Join us
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत चेहरा काळवंडलाय, सुरकुत्या- कोरडा पडला? 'या' ७ सवयी आजच बदला, त्वचा होईल सॉफ्ट-रंगही उजळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2025 12:18 IST

Winter skincare tips: Dry skin in winter remedies: Winter face care routine: कोणत्या ७ सवयी बदलल्यानंतर आपली त्वचा सॉफ्ट, ग्लो आणि उजळ दिसेल

थंडी सुरु झाली की सगळ्यात जास्त त्रास आपल्या त्वचेला होतो. हवेतील कोरडेपणा वाढला की त्वचा ओढल्यासारखी वाटते,रंग काळवंडल्यासारखा दिसतो.(Winter skincare tips) सुरकुत्या आधीपेक्षा जास्त दिसू लागतात. यामुळे चेहऱ्याची नैसर्गिक चमक पूर्णपणे हरवते.(Dry skin in winter remedies) हे सगळं अचानक होत नाही, तर आपल्या रोजच्या काही छोट्या सवयींचा देखील त्यावर मोठा परिणाम होत असतो.(Winter face care routine) थंडीमुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होतं ज्यामुले कोरडेपणा वाढतो.(How to reduce winter dryness) चेहरा फिका, राठ आणि थकल्यासारखा वाटतो. ड्रायनेसमुळे त्वचेवरील सुरकुत्या देखील स्पष्टपणे दिसू लागतात. कोणत्या ७ सवयी बदलल्यानंतर आपली त्वचा सॉफ्ट, ग्लो आणि उजळ दिसेल पाहूया.(Winter face darkening solution) 

हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा 'ही' क्रीम, आठवड्याभरात सुरकुत्या होतील कमी, त्वचेवर येईल तेज- ड्रायनेसही दूर

1. हिवाळ्यात वातावरणात गारवा असल्यामुळे आपण शक्यतो गरम पाण्याचा वापर करतो. पण गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकतं. ज्यामुळे चेहरा अधिक कोरडा आणि काळवंडलेला दिसू लागतो. चेहरा फक्त कोमट किंवा थंड पाण्याने धुवा. ही छोटी सवय बदलली की ओलावा टिकून राहिल. 

2. थंडीच्या दिवसात त्वचेची जास्त काळजी घ्यायला हवी. यासाठी चेहरा धुतल्यानंतर २ मिनिटांत मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचेतील पाणी कमी होणार नाही आणि चेहरा सॉफ्ट राहतो. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावायला विसरु नका. 

लग्नात नवरीच्याच नाहीतर ताई-वहिनी-नणंदबाईंच्या गळ्यातही शोभून दिसतो चोकर! पाहा ५ सुंदर डिझाइन्स

3. अनेकांना असं वाटतं की थंडीत आपण जास्त उन्हात राहावं. त्यामुळे आपण सनस्क्रीनचा वापर करत नाही. सूर्याचे अतिनिल किरण त्वचेला नुकसान पोहोचवतात. सनस्क्रीन न लावल्याने रंग काळवंडतो, पिग्मेंटेशन वाढतं, सुरकुत्या दिसू लागतात. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी सनस्क्रीन लावायला विसरु नका. 

4. हिवाळ्यात थंड वातावरण असल्यामुळे दोनपेक्षा जास्त वेळा फेसवॉश वापरल्याने त्वचा कोरडी आणि लालसर पडते. दिवसातून दोन वेळा चेहरा स्वच्छ करा. 

5. थंडीमध्ये तहान कमी लागते. त्यामुळे आपण कमी प्रमाणात पाणी पितो. पण यामुळे त्वचा डिहायड्रेट होऊन काळी पडते किंवा सुरकुत्या येऊ शकतात. त्यासाठी दिवसातून ७ ते ८ ग्लास पाणी प्या. 

6. हिवाळ्यात फक्त क्रीम, मॉइश्चयराझर पुरेस नसतं. यासाठी आपण फेस ऑइल आणि सिरमचा देखील वापर करायला हवा. 

7. कोरडी त्वचा दिसली की आपण हाताने चेहरा चोळतो, स्क्रब जास्त वापरतो. ही सवय त्वचेला जास्त नुकसान करणारी आहे.हिवाळ्यात आठवड्यातून एकदाच सौम्य स्क्रब वापरा. या सवयी बदलल्यास आपली त्वचा सॉफ्ट, हायड्रेटेड आणि उजळ दिसण्यास मदत होईल. तसेच सुरकुत्या देखील कमी होतील.  

English
हिंदी सारांश
Web Title : Reverse winter skin woes: 7 habits for soft, radiant skin.

Web Summary : Combat winter skin darkening and wrinkles by changing simple habits. Avoid hot water, moisturize promptly, use sunscreen, limit face washing, hydrate well, use face oil, and gently exfoliate to reveal soft, glowing skin.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजी