Join us

हिवाळ्यात ओठ मुलायम ठेवण्यासाठी करा 'हे' घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2024 11:12 IST

Winter Care Tips : जास्तीत जास्त लोकांना ही समस्या होते. अशात ओठांमधून रक्त येणे, मास निघणे यामुळे वेदनाही होतात. ही समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात.

Winter Care Tips : हिवाळ्यात थंड वातावरणामुळे अनेकदा ओठ उलतात किंवा फाटतात. जास्तीत जास्त लोकांना ही समस्या होते. अशात ओठांमधून रक्त येणे, मास निघणे यामुळे वेदनाही होतात. ही समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. पण त्या उपायांनी आराम मिळेलच असं नाही. अशात आज आम्ही तुम्हाला ओठांची ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. 

घरगुती उपाय

तूप किंवा लोणी - तूप आणि लोणी त्वचेसाठी या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या असतात. हिवाळ्यात रात्री झोपण्याआधी तूप किंवा लोणी ओठांवर लावा. या गोष्टी नॅचरल मॉइश्चरायजरसारखं काम करतात आणि याने ओठ मुलायम होण्यास मदत मिळते.

मध - मध एक नॅचरल हायड्रेटिंग एजंट आहे आणि यात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुणही भरपूर असतात. मध ओठांवर लावा आणि काही वेळाने ओठ धुवून घ्या. याने ओठ मुलायम आणि निरोगी राहतात.

खोबऱ्याचं तेल - खोबऱ्याच्या तेलामध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे कोरडे आणि फाटलेले ओठ बरे करण्यास मदत करतात. हिवाळ्यात ओठांवर खोबऱ्याचं तेल रात्री लावा.

आयुर्वेदिक उपाय 

तिळाचं तेल - आयुर्वेदात तिळाच्या तेलाचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. याने ओठ मुलायम होतात आणि ओठ फाटण्याची समस्याही दूर होते.

बदाम तेल - बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. ज्यामुळे ओठ मुलायम होतात. रोज रात्री झोपण्याआधी ओठांवर हे तेल लावावे.

गुलाब जल - गुलाब जलमध्ये त्वचेला पोषण देणारे आणि मुलायम करणारे गुण असतात. अशात गुलाब जल कापसाच्या मदतीने ओठांवर लावा. याने ओठ हायड्रेटेड राहतात आणि ओठांवरील सूजही कमी होते.

कापूर आणि मोहरीचं तेल - कापूर आणि मोहरीच्या तेलाच्या मिश्रणाने ओठ मुलायम होतात. तसेच याने ओठांना आरामही मिळतो. कापरामुळे ओठांची जळजळ कमी होते आणि मोहरीचं तेल ओठांना मुलायम करतात. 

टॅग्स :थंडीत त्वचेची काळजीत्वचेची काळजी