Join us

सिल्की सिल्की केस हवेत, खोबऱ्याच्या तेलात ‘या’ ३ गोष्टी मिसळून लावा-केस होतील रेशमासारखे मऊ आणि लांब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 15:34 IST

How to stop hair fall : केसगळती रोखण्यासाठी एक खास उपाय म्हणजे खोबऱ्याचं तेल. पण केवळ खोबऱ्याचं तेल फायदेशीर ठरणार नाही. यासाठी त्यात काही गोष्टी घालाव्या लागतील. तेच आज आपण पाहणार आहोत.

How to stop hair fall : केसगळतीची समस्या दूर करणं एक मोठं आव्हान असतं. कारण ही समस्या होण्याची कारणंही वेगवेगळी असतात. चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी याला कारणीभूत असतात. तसेच केसांची योग्य काळजी न घेणं हे देखील यामागचं एक कारण असतं. अशात बरेच लोक केसगळती थांबवण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा आणि केमिकल्सचा वापर करतात. मात्र, ही समस्या दूर करण्यावर काही उपगुती उपाय देखील असतात. त्यातील एक खास उपाय म्हणजे खोबऱ्याचं तेल. पण केवळ खोबऱ्याचं तेल फायदेशीर ठरणार नाही. यासाठी त्यात काही गोष्टी घालाव्या लागतील. तेच आज आपण पाहणार आहोत.

केसांना खोबऱ्याचं तेल लावणं फायदेशीर असतं. पण अनेकांना हे माहीत नाही की, खोबऱ्याच्या तेलात काही दुसऱ्या गोष्टी मिक्स केल्या तर केसगळतीची समस्या दूर होऊ शकते. केसांना या उपायाने जास्त पोषण मिळतं. अशात तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, केसगळती थांबवण्यासाठी आणि केस मजबूत करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात काय मिक्स करून लावलं पाहिजे.

खोबऱ्याच्या तेलाचे फायदे

केसांना खोबऱ्याचं तेल असंच लावू शकता. एका वाटीमध्ये खोबऱ्याचं तेल घेऊन हलकं गरम करा. या तेलाने डोक्याच्या त्वचेची आणि केसांची हलक्या हाताने मालिश करा. तेल लावल्यावर अर्ध्या तासाने केस धुवून घ्या. हवं असेल तर हे तेल तुम्ही केसांना असंच रात्रभरही लावून ठेवू शकता. याने डोक्याची त्वचा मजबूत होते.

खोबऱ्याचं तेल आणि कढीपत्ते

कढीपत्ते केसांसाठी खूप फायदेशीर असतात. अशात तुम्ही जर कढीपत्ते आणि खोबऱ्याचं तेल मिक्स करून केसांना लावलं तर अधिक फायदा मिळू शकतो. याने केस पातळही होत नाहीत. २ चमचे खोबऱ्याचं तेल कमी आसेवर गरम करा आणि त्यात १० ते १२ कढीपत्ते टाका. कढीपत्ते थोडे भाजले की, गॅस बंद करा. तेल कोमट असेल तेव्हा केसांवर लावा. हे तेल साधारण ४५ मिनिटे केसांचा तसंच राहू द्या. त्यानंतर केस धुवून घ्या. याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

खोबऱ्याचं तेल, दूध आणि केळी

हा एक खास हेअर मास्क आहे. हा मास्क केसांवर लावल्यावर केस लांब होतात. मुलायम होता आणि केस चमकदारही होतात. हा हेअर मास्क बनवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात थोडं दूध आणि एक केळी चुरून मिक्स करा. हा हेअर मास्क केसांवर एक तास लावून ठेवा आणि त्यानंतर केस धुवून घ्या. पंधरा दिवसातून एकदा हा उपाय करा. तुम्हाला फरक दिसून येईल.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स