सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या कॉस्मेटिक्सची खरेदी केली जात आहे. बेसिक मेकअप करायचा म्हटलं तरी हल्ली वेगवेगळे क्रिम, फाउंडेशन, मस्कारा, आय लायनर, लिप लायनर, लिपस्टिक अशा गोष्टी लागतातच. त्यातही बी बी क्रिम, सी सी क्रिम असे वेगवेगळे क्रिमही बाजारात मिळतात. हे नेमके वापरायचे कसे आणि त्यातही आपल्या त्वचेसाठी काय चांगलं हे ओळखायचं कसं असा प्रश्न कधीतरीच मेकअप करणाऱ्या कित्येक जणींना हमखास पडतोच... म्हणूनच त्यांच्यासाठी ही खास माहिती...(how to identify BB or CC which cream is good for your skin?)
BB क्रिम आणि CC क्रिम यांच्यात काय फरक?
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे BB क्रिम आणि CC क्रिम हे दोन्ही क्रिम तुम्ही मेकअप बेस म्हणून त्वचेला लावू शकता. या दोन्हींपैकी एखादं क्रिम लावलं तरी पुन्हा फाउंडेशन लावण्याची गरज नसते. त्यामुळे जर तुम्हाला नॅचरल लूक देणारा मेकअप आवडत असेल तर फाउंडेशनपेक्षा बी बी क्रिम किंवा सी सी क्रिम लावा. हे तुम्ही ऑफिसला जाताना नेहमीच लावलं तरी चालेल.
आता या दोन्हींपैकी आपल्या त्वचेसाठी चांगलं कोणतं हे ओळखायचं हे ओळखुया. बीबी क्रिम म्हणजे ब्लेमिश बाम. जर तुम्हाला नॅचरल लूक देणारा हलका मेकअप करायचा असेल तर हे क्रिम चांगलं आहे. मॉईश्चरायजर, फाउंडेशन, कन्सिलर अशी सगळीचं काम या एका क्रिमद्वारे होऊ शकतात. ज्यांची त्वचा चांगली आहे, नॉर्मल किंवा ड्राय प्रकारातली आहे त्यांच्यासाठी बी बी क्रिम चांगले आहे.
सी सी क्रिम म्हणजे कलर करेक्टर क्रिम. हे देखील मेकअप बेस म्हणून तुम्ही लावू शकता. ज्यांच्या त्वचेवर ॲक्ने, पिंपल्सचे डाग, डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन जास्त आहे त्यांच्यासाठी सी सी क्रिम अधिक चांगले आहे. कारण या क्रिममुळे चेहऱ्यावरचे सगळे डाग झाकले जातात आणि त्वचा एकसारखी दिसते. बीबी क्रिमपेक्षा सीसी क्रिम थोडा हेवी लूक देते. तेलकट त्वचेसाठी देखील सी सी क्रिमच चांगले आहे.
Web Summary : BB and CC creams serve as makeup bases, offering natural looks. BB creams suit normal to dry skin, providing light coverage. CC creams are better for oily, acne-prone skin, effectively concealing blemishes and dark spots for an even complexion.
Web Summary : बीबी और सीसी क्रीम मेकअप बेस के रूप में काम करते हैं, जो प्राकृतिक लुक देते हैं। बीबी क्रीम सामान्य से शुष्क त्वचा के लिए उपयुक्त है, और हल्का कवरेज प्रदान करती है। सीसी क्रीम तैलीय, मुंहासे वाली त्वचा के लिए बेहतर है, जो धब्बों और काले धब्बों को प्रभावी ढंग से छिपाकर एक समान रंगत प्रदान करती है।