White Hair Reasons: आरशात बघत केस करताना जेव्हा एखादा पांढरा केस दिसतो तेव्हा अनेकांचं टेंशन वाढतं. कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या हल्ली अनेकांना होते. पण केस पांढरे होणं हा वाढत्या वयाच संकेत आहे. बरेच लोक केस पांढरे होण्याला स्ट्रेस किंवा चुकीची लाइफस्टाईल कारणीभूत मानतात. पण खरं कारण यापेक्षा वेगळं असतं. केस पांढरे होण्याची कारणं अनेकांना माहीत नसतात. तिच आज आपण समजून घेणार आहोत.
मुळात केसांना त्यांचा रंग मेलेनिन नावाच्या पिगमेंटने मिळतो. हा केसांच्या फॉलिकल्सच्या आता मेलानोसाइट्स नावाच्या एक खास सेल्सपासून बनवला जातो. जसजसं आपलं वय वाढतं, हे सेल्स हळूहळू मेलेनिन बनवणं कमी करतात किंवा बंद करतात. जेव्हा नवीन केस पिगमेंटशिवाय येतात, तेव्हा ते ग्रे किंवा पांढरे दिसतात.
वाढत्या वयासोबत शरीर केसांच्या फॉलिकल्समध्ये हायड्रोजन पेरॉक्साइड जमा करणं सुरू करतं. सामान्यपणे एंझाइम्स या केमिकलला तोडतं, पण जेव्हा सिस्टीम कमजोर होते, तेव्हा हायड्रोजन पॅरॉक्साइड केसांना आतून ब्लीच करणं सुरू करतं. यामुळे केस पांढरे होतात.
केसांची पांढरे होण्याची वेळ जेनेटिक्सने खूप जास्त प्रभावित होते. जर आपल्या आई-वडिलांचे किंवा आजी-आजोबांचे केस लवकर पांढरे झाले असतील, तर शक्यता आहे की, आपल्यासोबतच हेच होऊ शकतं. व्हिटामिन बी १२, व्हिटामिन डी, आयर्न आणि कॉपरसारख्या आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे मेलेनिन प्रॉडक्शन आणि केसांच्या आरोग्यात अडथळा निर्माण होतो.
फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या ऑक्सीडेटिव स्ट्रेसच्या वाढलेल्या प्रमाणामुळे मेलानोसाइट्सचं नुकसान होतं. जुना मानसिक तणाव सुद्धा हे नुकसान अधिक वाढवतो. याने पिगमेंट नुकसान अधिक वेगाने होतं आणि याचा परिणाम म्हणजे केस लवकर पांढरे होतात.
काही मेडिकल कंडिशन जसे की, थायरॉइड डिसऑर्डर आणि विटिलिगोसारख्या ऑटोइम्यून आजारांमध्ये मेलेनिनची निर्मिती बंद होते. या स्थितींमध्ये केस अचानक किंवा असामान्यपणे कमी वयातच पांढरे होऊ शकतात.
