सुंदर आणि गुलाबी ओठ फक्त सौंदर्याचे प्रतीक नसतात तर आपल्याला चेहऱ्याचा आणि आरोग्याचा आरसा देखील असतात.(Skin care Tips) पण आपल्याकडे अनेकदा दिसून येते की अनेक भारतीय लोकांचे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी नसून ते काहीसे काळपट किंवा गडद रंगाचे असतात.(Lips care) अनेकजण हा काळेपणा लपवण्यासाठी लिपस्टिक किंवा महागड्या लिप बामचा आधार घेतात. पण यामुळे ओठ काही गुलाबी होत नाही. (Why Indians have dark lips AIIMS doctor)नुकताच AIIMS (एम्स) च्या तज्ज्ञ डॉक्टरांनी यावर मत मांडले. भारतीयांच्या ओठांचा रंग गुलाबी नसण्यामागे केवळ बाह्य कारणे नसून जनुकीय रचना आणि हवामान यांचाही मोठा वाटा असल्याचे स्पष्ट केले आहे.(How to lighten dark lips permanently) ओठ काळवडण्यामागे कोणती चूक कारणीभूत आहे आणि पुन्हा नैसर्गिक गुलाबीपणा मिळवण्यासाठी वैद्यकीय दृष्टिकोनातून कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
AIIMS च्या तज्ज्ञांच्या मते, ओठांच्या रंगावर अनेक गोष्टींचा परिणाम होतो. भारतीयांच्या त्वचेत मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य नैसर्गिकरित्या जास्त असते. हे मेलॅनिन आपल्याला सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवण्यास मदत करते. ज्याच्या त्वचेच मेलॅनिन जास्त असते. त्यांच्या ओठांचा रंग गुलाबा असण्याऐवजी तो डार्क किंवा काळपट असतो. हे पूर्णपणे नैसर्गिक आणि जनुकीय आहे. ओठांची त्वचा नाजूक असते. जेव्हा आपण उन्हात फिरतो तेव्हा सूर्यप्रकाशामुळे ओठांवरील मेलॅनिन वाढते. ज्याला हायपरपिग्मेंटेशन म्हणतात. ज्यामुळे ओठ अधिक काळे दिसू लागतात.
अनेकांना ओठ वारंवार जिभेने ओले करण्याची सवय असते. लाळेमध्ये काही अशी एन्झाईम्स असतात जी ओठांच्या वरच्या नाजूक थराला हानी पोहोचवतात. यामुळे ओठ अधिक कोरडे आणि काळे पडतात. शरीरात पाण्याची कमतरता किंवा डिहायड्रेशन झाल्यावर सगळ्यात जास्त परिणाम ओठांवर होतो. ओठ कोरडे पडल्यामुळे त्यांची चमक निघून जाते आणि ते काळपट दिसू लागतात. सिगारेटमधील निकोटीन आणि बेंझोपायरीनमुळे ओठांचे रक्ताभिसरण बिघडते आणि ओठ काळे पडतात. तसेच चहा किंवा कॉफीचे अतिसेवनही ओठांच्या रंगावर परिणाम करते.
ओठांची काळजी कशी घ्यावी?
1. घराबाहेर पडताना साधे लिप बाम न लावता, ज्यामध्ये SPF 30+ असेल असे सनस्क्रीनयुक्त लिप बाम वापरा. हे सूर्याच्या किरणांपासून ओठांचे रक्षण करेल.
2. ओठांवरील मृत त्वचा (Dead skin) काढण्यासाठी आठवड्यातून एकदा साखर आणि मधाचा वापर करून हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते.
3. दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्यायला हवे. हायड्रेटेड राहिल्यामुळे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ राहतात.
4. रात्री झोपण्यापूर्वी ओठांवरील मेकअप पूर्णपणे काढा आणि बदाम तेल (Almond Oil) किंवा साजूक तुपाने ओठांना मसाज करा. बदामाच्या तेलातील 'व्हिटॅमिन ई' काळेपणा कमी करण्यास मदत करते.
Web Summary : Indian lip color is genetic, influenced by melanin and climate. Avoid licking lips, stay hydrated, and limit smoking. Use SPF lip balm and almond oil for care.
Web Summary : भारतीय होंठों का रंग आनुवंशिक है, मेलानिन और जलवायु से प्रभावित। होंठ चाटने से बचें, हाइड्रेटेड रहें और धूम्रपान सीमित करें। एसपीएफ़ लिप बाम और बादाम तेल का उपयोग करें।