केस गळायला लागल्यावर बहुसंख्य लोक लगेच शाम्पू बदलतात. तेल बदलून पाहतात. पण त्याचा म्हणावा तसा परिणाम होत नाही. कारण ज्या कारणामुळे केस गळत आहेत, त्याकडे आपण लक्षच देत नाही. डाॅक्टरांनी याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ drjubairxce या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला असून यामध्ये ते सांगतात की केस हा शरीराचा असा भाग असतो ज्याला सगळ्यात शेवटी पोषण मिळतं. त्यामुळे जेव्हा तुमच्या शरीरात पौष्टिक घटकांची कमतरता निर्माण होते, तुम्ही अशक्त होत जाता तेव्हा तुमचे शरीर शरीरातले पौष्टिक घटक सांभाळून वापरू लागते. त्यामुळे मग केसांना पोषण मिळणं बंद होतं आणि ते गळायला लागतात (What Are the Main Reasons For Hair Loss?). त्यामुळे जेव्हा केस गळण्याची समस्या वाढायला लागेल तेव्हा सगळ्यात आधी तुमच्या आहारावर लक्ष द्या. कारण शरीराला पौष्टिक घटक पुरेशा प्रमाणात मिळाले नाही तर केस तर गळतीलच पण आरोग्याच्या इतर तक्रारीही डोकं वर काढतील.(remedies or home hacks for reducing hair fall)
केस गळणं कमी करण्यासाठी उपाय
१. व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी ३, थायरॉईड, कॉर्टीसॉल, HbA1c यांची एकदा तपासणी करून घ्या. या घटकांची कमतरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तसा आहार सुरू करा.
काळवंडलेल्या चेहऱ्यावर जादू करेल हळद- कॉफीचा 'हा' उपाय- टॅनिंग जाऊन त्वचा उजळेल
२. पनीर, कडधान्ये, डाळी, सुकामेवा, वेगवेगळ्या बिया, हिरव्या पालेभाज्या असे प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यावर भर द्या.
३. १ टेबलस्पून जवस, ५ भिजवलेले बदाम, १ अक्रोड हे तुम्ही रोजच्यारोज खायला हवं
४. खूप हेवी डाएटिंग टाळायला हवं. आहार समतोल ठेवण्याचा प्रयत्न करा.
५. मनावरचा ताण कमी करण्यासाठी प्राणायाम, ध्यानधारणा, व्यायाम करा. यामुळे कॉर्टीसॉल हार्मोन कमी होऊन केस गळण्याचं प्रमाणही कमी होईल.
६. रोज रात्री ७ ते ८ तासांची शांत झोप व्हायलाच हवी.
बहुसंख्य भारतीय लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता का? संशोधनातून समोर आली काही मुख्य कारणं
७. भृंगराज, आवळा, ब्राह्मी चुर्ण, अश्वगंधा, शतावरी, त्रिफळा अशी चूर्णही आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.
८. भृंगराज किंवा रोजमेरी तेलाने डोक्याला मालिश केल्यास केसांच्या आरोग्यामध्ये चांगला फरक दिसून येतो.
Web Summary : Hair loss often stems from nutritional deficiencies. Address your diet, focusing on protein-rich foods, vitamins, and minerals. Regular checkups, stress management, and sufficient sleep are crucial. Ayurvedic herbs and oil massages can also promote hair health, improving overall well-being.
Web Summary : बालों का झड़ना अक्सर पोषण की कमी के कारण होता है। अपने आहार पर ध्यान दें, प्रोटीन युक्त खाद्य पदार्थों, विटामिन और खनिजों पर ध्यान केंद्रित करें। नियमित जांच, तनाव प्रबंधन और पर्याप्त नींद महत्वपूर्ण हैं। आयुर्वेदिक जड़ी-बूटियाँ और तेल मालिश भी बालों के स्वास्थ्य को बढ़ावा दे सकती हैं, जिससे समग्र कल्याण में सुधार होता है।