कोपर आणि गुडघ्यांचे काळवंडणे ही अनेकांसाठी सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. सौंदर्यदृष्ट्या ही गोष्ट ते वाईट दिसते. (Why do your knees get so dark? These 5 habits make your skin dark, applying creams is useless until you change few things in life )पण त्यामागची कारणं समजून घेतली आणि काही सवयी बदलल्या, तर ही समस्या सहजपणे टाळता येऊ शकते.
त्वचेचा रंग गडद होण्यामागे मुख्य कारण म्हणजे त्या भागावर वारंवार घर्षण होणे. गुडघे व कोपर हे शरीराचे असे अवयव इतरत्र टेकले जातात. त्यामुळे त्या भागांवर त्वचा जाड होते आणि टणकही होते. यामुळे नैसर्गिक त्वचेवरील छान रंग जाऊन काळसरपणा वाढतो. सतत जमिनीवर, फरशीवर किंवा कठीण पृष्ठभागावर कोपर किंवा गुडघे टेकण्याची सवय असेल, तर अशा प्रकारे बसणे टाळा. त्या घर्षणामुळे काळपटपणा अधिक होतो.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे कोरडी त्वचा. कोपर व गुडघ्यांची त्वचा शरीराच्या इतर भागांपेक्षा जास्त कोरडी असते. जर त्यावर वेळोवेळी मॉइश्चरायझर न लावता दुर्लक्ष झाले, तर ती अधिक कोरडी होऊन गडद व्हायला लागते. तसेच उन्हात सतत फिरणे आणि सनस्क्रीन न लावणे, हे सुद्धा हळूहळू काळेपण वाढण्यामागील कारण आहे. शरीरातील मृत त्वचा वेळेवर काढली नाही, तर तिचा थर साचतो आणि त्यामुळे त्वचेला गडद छटा येते.
या समस्येला अनेकदा हार्मोनल बदल, इन्सुलिन रेसिस्टन्स, थायरॉईड किंवा पिग्मेंटेशनसारखे वैद्यकीय कारणे देखील कारणीभूत असतात. पण बरेचदा ही कारणे जीवनशैलीशी संबंधित असतात. त्यामुळे काही साध्या सवयी बदलल्यास ही समस्या टाळता येते.
सर्वप्रथम, कोपर आणि गुडघे स्वच्छ ठेवणं आणि त्यावर नियमितपणे मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. आंघोळीनंतर त्यावर थोडेसे कोको बटर किंवा ऑलिव्ह ऑइल लावल्यास त्वचेचा मऊपणा टिकतो. आठवड्यातून एकदा सौम्य स्क्रब वापरून त्या भागाची मृत त्वचा काढून टाकणं फायदेशीर ठरतं. शक्यतो कोपर आणि गुडघ्यांवर सतत वजन देणं, टेकणं टाळावं. व्यायाम करताना चटई किंवा गादीचा आधार घ्यावा. उन्हात जाताना त्या भागांवर देखील सनस्क्रीन लावणं विसरू नये.
थोडक्यात, कोपर आणि गुडघे काळवंडण्यामागे अनेक साध्यासोप्या सवयींचा हात असतो. वेळेत थोडं लक्ष दिलं, त्वचेला पोषण आणि संरक्षण दिलं, तर ही समस्या उद्भवण्याआधीच थांबवता येते. शरीराच्या या दुर्लक्षित भागांचीही काळजी घेतली, तर त्वचा निरोगी राहते.