नोव्हेंबर महिना सुरु झाला पण ऊन-पावसाच्या या खेळात आपल्या आरोग्यासह त्वचेवर जास्त प्रमाणात परिणाम होतो.(Dark circles causes) वाढते प्रदूषण, बदलते हवामान, जंक फूड, अपुरी झोप आणि जास्त प्रमाणात चहा-कॉफीचे सेवन केल्यावर त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो.(Pigmentation on face) त्वचा कोरडी किंवा तेलकट होणे, सतत घाम येणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, चेहरा निस्तेज दिसणे किंवा काळपट होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. (Skin dullness reasons)
सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे झोपेची कमतरता, स्ट्रेस, वाढता स्क्रीन टाइम यामुळे त्वचेवर परिणाम होतो. त्वचा काळपट दिसू लागली की आपण महागडे ब्यूटी प्रोडेक्ट्स वापरतो किंवा पार्लरमध्ये जातो. पण यामुळे त्वचा सुंदर दिसण्याऐवजी ती अधिक खराब दिसू लागते. पण त्वचा काळा पडण्याचे मुख्य कारण आपल्या शरीरात होणारे बदल किंवा कमतरता. शरीराला पुरेशा प्रमाणात आयर्न किंवा व्हिटॅमिन मिळाले नाही तर चेहरा काळा पडू शकतो. चला जाणून घेऊया कोणते व्हिटॅमिन आणि कोणत्या सवयी आपल्या त्वचेची नैसर्गिक चमक कमी करतात.
आपली त्वचा निस्तेज किंवा काळी पडत असेल तर ते व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेचे लक्षण असू शकते. या कमरतेमुळे त्वचेचा रंगद्रव्य वाढतो आणि ती निस्तेज दिसू लागते. व्हिटॅमिन डी आणि ई च्या कमतरतेमुळे देखील त्वचेची चमक कमी होते.
कोणतेही व्हिटॅमिन आपल्या त्वचेला काळे करत नाही. पण जेव्हा शरीराला व्हिटॅमिन सी, बी १२ ची कमतरता होते. शरीरातील मेलेनिन संतुलन बिघडते. तेव्हा त्वचेच्या रंगांमध्ये बदल होताना पाहायला मिळतो. जर आपण उन्हात जास्त वेळ असू आणि त्वचेला सनस्क्रीन लावत नसू तेव्हा देखील हा परिणाम पाहायला मिळतो.
सूर्याची अतिनील किरणे, झोपेचा अभाव, ताणतणाव, हार्मोनल बदल आणि खराब आहार यामुळे त्वचा काळी पडू शकते. तसेत अतिप्रमाणात ब्यूटी प्रोडेक्ट्सचा वापर करणं देखील महागात पडू शकते. आपण आहारात अंडी, दूध, मासे, गाजर, पपई, टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करायला हवा. ज्यामुळे शरीराला व्हिटॅमिन अ, क, ई आणि बी १२ मुळे मेलेनिन उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करतात आणि आपल्या त्वचेला नैसर्गिक चमक देतात.
