Hair Care Tips While Sleeping : रात्री झोपताना केस कसे ठेवावेत, हा प्रश्न अनेक महिला किंवा तरूणींना पडतो. दिवसभर धूळ, प्रदूषण आणि स्टाइलिंगमुळे केस खराब होतात. पण रात्री झोपेच्या वेळी स्कॅल्प रिलॅक्स होतो, ब्लड सर्कुलेशन सुधारतं आणि केस नैसर्गिकरीत्या रिपेअर होतात. त्यामुळे या वेळेत योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. मात्र, अनेकदा आपण केसांची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करून जसे-तसे झोपतो. काही महिला केस मोकळे ठेवून झोपतात, तर काही टाइट बांधून. पण योग्य पद्धत काय आहे, हे अनेकांना माहीत नसतं. ते आज सोप्या भाषेत समजून घेऊया.
केस मोकळे करून झोपा
केस मोकळे सोडून झोपल्याचे काही फायदे आणि नुकसान दोन्हीही आहेत. केस मोकळे सोडून झोपाल तर डोक्याच्या त्वचेला चांगली हवा लागते, ज्यामुळे डोक्याची त्वचा चांगली राहते. तसेच मोकळ्या केसांमुळे डोक्यात ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि ते मजबूत बनतात. केस मोकळे ठेवले तर ते ताणले जात नाहीत. दुसरीकडे केस मोकळे करून झोपाल तर ते खूप गुंततात, मग ते सकाळी सरळ करण्यात खूप वेळ जातो. केस मोकळे करून झोपाल तर ते रखरखीत आणि निर्जीव होण्याचा व तुटण्याचाही धोका असतो.
केस बांधून झोपणे
रात्री केस बांधून झोपल्याचे सुद्धा काही फायदे आणि काही नुकसान आहेत. रात्री केस बांधून झोपल्यानं केस गुंतत नाहीत, तुटत नाहीत. केस बांधले असल्यानं एकमेकांवर जास्त घासले जात नाहीत. त्यामुळे ते गुंतत नाही आणि तुटतही नाहीत. वेणी घालून किंवा अंबाडा बांधून झोपल्यानं केस गुंतत नाही. तेच लहान वेणी किंवा अंबाडा बांधून झोपल्यानं केसांच्या मुळावर दबाव कमी पजतो. ज्यामुळे केसांची वाढही चांगली होते. मात्र, केस जास्त टाइट बांधाल तर डोक्याच्या त्वचेवर दबाव पडतो, ज्यामुळे केसगळतीची समस्या होते.
कसं झोपावं?
केस बांधून झोपण्याचे आणि केस मोकळे सोडून झोपण्याचे दोन्हींचे आपापले वेगवेगळे फायदे आहेत. केस बांधून झोपायचं की मोकळे सोडून हे तुमच्या केसांवर अवलंबून आहे. जर केस फार लांब नसतील तर ते मोकळे सोडूनच झोपू शकता. तेच जर केस लांब असतील तर ते बांधूनच झोपावे. असं केल्यास केस तुटणार नाहीत. जर तुम्हाला केस मोकळे सोडून झोपायचं असेल तर कॉटनऐवजी सिल्कच्या उशीचा वापर करावा. तसेच रात्री तुम्ही छोटी वेणी बांधून झोपू शकता.
Web Summary : Sleeping with hair loose promotes scalp health, but causes tangles and damage. Tying hair prevents tangles and breakage, but tight styles can cause hair fall. Shorter hair can be left open while longer hair is best tied loosely or braided. Silk pillowcases also minimize damage.
Web Summary : बाल खुले रखकर सोने से स्कैल्प स्वस्थ रहता है, पर उलझन और नुकसान होता है। बांधने से उलझन और टूटना कम होता है, पर टाइट बांधने से बाल झड़ते हैं। छोटे बाल खुले और लंबे बाल बांधकर सोना बेहतर है। सिल्क का तकिया नुकसान कम करता है।