आपण जेव्हा आरशात पाहतो तेव्हा आपल्याला पांढरे केस दिसले की थोडा धक्काच बसतो. लहान वयात केस पिकले की अनेकदा टेन्शन येतं, आत्मविश्वास कमी होतो. केस गळतीच्या समस्येने लोक त्रस्त असतानाच आता लवकर केस पांढरे होत असल्याने चिंता वाढली आहे. चुकीची लाईफस्टाईल, आहार, ताणतणाव, प्रदूषण आणि झोपेचा अभाव ही यामागील प्रमुख कारणं असू शकतात. महागड्या ट्रीटमेंट आणि केस कलर करणं हे काही दिवसांपूरतं असतं. नैसर्गिकरित्या अत्यंत सहजपणे पांढरे केस कसे काळेभोर करायचे हे जाणून घेऊया...
नारळाचं तेल का आहे खास?
नारळाच्या तेलाला केसांचा बेस्ट फ्रेंड म्हटलं जातं. ते केवळ मुळांपासून केसांना पोषण देत नाही, तर योग्य घटक त्यात मिसळल्यास नैसर्गिकरित्या केस काळे करण्यास मदत होऊ शकते.
आवळा
आवळा केसांसाठी एक खजिना आहे. त्यातील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स केस लवकर पांढरे होण्यापासून रोखण्यास आणि त्यांची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यास मदत करतात.
कसा करायचा वापर?
- १-२ चमचे आवळा पावडर किंवा रस २-३ चमचे नारळाच्या तेलात मिसळा.- कमी आचेवर ते गरम करा आणि नंतर थंड होऊ द्या.- रात्रभर ते केसांच्या मुळांना लावा आणि मालिश करा, नंतर सकाळी सौम्य शाम्पूने धुवा.
मेथी
मेथीमध्ये प्रथिने आणि निकोटिनिक एसिड भरपूर प्रमाणात असतं. ते पांढरे केस काळे करण्यास आणि केस गळती रोखण्यास मदत करू शकतात.
कसा करायचा वापर?
- एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा.- दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची पेस्ट बनवा आणि त्यात ३-४ चमचे नारळाचं तेल मिसळा.- थोडे गरम करा, थंड करा आणि १-२ तास केसांना लावा. नंतर सौम्य शाम्पूने धुवा.
फायदे
- केसांच्या मुळांना खोल पोषण मिळेल.- पांढरे केस हळूहळू काळे आणि चमकदार होतील.- केस गळणे आणि पातळ होणे दोन्ही कमी होतील.- केस निरोगी आणि मजबूत होतील.
Web Summary : Early graying is concerning. Coconut oil mixed with amla or fenugreek can naturally darken hair. Amla's antioxidants and fenugreek's proteins nourish the scalp, reducing hair fall and promoting healthy, black hair with regular use.
Web Summary : समय से पहले बाल सफेद होना चिंताजनक है। नारियल तेल में आंवला या मेथी मिलाकर बालों को प्राकृतिक रूप से काला किया जा सकता है। आंवला के एंटीऑक्सीडेंट और मेथी के प्रोटीन खोपड़ी को पोषण देते हैं, बालों का गिरना कम करते हैं और नियमित उपयोग से स्वस्थ, काले बालों को बढ़ावा देते हैं।