What is Alopecia Areata: केसगळतीच्या समस्येमुळे कितीतरी महिला आणि पुरूष वैतागलेले आहेत. नेहमीच केसगळतीची वेगवेगळी कारणं समोर येत असतात. संशोधनातून केसगळतीसंबंधी आजारांची माहिती समोर येत असते. केसांच्या समस्येसंबंधी असाच एक आजार म्हणजे एलोपेशिया एरियाटा. हा एक ऑटोइम्यून आजार आहे. ज्याबाबत फारसं आपल्याला माहीत नसतं. यामध्ये शरीराची इम्युनिटी चुकून केसांच्या मुळांवर हल्ला करते. यामुळे शरीराच्या कोणत्याही भागावर, खासकरून टाळूवरील केस जास्त गळतात.
अनेकांना वाटते की, एलोपेशिया एरियाटा हा आजार फक्त डोक्यात उवा झाल्यावर होतो, पण असं काही नाहीये. हा आजार न दिसणाऱ्या बॅक्टेरियाच्या माध्यमातून पसरतो. टाळूच्या काही भागांमधून केस जास्त प्रमाणात गळू लागतात.
केस गळू लागल्यावर अनेक जण घाबरतात आणि त्या जागी पुन्हा केस उगवतील की नाही, अशी चिंता करतात. पण घाबरण्याची गरज नाही. योग्य उपाय केल्यास केस गळणे कमी करता येते आणि पुन्हा केस उगवण्यास मदत होते.
एलोपेशिया एरियाटामध्ये केस पुन्हा उगवण्यासाठी घरगुती उपाय
लसूण आणि कांद्याचा रस
लसूण आणि कांद्याचा रस हा एक प्रभावी उपाय मानला जातो. यामध्ये असलेलं सल्फर ब्लड सर्कुलेशन सुधारतं आणि केस पुन्हा उगवण्यास मदत करतं. कांदा किंवा लसूण वाटून त्याचा रस काढा. हा रस केस गळणाऱ्या भागावर लावा आणि ३० मिनिटांनंतर धुवा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा.
मेथीची पेस्ट
मेथीमध्ये प्रथिनं आणि निकोटिनिक अॅसिड असतं, जे केसांच्या मुळांना मजबूत बनवतं. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट तयार करून प्रभावित भागावर लावा आणि ४० मिनिटांनंतर आंघोळ करा.
अॅलोव्हेरा जेल
अॅलोव्हेरामध्ये सूज कमी करणारे गुणधर्म असतात, जे टाळूवरील खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करतात. ताजे अॅलोव्हेराचे गर घेऊन प्रभावित भागावर हलक्या हाताने मालिश करा. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि केसांच्या वाढीस चालना मिळते.
खोबऱ्याचं तेल आणि कढीपत्ता
खोबऱ्याच्या तेलात कढीपत्त्याची पाने घालून ते चांगले उकळा. हे तेल थंड झाल्यावर नियमितपणे केस गळणाऱ्या भागावर लावा. यामुळे केस गळणे कमी होऊन नवीन केस उगवण्यास मदत होते.
