आपले शारीरिक आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारासोबतच पुरेशी झोपही तितकीच महत्वाची असते. दररोज पुरेशी झोप घेतल्याने आरोग्यासोबतच आपली त्वचा देखील सुंदर दिसू लागते. आपण सततच्या या बिझी आणि बदलत्या लाईफस्टाईलमध्ये, अनेकदा पुरेश झोप घेण्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु आपल्या त्वचेच्या सौंदर्यासाठी झोपेची योग्य पद्धत किती महत्त्वाची (wrong sleeping position effects on skin) आहे हे अनेकांना माहीत नसते. चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या, फाइन लाईन्स आणि त्वचा सैल पडण्याची समस्या लवकर दिसू लागते. त्यामुळे कमी वयातच चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू शकतात(best sleeping position for skin).
बरेचदा आपण आहार आणि व्यायामाकडे लक्ष देतो, पण 'कोणत्या पोझिशनमध्ये झोपतो' याकडे मात्र दुर्लक्ष करतो. रात्रीची एक चुकीच्या पद्धतीने झोपण्याची पोझिशन त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य हिरावून घेऊ शकते. अकाली येणाऱ्या सुरकुत्या टाळण्यासाठी आणि त्वचेचे आयुष्य वाढवण्यासाठी महागड्या स्किन केअर रूटीनपेक्षा 'योग्य पोझिशनमध्ये झोपण्याची पद्धत' हा सर्वात स्वस्त (best sleeping position for skin) आणि फायदेशीर उपाय आहे. योग्य पद्धतीने झोपण्याची सवय लावली, तर त्वचेला आवश्यक विश्रांती मिळते, त्वचेची नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रिया सुधारते आणि त्वचा अधिक तजेलदार व तरुण दिसू लागतो. म्हणूनच, सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी केवळ स्किनकेअर पुरेसे नाही, तर झोपण्याची योग्य पद्धत देखील तितकीच महत्वाची असते. चिरतरुण आणि चमकदार त्वचा हवी असेल, तर तुमच्या झोपण्याची योग्य पोझिशन (anti aging sleep position tips) नेमकी कोणती असावी ते पाहूयात...
झोपण्याची पोझिशन आणि त्वचेचा काय संबंध...
ज्या पोझिशनमध्ये झोपल्यामुळे तुम्हाला शांत झोप लागतेय असं वाटतंय, तीच पद्धत कदाचित तुमच्या त्वचेवर सुरकुत्या येण्याचं मुख्य कारण ठरत असावी. 'एस्थेटिक सर्जरी जर्नल' (Aesthetic Surgery Journal) मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, झोपण्याची चुकीची पद्धत केवळ तुमची मान किंवा पाठच दुखवत नाही, तर ती तुम्हाला वेळेच्या आधीच 'म्हातारे' करु शकते. आपण तासंतास एकाच बाजूने किंवा चुकीच्या स्थितीत झोपल्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर सतत दबाव येतो, ज्यामुळे कायमस्वरूपी सुरकुत्या पडू लागतात.
तूप फक्त चवीसाठी नाही, तर स्त्रियांच्या 'या' ६ समस्यांवर गुणकारी! चमचाभर तूप 'असं' खाणं ठरेल अमृत...
झोपण्याची पद्धत आणि चेहऱ्याची ठेवण...
जेव्हा आपण कुशीवर किंवा पोटावर पालथे झोपतो, तेव्हा आपल्या चेहऱ्याची नाजूक त्वचा आणि उशी यांच्यात सतत संपर्क राहतो. या दरम्यान चेहऱ्याच्या त्वचेवर तीन प्रकारचे 'फोर्सेस' काम करतात, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होते.
१. कम्प्रेशन (Compression - दाब) :- झोपताना त्वचेचा भाग उशीवर दबला गेल्यामुळे त्वचेवर ताण येतो.२. टेंशन (Tension - ओढणे) :- एकाच बाजूला झुकल्यामुळे त्वचा एका बाजूला खेचली जाते.३. शियर फोर्सेस (Shear Forces - घर्षण) :- झोपेत हालचाल करताना त्वचा आणि उशीमध्ये होणाऱ्या घासण्यामुळे त्वचेला इजा पोहोचते.
या तिन्ही गोष्टींमुळे चेहऱ्यावर कायमस्वरूपी रेषा उमटतात, ज्याला आपण सुरकुत्या म्हणतो.
जेव्हा आपण तासंतास एकाच कुशीवर झोपतो, तेव्हा या 'फोर्सेस'मुळे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचा दबली जाते, ज्यामुळे त्वचेचा नैसर्गिक आकार बिघडतो. कमी वयात त्वचेमध्ये लवचिकता चांगली असल्याने झोपेतून उठल्यावर त्वचा पुन्हा नॉर्मल होते. परंतु, वयाची ३० वर्षे ओलांडल्यानंतर जसे शरीरातील कोलेजन (Collagen) कमी होऊ लागते, तशी ही लवचिकताही मंदावते. परिणामी, झोपताना चेहऱ्यावर पडणाऱ्या या 'स्लीप लाइन्स' हळूहळू कायमस्वरूपी सुरकुत्यांमध्ये (Wrinkles) बदलतात आणि आपण अकाली वृद्ध दिसू लागतो.
वेगवेगळ्या पोझिशन्स आणि त्यांचे त्वचेवर होणारे परिणाम...
१. पोटावर पालथे झोपणे (Stomach Sleeping) :- ही पद्धत त्वचेसाठी सर्वात घातक मानली जाते. यामध्ये तुमचा चेहरा पूर्णपणे उशीमध्ये दबलेला असतो, ज्यामुळे त्वचेला श्वास घेण्यास जागा मिळत नाही आणि संपूर्ण चेहऱ्यावर सारखा दबाव पडतो. यामुळे केवळ सुरकुत्याच वाढत नाहीत, तर डोळ्यांखाली सूज येण्याचे हे एक मुख्य कारण ठरते.
२. कुशीवर (एका अंगावर) झोपणे (Side Sleeping) :- बहुतेक लोक याच पद्धतीने झोपतात. यामध्ये प्रामुख्याने गाल आणि हनुवटीवर जास्त दबाव पडतो. त्यामुळे जे लोक नेहमी एकाच कुशीवर झोपतात, त्यांच्या चेहऱ्याच्या त्या विशिष्ट भागावर दुसऱ्या बाजूच्या तुलनेत जास्त खोलवर रेषा आणि सुरकुत्या दिसू लागतात.
३. पाठीवर उताणे झोपणे (Back Sleeping) :- सुरकुत्या आणि फाईनलाइन्स टाळण्यासाठी पाठीवर झोपणे ही सर्वात परफेक्ट पद्धत आहे. यामध्ये तुमचा चेहरा उशीच्या थेट संपर्कात येत नाही, ज्यामुळे त्वचेवर कोणताही अतिरिक्त दबाव पडत नाही. त्वचा नैसर्गिकरीत्या रिलॅक्स राहते आणि अकाली वृद्धत्वाचा धोका कमी होतो.
Web Summary : Proper sleep is crucial for skin health. Sleeping position impacts wrinkles; back sleeping is best. Avoid stomach or side sleeping to minimize pressure and maintain youthful skin.
Web Summary : त्वचा के स्वास्थ्य के लिए पर्याप्त नींद ज़रूरी है। सोने की स्थिति झुर्रियों को प्रभावित करती है; पीठ के बल सोना सबसे अच्छा है। दबाव कम करने और युवा त्वचा बनाए रखने के लिए पेट या करवट से सोने से बचें।