंदर त्वचेसाठी क्रीम, ब्यूटी ट्रिटमेंट्स नकोच...

यामी गौतम म्हणते, आजीचे पारंपरिक घरगुती उपाय देतात नितळ त्वचा! सुंदर त्वचेसाठी क्रीम, ब्यूटी ट्रिटमेंट्स नकोच...

Yami Gautam Shares Her DadiMas Beauty Secrets For Skin & Hair : yami gautam beauty secrets : अभिनेत्री यामी गौतम, त्वेचेसाठी आजीने सांगितलेल्या घरगुती उपायांमध्ये नेमकं काय करते ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2025 14:38 IST2025-11-04T14:37:07+5:302025-11-04T14:38:28+5:30

Yami Gautam Shares Her DadiMas Beauty Secrets For Skin & Hair : yami gautam beauty secrets : अभिनेत्री यामी गौतम, त्वेचेसाठी आजीने सांगितलेल्या घरगुती उपायांमध्ये नेमकं काय करते ते पाहा...

yami gautam beauty secrets Yami Gautam Shares Her DadiMas Beauty Secrets For Skin & Hair | यामी गौतम म्हणते, आजीचे पारंपरिक घरगुती उपाय देतात नितळ त्वचा! सुंदर त्वचेसाठी क्रीम, ब्यूटी ट्रिटमेंट्स नकोच...

यामी गौतम म्हणते, आजीचे पारंपरिक घरगुती उपाय देतात नितळ त्वचा! सुंदर त्वचेसाठी क्रीम, ब्यूटी ट्रिटमेंट्स नकोच...

कित्येक बॉलिवूड अभिनेत्री सुंदर, चमकदार आणि निखळ त्वचा मिळवण्यासाठी महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्सची आणि ट्रीटमेंटची मदत घेतात. बऱ्याचशा अभिनेत्री त्यांच्या त्वचेसाठी हजारो - लाखो रुपये खर्च करतात. पण, बॉलिवूडची अभिनेत्री यामी गौतम मात्र याला अपवाद आहे. यामीच्या चेहऱ्यावरील निखळ तेज आणि   नैसर्गिक सौंदर्य पाहून अनेकजण थक्क होतात. यामीच्या त्वचेवरील तेज आणि सौंदर्य पाहून तिची त्वचा इतकी सुंदर व देखणी कशी असा प्रश्न अनेकींना पडतो. यामी आपल्या त्वचेची योग्य ती काळजी घेण्यासाठी महागडे किंवा आर्टिफिशियल उपाय करण्यापेक्षा, तिच्या आजीने सांगितलेले पारंपरिक आणि घरगुती उपाय करणेच पसंत करते(yami gautam beauty secrets).

यामीच्या नैसर्गिक सौंदर्याचे सिक्रेट कोणत्याही महागड्या ब्यूटी ट्रिटमेंट्समध्ये नसून तिच्या आजीने सांगितलेल्या पारंपरिक आणि नैसर्गिक उपयांमध्येच दडले आहे. तिने लहानपणापासून ऐकलेले आणि घरच्याघरी केलेले उपाय आजही ती आपल्या स्किनकेअर रूटीनचा भाग ठेवते. त्यामुळेच तिचा चेहरा नेहमी नैसर्गिकरित्या उजळलेला दिसतो. बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किनकेअर ब्यूटी प्रॉडक्ट्सपासून दूर राहून यामी आजही सुंदर त्वचेसाठी घरगुती उपाय करताना दिसते.  तिच्या आजीने सांगितलेल्या घरगुती ब्यूटी (Yami Gautam Shares Her DadiMas Beauty Secrets For Skin & Hair) टिप्समध्ये ती नेमकं काय करते ते पाहूयात... 

यामी स्किनकेअर रुटीनमध्ये करते तिच्या आजीने सांगितलेले खास उपाय... 

१. स्किन टोनिंगसाठी नारळाचे पाणी :- यामी आपली त्वचा नैसर्गिकरित्या टोन करण्यासाठी नारळाच्या पाण्याचा वापर करते. ती सांगते की नारळाचे पाणी त्वचेला हायड्रेट करते आणि आतून पोषण देते. तसेच, सुरकुत्या, त्वचेवरील डाग, पिंपल्स यांसारख्या समस्यांचे प्रमाणही कमी करते. नियमितपणे नारळाचे पाणी त्वचेला लावल्याने चेहरा मऊ, मुलायम आणि चमकदार दिसू लागतो.

२. स्क्रबिंगमध्ये हळदीची जादू :- चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी यामी घरगुती स्क्रब तयार करते. यासाठी ती हळद, साखर आणि थोडे पाणी  एकत्र करून पेस्ट बनवते. हळदीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला निरोगी आणि नैसर्गिकरित्या सुंदर ठेवण्यास मदत करतात. यामी म्हणते की हा स्क्रब फळत त्वचा साफ करत नाही, तर त्वचेला तजेलदारपणा आणि फ्रेश ठेवतो.

कोपर, मान, ढोपर, गुडघे दिसतात काळेकुट्ट ? १ घरगुती पॅक करेल जादू - काळवंडलेली त्वचाही दिसेल उजळ, चमकदार...  

३. चेहऱ्याला मसाज करण्याची खास पद्धत :- यामी दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला मसाज करते, ज्यामुळे त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा निरोगी राहते. ती यासाठी एक खास मिश्रण वापरते, ज्यात एरंडेल, बदाम तेल आणि कोरफड जेल एकत्रित मिसळलेले असते. ही पेस्ट थोडी बोटांवर घेऊन हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचा शांत होते, त्वचेला चमक येते आणि वृद्धापकाळामुळे येणारे डाग, एजिंगच्या खुणा हळूहळू कमी करण्यास मदत करते. 

४. ओठांवर लावते साजूक तूप :- आपले ओठ मुलायम आणि ओलावा टिकवून ठेवण्यासाठी यामी रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर साजूक तूप लावते. हा फार जुना परंतु पारंपरिक उपाय आहे, जो ओठांना भेगा पडण्यापासून किंवा कोरडे होण्यापासून वाचवतो. तूपातील नैसर्गिक फॅटी अ‍ॅसिड ओठांना खोलवर पोषण देतात. यामी म्हणते की हा उपाय खरोखरच परिणामकारक आणि फायदेशीर आहे.

कंगना, आलिया रोज खातात चमचाभर काळ्या बिया! स्किन दिसते ग्लोइंग - मेंदू व हृदयाचेआरोग्यही राहते उत्तम... 

५. केसांसाठी व्हिनेगर आहे फायदेशीर :- केसांसाठी यामी हेअर केअर रुटीन मध्ये व्हिनेगरचा वापर करते. ती आठवड्यातून दोनदा केसांना शाम्पू करते आणि केसांना चमकदार करण्यासाठी अ‍ॅप्प सायडर व्हिनेगरचा वापर करते. व्हिनेगरमध्ये असलेले सायट्रिक अ‍ॅसिड केसांना मजबूत बनवते, तसेच त्यांना मऊ आणि रेशमी करते. यासोबतच, ती केसांवर हीट स्टायलिंग टूल्सचा वापरही खूप कमी करते, जेणेकरून केसांचे नैसर्गिक सौंदर्य कायम चांगले टिकून राहते.

 

Web Title : यामी गौतम ने निखरी त्वचा के लिए दादी माँ के ब्यूटी सीक्रेट्स बताए।

Web Summary : यामी गौतम अपनी त्वचा की देखभाल के लिए महंगे उत्पादों के बजाय दादी माँ के घरेलू नुस्खों को पसंद करती हैं। वह टोनर के रूप में नारियल पानी, स्क्रबिंग के लिए हल्दी और मालिश के लिए तेलों का मिश्रण इस्तेमाल करती हैं। होंठों के लिए घी और बालों के लिए सिरका भी उनकी पसंद हैं।

Web Title : Yami Gautam reveals her grandma's skincare secrets for radiant skin.

Web Summary : Yami Gautam prefers traditional home remedies over expensive products for her skincare. She uses coconut water as a toner, turmeric for scrubbing, and a blend of oils for massage. Ghee for lips and vinegar for hair are also her favorites.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.