Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > मेथीच्या दाण्यानं केस धुण्याची पाहा योग्य पद्धत, ‘असं’ हवं पाणी-महागड्या शाम्पूंपेक्षा सरस उपाय

मेथीच्या दाण्यानं केस धुण्याची पाहा योग्य पद्धत, ‘असं’ हवं पाणी-महागड्या शाम्पूंपेक्षा सरस उपाय

Methi Water For Hair: केसांना मेथीचं पाणी लावणं हा केसगळती रोखणारा एक फारच चांगला उपाय मानला जातो. सोबतच या पाण्याने इतरही अनेक फायदे मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:33 IST2026-02-24T09:54:38+5:302026-02-24T15:33:49+5:30

Methi Water For Hair: केसांना मेथीचं पाणी लावणं हा केसगळती रोखणारा एक फारच चांगला उपाय मानला जातो. सोबतच या पाण्याने इतरही अनेक फायदे मिळतात.

What are the benefits of washing hair with fenugreek water | मेथीच्या दाण्यानं केस धुण्याची पाहा योग्य पद्धत, ‘असं’ हवं पाणी-महागड्या शाम्पूंपेक्षा सरस उपाय

मेथीच्या दाण्यानं केस धुण्याची पाहा योग्य पद्धत, ‘असं’ हवं पाणी-महागड्या शाम्पूंपेक्षा सरस उपाय

Methi Water For Hair: केस आणि त्वचा चमकदार करण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे महागडे प्रॉडक्ट्स मिळतात. पण त्यांचे साइड इफेक्ट्स बघून महिला हल्ली नॅचरल गोष्टींकडे वळल्या आहेत. फार आधीपासून वापरल्या जाणाऱ्या उपायांना पुन्हा एकदा नवीन संजीवनी मिळाली आहे. केसांसाठीचा असाच प्रभावी उपाय म्हणजे मेथीचं पाणी. केसांना मेथीचं पाणी लावणं हा केसगळती रोखणारा एक फारच चांगला उपाय मानला जातो. सोबतच या पाण्याने इतरही अनेक फायदे मिळतात. अशात आपल्याला माहिती असलं पाहिजे की, मेथीच्या पाण्याने केसांना काय फायदे मिळतात आणि हे पाणी कसं तयार करावं. 

मेथीच्या पाण्याने केस धुण्याचे फायदे

केस कमी गळतात - नियमितपणे जर मेथीच्या पाण्याने केस धुतले तर केसगळतीची समस्या बरीच दूर होते. कारण या पाण्याने शरीरातील हार्मोन संतुलित होतात, ज्यामुळे केस तुटणंही कमी होतं. मेथीमधील प्रोटीन आणि निकोटेनिकने हेअर फॉलिकल्स मजबूत होतात, ज्यामुळे केसगळती रोखण्यास मदत मिळते. 

कोंडा आणि इन्फेक्शन - मेथीमध्ये बरेच अँटी-फंगल गुण असतात. जे टाळूवर होणारं इन्फेक्शन कमी करतात. तर यातील अँटी-बॅक्टेरिअल गुण कोंड्याची समस्या दूर करण्यास मदत करतात. ज्यामुळे डोकं खाजवणं आणि ड्रायनेसची समस्या दूर होते. मेथीच्या पाण्याने केस धुतल्याने टाळूची त्वचा हेल्दी राहते.

केसांची वाढ होईल - मेथीच्या पाण्याने नियमितपणे केस धुवाल तर केस लांब होण्यासही मदत मिळते. मेथीमध्ये लेसिथिन नावाचं तत्व असतं, जे केसांना आतून पोषण देतं आणि केसांची वाढ वाढवतं. तसेच मेथीच्या पाण्याने केस धुतल्याने ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं. ज्यामुळे नवीन केस येण्यास मदत मिळते.

चमकदार केस - सगळ्यांनाच असं वाटत असतं की, आपले केस नॅचरली चमकदार दिसावेत. अशात मेथीचं पाणी हे डीप हेअर कंडीशनरसारखं काम करतं. मेथीच्या पाण्याने केस धुतल्याने केस मुलायम, चमकदार होतात. केसांचा कोरडेपणाही कमी होतो. इतकंच नाही तर पांढरे केस काळे करण्यासही या पाण्याने मदत मिळते.

कसं बनवाल मेथीचं पाणी? 

मेथीचं पाणी तयार करण्यासाठी १ कप पाणी घ्या. पाण्यात ३ चमचे मेथीचे दाणे टाका आणि रात्रभर भिजत घाला. सकाळी हे दाणे बारीक करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट गाळून पाणी वेगळं काढा. हे पाणी डोक्यावर आणि केसांना लावा. साधारण अर्धा तास तसंच ठेवा. नंतर केस साध्या पाण्याने किंवा माइल्ड शाम्पूने धुवून घ्या. आपल्याला काही दिवसांमध्ये फरक दिसून येईल. 

Web Title : मेथी के पानी के फायदे: चमकदार बाल, बालों का गिरना कम, आसान तैयारी।

Web Summary : मेथी का पानी बालों का गिरना, रूसी कम करता है और बालों के विकास को बढ़ावा देता है। प्रोटीन और लेसिथिन से भरपूर, यह रोम को मजबूत करता है, बालों को कंडीशन करता है और परिसंचरण में सुधार करता है। मेथी के बीज रात भर भिगोकर, पेस्ट बनाकर, छानकर बालों पर लगाएं और फिर धो लें।

Web Title : Fenugreek water benefits: Shiny hair, reduces hair fall, easy preparation.

Web Summary : Fenugreek water combats hair fall, dandruff, and promotes hair growth. Rich in protein and lecithin, it strengthens follicles, conditions hair, and improves circulation. Prepare by soaking fenugreek seeds overnight, grinding into paste, straining, and applying to hair before washing.