Join us
Daily Top 2Weekly Top 5

ताजी ओली हळद तुमच्या केसांची एकुणएक समस्या करते चटकन बरी, केसांना ‘अशी’ लावा ओली हळद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:53 IST

Raw Turmeric for Hair : केसांच्या वेगवेगळ्या समस्या झटक्यात दूर करण्यासाठी नॅचरल उपाय. पाहा फायदे..

Raw Turmeric for Hair : केसगळती, कोंडा, स्कॅल्प इन्फेक्शन, केस पांढरे होणे आणि केस कमजोर होणे अशा कितीतरी समस्या अनेकांना होताना दिसतात. या समस्या दूर करण्यासाठी काही नॅचरल उपाय फारच उपयोगी ठरतात. त्यातीलच एक उपाय म्हणजे ओली हळद. ओल्या हळदीतील अँटी-बॅक्टेरिअल, अँटी- फंगल आणि अँटी-इन्फ्लामेटरी गुण स्कॅल्पला हेल्दी तर ठेवतातच, सोबतच केस मजबूत करून त्यांची वाढही करतात. जर योग्यपणे ओली हळद केसांवर लावली गेली तर केसांसंबंधी कितीतरी समस्या सहज दूर होण्यास मदत मिळू शकते.

ओली हळदीने दूर होणाऱ्या केसांच्या समस्या

कोंडा आणि खाज - ओल्या हळदीमधील अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल गुण स्कॅल्पमधील खाज, कोंडा आणि इन्फेक्शनसोबत लढतात. तसेच या गुणांची त्वचेतील सूजही शांत होते. ओली हळद जर डोक्यावर खोबऱ्याच्या तेलात मिक्स करून लावली तर फायदा अधिक मिळू शकेल.

केसगळती - ओल्या हळदीतील करक्यूमिन तत्व फारच प्रभावीपणे काम करतं. याने त्वचेतील सूज कमी होते, केसांना पोषण मिळतं. ज्यामुळे केस मजबूत होतात आणि केस गळणं देखील कमी होतं.

केस पातळ होणे - ओल्या हळदीतील करक्यूमिन आपल्या अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इन्फ्लामेटरी गुणांमुळे स्कॅल्पचं आरोग्य सुधारतं. ज्यामुळे कोंडा कमी होतो आणि ब्लड सर्कुलेशनही सुधारतं. अशात विरळ झालेले केस दाट आणि आणखी मजबूत होतात.

पांढरे केस - ओल्या हळदीमध्ये औषधीय गुण असतात. यात कॉपर, आयर्न आणि इतरही अनेक औषधी गुण असतात, जे पांढरे केस काळे करण्यास मदत करतात. पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी आपण यापासून हेअर मास्क आणि डाय सुद्धा बनवू शकता.

कसा कराल वापर?

ओली हळद बारीक करून पेस्ट तयार करा. त्यात थोडा कोरफडीचा गर, खोबऱ्याचं तेल किंवा मध मिक्स करा. हे मिश्रण डोक्यावर लावा. ३० ते ४५ मिनिटांनी माइल्ड शाम्पूने केस धुवा.

English
हिंदी सारांश
Web Title : Raw Turmeric: Solution for Hair Fall, Dandruff, and Infections

Web Summary : Raw turmeric combats hair issues like dandruff, hair fall, and infections due to its antibacterial and anti-inflammatory properties. It strengthens hair, promotes growth, and can help reverse graying. Use it as a hair mask mixed with aloe vera, coconut oil, or honey.
टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स