Join us
Daily Top 2Weekly Top 5

हात लावताच गळतात केस? पाहा कोणत्या व्हिटामिनच्या कमतरतेने केस गळतात-पडतं टक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 17:22 IST

Which Vitamin Stop Hair Fall: आपल्याला माहीत असलं पाहिजे की, कोणत्या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे केस जास्त गळतात आणि त्यावर काय उपाय कराल.

Which Vitamin Stop Hair Fall: केस गळण्याची समस्या आता फारच कॉमन झाली आहे. कमी वयातच जास्त केस गळत असल्याने टक्कल पडतं किंवा मग मनासारखी हेअरस्टाईल करता येत नाही. मग काय ही समस्या दूर करण्यासाठी एका मागून एक वेगवेगळ्या तेलांचा आणि शाम्पूचा वापर केला जातो. पण तरी काही केस तुटणे किंवा गळणे थांबत नाही. केवळ महिलाच नाही तर पुरूषही केसगळतीच्या समस्येने वैतागलेले आहेत. केसगळतीची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण लोक एक चूक करतात. ती म्हणजे लोक वेगवेगळे उपाय करतात, पण केसगळतीचं नेमकं कारणच ते शोधत नाही. केसगळतीचं एक मुख्य कारण पोषणाची कमतरता असतं. म्हणजे शरीरात काही व्हिटामिन्स कमी झाले की, केस जास्त प्रमाणात गळतात. अशात आपल्याला माहीत असलं पाहिजे की, कोणत्या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे केस जास्त गळतात आणि त्यावर काय उपाय कराल.

कोणत्या व्हिटामिन्सच्या कमतरतेने गळतात केस?

व्हिटामिन बी७ - केसगळतीचं एक मोठं कारण म्हणजे शरीरात व्हिटामिन बी७ म्हणजे बायोटिन कमी होणं. व्हिटामिन बी७ला बायोटिन  असं म्हणतात, जे केसांच्या आरोग्यासाठी गरजेचं असतं. याने केस लांब आणि मजबूत होतात. त्यामुळे आहारात बायोटिन असलेल्या गोष्टींचा समावेश करावा. ड्रायफ्रूट्स, बिया आणि पालेभाज्यांमधून आपल्याला बायोटिन मिळू शकतं. एक्सपर्टच्या सल्ल्याने आपण बायोटिन सल्पीमेंट्सही घेऊ शकता.

व्हिटामिन डी - केसांचे मूळं निरोगी ठेवण्यासाठी व्हिटामिन डी ची महत्वाची भूमिका असते. काही रिसर्चमधून समोर आलंय की, व्हिटामिन डी कमी झाल्याने केसगळती होते. व्हिटामिन डी कमी झाल्याने केसांचा विकासही थांबतो. या स्थितीत केस कमजोर तर होतातच, सोबतच पातळही होतात. केस हेल्दी ठेवण्यासाठी व्हिटामिन डी असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करावा. तसेच सकाळचं कोवळं ऊनही घ्यावं. गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटामिन डी सप्लीमेंट्सही घेऊ शकता. 

केसगळतीची इतर कारणे

केस गळण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. महिलांमध्ये हार्मोन्स असंतुलन, पॉलीसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम किंवा थायरॉइडही असू शकतात. त्याशिवाय तणाव आणि चिंता किंवा भावनिक गोष्टींमधील सतत बदल होण्याचाही केसांवर प्रभाव पडतो. अशात डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं ठरतं. सोबतच हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करा आणि नियमितपणे व्यायाम करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Hair falling out easily? Vitamin deficiencies may cause baldness.

Web Summary : Hair fall is common, often due to vitamin deficiencies. Vitamin B7 (Biotin) and Vitamin D are crucial for hair health. Deficiencies can lead to hair loss and thinning. Address deficiencies through diet, sunlight, or supplements after consulting a doctor.
टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स