Join us
Daily Top 2Weekly Top 5

केस लवकर पिकले-मग डाय कशाला? मोहरीच्या तेलात 2 पदार्थ कालवून लावा; काळे होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 18:26 IST

White Hairs Remedy : केस काळे करण्याासाठी बरेच लोक 10 मिनिट्स डाय वगैरे लावतात पण या डायचा परिणाम तात्पुरता असतो पुन्हा केस पांढरे व्हायला सुरूवात होते.

सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये कमी वयात मुलींचे केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते (Hair Care Tips). बाजारात मिळणारे महागडे आणि केमिकल्स असलेले हेअर कलर्स वापरले तर तेव्हढ्यापुरता केसांवर चांगला परिणाम दिसून येतो पण नंतर पुन्हा केस डॅमेज होतात. केस काळे करण्याासाठी बरेच लोक 10 मिनिट्स डाय वगैरे लावतात पण या डायचा परिणाम तात्पुरता असतो पुन्हा केस पांढरे व्हायला सुरूवात होते. (White Hairs Remedy)

प्रसिद्ध ब्लॉगर पूनम देवनानी यांनी एक सोपी युक्ती सांगितली आहे. हा उपाय तुम्ही कोणताही जास्तीचा खर्च न  करता सोप्या पद्धतीनं किचनमध्ये करू शकता. मोहरीच्या तेलात 2 साधे पदार्थ मिसळून तेल तयार केले तर आणि केसांना लावले तर केस पांढरे होणं कमी होईल. केस नैसर्गिकरित्या काळे होण्यासही मदत होईल. तसंच केसांना नैसर्गिक चमक आणि मजबूती मिळेल. (Mustard Oil And Turmeric Hair Mask Reverse Grey Hairs Natural remedy)

 

केस काळे करण्याचा हा घरगुती उपाय कसा करावा?

सगळ्यात आधी गॅसवर लोखंडाचा तवा किंवा छोटी कढई ठेवा. लोखंडाच्या भांड्यात तेल गरम केल्यानं केसांना एक्स्ट्रा पोषण मिळते.  ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होते.

 तेल आणि हळदीचं मिश्रण

 तव्यावर मोहरीचं तेल घालून. गॅस कमी आचेवर ठेवा. नंतर यात २ चमचे हळद पावडर मिसळा.  काळी होईपर्यंत हळद तेलासोबत शिजवून घ्या. हळदीचा रंग बदलेपर्यंत व्यवस्थित परतवल्यानंतर गॅस बंद करा. हळदीचा पिवळेपणा निघून हळद पूर्ण काळी झाली असेल तेव्हाच गॅस बंद करा.

मिश्रण पूर्णपणे थंड करायला ठेवा. थंड झाल्यानंतर एका बारीक गाळणीच्या मदतीनं किंवा सुती कापडाच्या मदतीनं तेल गाळून एका काचेच्या बरणीत भरा. नंतर या तेलात व्हिटामीन ई च्या कॅप्सून कापून याचे जेल तयार करा व्हिटामीन ई मुळे स्काल्प रिपेअर होण्यास मदत होते तसंच केसांची मुळं मजबूत होतात.

हे तेल केसांना कसे लावावे?

आठवड्यातून कमीत कमी एकदा हे तेल लावून केसांच्या मुळांची 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित मसाज करा.  संपूर्ण रात्रभर हे तेल असंच लावलेलं राहू द्या. सकाळी माईल्ड शॅम्पूनं केस धुवा. नियमित हा उपाय केल्यास काही आठवड्यातच तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल. केस लांब, काळे आणि  दाट होतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Reverse gray hair: Mustard oil and turmeric for natural black hair.

Web Summary : Premature graying solution: Mustard oil, turmeric mask restores natural hair color, shine, and strength. Apply weekly for best results.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी