Which hair oil for which hair type: केस निरोगी, मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी केसांना तेल लावणं अतिशय फायदेशीर मानलं जातं. जास्तीत जास्त लोक साधारपणे खोबऱ्याचं तेल, बदामाचं किंवा मोहरीचं तेल वापरतात. पण हे सगळे तेल प्रत्येकाच्या केसांसाठी सारखे फायदेशीर असतीलच असं नाही. चुकीचं तेल वापरल्यास केसांना उलट नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आपल्या केसांचा प्रकार आणि त्यातील समस्या ओळखणं खूप गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या केसांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं तेल योग्य असतं. चला पाहुयात कोणत्या प्रकारच्या केसांसाठी कोणतं तेल सर्वात चांगलं आहे आणि ते कसं वापरावं.
केस वाढवण्यासाठी एरंडीचं तेल
जर तुमचे केस वाढणं थांबलं असेल, तर एरंडीचं तेल उत्तम पर्याय आहे. हे तेल केसांची वाढ वाढवतं आणि केस गळणे कमी करतं. स्काल्पवर हलक्या हातांनी हे तेल लावा आणि काही मिनिटं मसाज करा. काही आठवड्यांतच फरक जाणवेल.
तुटके किंवा खराब केसांसाठी बदामाचं तेल
खराब, कोरडे किंवा दोन टोकांचे केस असतील, तर बदामाचं तेल सर्वोत्तम ठरतं. यात व्हिटामिन E मुबलक प्रमाणात असतं, जे केसांना पोषण देऊन रिपेअर करतं. नियमित वापराने केसांची टेक्स्चर आणि मजबुती सुधारते.
कोरड्या केसांसाठी खोबऱ्याचं तेल
केसांमधली नमी कमी झाल्यास ते कोरडे आणि राठ वाटू लागतात. अशा वेळी खोबऱ्याचं तेल सर्वोत्तम उपाय आहे. हे केसांना हायड्रेट आणि मॉइस्चराइज करतं, त्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात.
चिकट केसांसाठी जोजोबा तेल
जर केसांमध्ये जास्त तेलकटपणा किंवा चिपचिपेपणा असेल, तर जोजोबा ऑइल वापरावा. हे तेल स्काल्पमधील नैसर्गिक तेलाचं प्रमाण संतुलित ठेवतं आणि केसांना हलकं, स्वच्छ आणि हेल्दी ठेवतं.
निरोगी केस टिकवण्यासाठी ऑलिव्ह ऑइल
जर तुमचे केस आधीच निरोगी असतील आणि कोणतीही समस्या नसेल, तर नियमितपणे ऑलिव्ह ऑइल लावणं फायदेशीर आहे. हे केसांना आवश्यक पोषक घटक पुरवतं आणि केस मऊ, चमकदार आणि मजबूत ठेवतं.
टिप्स
- तेल नेहमी कोमट करून वापरल्यास ते स्काल्पमध्ये चांगलं शोषलं जातं.
- तेल लावल्यानंतर हलका मसाज करा, यामुळे रक्तप्रवाह सुधारतो.
- आठवड्यातून किमान २ वेळा तेल लावणं उत्तम.
- केसांच्या प्रकारानुसार योग्य तेल निवडा. चुकीचं तेल केस गळणे आणि कोरडेपणा वाढवू शकतं.
