त्वचा उजळ, फ्रेश दिसावी म्हणून कॉम्पॅक्ट आपण अगदी आवर्जून लावतो. पण त्याचा नेमका उलटाच परिणाम होतो आणि त्वचा जास्तच काळवंडलेली दिसते. चेहरा डल दिसू लागतो आणि मग कितीही मेकअप केला तरी चेहऱ्यावर फ्रेशनेस जाणवत नाही. असं का होतं आणि ते होऊ नये म्हणून नेमकं काय करायला हवं आणि काय टाळायला हवं ते आता पाहूया.. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे मेकअपला सुरुवात करण्यापुर्वी या काही टिप्स नक्कीच शिकून घ्या (makeup tips about applying compact powder). तुमचा मेकअप फ्रेश आणि परफेक्ट होण्यासाठी कॉम्पॅक्टच्या बाबतीतल्या या काही गोष्टी निश्चितच उपयुक्त ठरतील.(why does skin get dark after applying compact powder?)
कॉम्पॅक्ट लावल्यानंतर चेहरा का काळवंडून जातो?
१. कॉम्पॅक्ट लावल्यानंतर त्वचा डल, डार्क दिसण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कॉम्पॅक्टचा चुकलेला शेड. कॉम्पॅक्ट पावडर घेताना ती नेहमी तुमच्या स्किनटोनपेक्षा हलक्या शेडची घ्यावी. म्हणजेच तुमचा स्किनटोन जसा आहे त्यापेक्षा एक शेड उजळ असणारी.
झोपेतून उठल्यावर दोन्ही हात वर करून मस्त द्या 'अंगडाई', बघा आळस देण्याचे ३ मजेशीर फायदे...
२. कॉम्पॅक्टमध्ये असणारे घटक आणि हवेतील ऑक्सिजन यांच्यामुळे ती ऑक्सिडाईज होते आणि चेहरा काळवंडतो. त्यामुळे आधी प्रायमर लावावे. त्यावर कॉम्पॅक्ट लावल्यानंतर ऑईल कंट्रोल स्प्रे मारून कॉम्पॅक्ट सेट करून घ्यावे.
३. ज्यांची त्वचा ऑईली असते त्यांचा चेहरा कॉम्पॅक्ट लावल्यानंतर लवकर काळवंडून जातो. त्यामुळे तेलकट त्वचा असणाऱ्यांनी कॉम्पॅक्ट लावण्यापुर्वी वॉटर बेस मॉईश्चरायजर लावावं. त्यानंतर प्रायमर लावूनच मग कॉम्पॅक्ट लावावे.
'या' पद्धतीने घरातलं फर्निचर पुसा- ८ दिवस स्वच्छ, चकाचक राहील- वारंवार पुसण्याची गरजच नाही
४. खूप जास्त पावडर चेहऱ्यावर थोपवू नका. अगदी पातळ थर लावा. तसेच पावडर पफने लावण्याऐवजी ब्रशने लावा. यामुळे त्वचेमध्ये आणखी छान फरक दिसून येईल.
Web Summary : Compact powder can darken skin if the wrong shade is used or applied incorrectly. Use a lighter shade, apply primer, and set with oil control spray. Oily skin needs moisturizer before compact. Apply a thin layer with a brush instead of a puff.
Web Summary : गलत शेड या गलत तरीके से कॉम्पैक्ट लगाने से त्वचा काली पड़ सकती है। हल्का शेड इस्तेमाल करें, प्राइमर लगाएं और ऑयल कंट्रोल स्प्रे से सेट करें। तैलीय त्वचा को कॉम्पैक्ट से पहले मॉइस्चराइजर की आवश्यकता होती है। पफ के बजाय ब्रश से पतली परत लगाएं।