Hair Care Tips : केसांची वाढ होण्यासाठी ते निरोगी राहण्यासाठी केसांना नियमितपणे तेल लावणं फार गरजेचं असतं. पण तेल लावण्याचे काही नियम आहेत. ते फॉलो केले गेले तरच त्यांचा फायदा मिळतो. बऱ्याचदा काही महिला केसांवर तेल लावतात आणि नंतर केस धुतल्यानंतर त्यांना ते चिकट, हार्ड आणि निर्जीव वाटतात. असं होण्याचं कारण चुकीच्या वेळी तेल लावणे. केसांना तेल लावणं महत्वाचं आहेच, पण ते कधी, किती आणि कसं लावावं हे देखील तेवढंच महत्वाचं असतं. कारण आपली एक चूक केस खराब करू शकते. अशात आम्ही आपल्याला आज हेच सांगणार आहोत की, केसांना तेल लावताना कोणत्या ४ चुका टाळल्या पाहिजेत. जेणेकरून केसांचं आरोग्य बिघडू नये.
स्कॅल्पवर पुरळ असल्यास
जर आपल्या स्कॅल्प फारच ऑयली असेल आणि त्यावर पुरळ किंवा फोड आलेले असतील तर चुकनही केसांना तेल लावू नका. आधीच डोक्यावर तेल आहे आणि आणखी तेल लावाल तर डोक्यात खाज, जळजळ आणि रक्त येण्याच्या समस्या होऊ शकतात.
जास्त केसगळती
काही लोक केस भरपूर गळत असताना देखील भरभरून तेल लावतात. पण असं केल्यानं हेअर फॉलिकल्स कमजोर होतात आणि यामुळे केस आणखी जास्त तुटू लागतात. केस आणखी गळू लागतात. अशात या स्थितीत आपण एक्सपर्टचा सल्ला घेऊन योग्य तो उपाय केला पाहिजे.
कोंडा झाल्यास टाळा
केसांमध्ये कोंडा झाला की, टाळूची त्वचा देखील भरपूर ड्राय होते. अशा स्थितीत जर केसांवर तेल लावाल तर ते टाळूवर अधिक चिकटून बसतं. ज्यामुळे सेबोरिक डर्मेटायटिस किंवा फंगल इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. त्यामुळे तेल नेहमी साफ टाळूवरच लावालं आणि ३० मिनिटं किंवा १ तासांनंतर केस धुवावे.
धूळ - माती बसलेले केस
बऱ्याचदा आपण बाहेरून आलो की, केसांवर बरीच धूळ चिकटून बसलेली असते. डोक्यात घामही आलेला असतो. या स्थितीत केसांवर तेल अजिबात लावू नये. कारण अशा केसांवर तेल लावल्यास डोक्याची त्वचा आणखी चिकट होऊ शकते, पोर्स बंद होऊ शकतात आणि यामुळे इन्फेक्शनचा धोकाही वाढतो.
केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत
डर्मेटोलॉजिस्टनी सांगितलं की, जास्तीत जास्त लोक केसांना खोबऱ्याचं तेल लावणं पसंत करतात. पण तुम्ही हवं ते तेल केसांना लावू शकता. तेल केसांना लावण्यासाठी आधी हलकं गरम करून घ्यावं. तेल जास्त गरम करू नये. तेल कोमट असेल तर डोक्याच्या त्वचेमध्ये चांगलं मुरतं. केसांच्या मूळात आधीच तेल आणि सीबम असतं त्यामुळे तेल केसांना लावावे.
जर तुम्हाला आधीच केसात कोंडा होण्याची समस्या असेल तर तेल डोक्याच्या त्वचेवर अजिबात लावू नये. केस धुण्याच्या १ ते २ तासांआधी केसांना तेल लावावे. डर्मेटोलॉजिस्टचं मत आहे की, रात्रभर तेल लावून ठेवल्याने केसांना फार काही खास फायदे मिळत नाहीत. अॅक्ने आणि कोंड्याची समस्या यामुळे वाढू शकते.
Web Summary : Avoid oiling hair with scalp issues, excessive hair fall, dandruff, or dirt. Warm oil slightly, apply to hair (not scalp), and wash after 1-2 hours. Overnight oiling isn't beneficial and may worsen dandruff or acne.
Web Summary : स्कैल्प में समस्या, अत्यधिक बाल झड़ने, रूसी या गंदगी होने पर तेल लगाने से बचें। तेल को हल्का गर्म करें, बालों पर लगाएं (स्कैल्प पर नहीं), और 1-2 घंटे बाद धो लें। रात भर तेल लगाना फायदेमंद नहीं है और रूसी या मुंहासे बढ़ सकते हैं।