त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण अनेक महागडी उत्पादने वापरतो परंतु, कितीही काही केले तरी त्वचा खराब, कोरडी किंवा रखरखीत दिसते.(best serum for glowing skin) त्वचा ही सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषणाच्या संपर्कात वारंवार येत असते. अशावेळी त्वचेची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.(serum for pimples and dark spots) क्लिन्सर, टोनर, सिरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन सारखे ५ स्किन केअर रुटीन प्रत्येकांने फॉलो करायला हवे. ज्यामुळे आपली त्वचा हायड्रेट, स्वच्छ आणि तरुण दिसेल. (how to choose serum for your skin type)
आपल्या स्किन केअर रुटीन मधली सगळ्यात महत्त्वाची स्टेप सिरम.(pigmentation treatment at home) यामुळे त्वचेवर पिगमेंटेशन, मुरुमांचे डाग, अकाली येणारे वृद्धत्व, त्वचेचा पोत आणि काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करते.(pimple marks removal serum) त्वचेला हायड्रेट ठेवून अधिक चमकदार बनवते. (serum for oily skin with pimples)
अंडरआर्म्सचा काळपटपणा होईल दूर, पांढऱ्या पदार्थाचा 'असा' करा उपयोग, ५ सोप्या पद्धती- दिसेल फरक
अनेकदा सिरम खरेदी करताना आपला गोंधळ उडतो. त्वचेच्या रंगानुसार,त्यांच्या समस्येनुसार आपण सिरम खरेदी करायला हवे. कोरड्या आणि रंगद्रव्य असलेल्या त्वचेसाठी कोणते सिरम चांगले आहे. चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतील तर कोणतं सिरम लावायला हवं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर यापद्धतीने सिरम निवडा.
1. पोषणतज्ज्ञ किरण कुकरेजा म्हणतात जर आपल्या त्वचेवर पांढरे किंवा ब्लॅकहेड्सची समस्या होत असेल तर आपण सॅलिसिलिक ॲसिड असलेले सिरम खरेदी करावे. जे आपल्या त्वचेला एक्सफोलिएट करते. तसेच ओपन पोर्स स्वच्छ करण्यास मदत करते.
2. चेहऱ्यावर काळे डाग किंवा हायपरपिग्मेंटेशनची समस्या होत असेल तर कोजिक ॲसिड असलेले सिरम खरेदी करा. हे आपल्या त्वचेवरी डाग कमी करण्यास मदत करतात.
3. त्वचेच्या काही भागात मेलेनिनचे उत्पादन वाढले की रंगद्रव्य निर्माण होते, ज्यामुळे त्वचेवर काळे डाग पडतात. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने किंवा हार्मोनमध्ये बदल झाल्यानंतर चेहऱ्याचा रंग बदलतो. अशावेळी आपण व्हिटॅमिन सी सिरम वापरायला हवे.
4. निस्तेज आमि कोरड्या त्वचेसाठी नियासिनमाइड असलेले सिरम वापरा. हे आपली त्वचा चमकदार बनवेल तसेच त्वचेवरील तेल कमी करेल. यामध्ये हायल्युरोनिक ॲसिड आहे का हे देखील तपासा.
5. जर आपल्याला कमी वयात त्वचेवर सुरकुत्या येत असतील तर रेटिनॉल असलेले सीरम वापरा. यात बारीक रेषा कमी करण्यास आणि मुरुमे कमी होण्यास मदत होते.
6. आपल्या त्वचा ग्लोइंग-चमकदार हवी असेल तर सीरममध्ये सिरॅमाइड्स आहेत का ते तपासा. त्वचेच्या रंगानुसार आपण सीरम खरेदी केल्यास त्वचा दुरुस्त करण्यास मदत होईल.