Alum Water For Hair : केस निरोगी ठेवण्यासाठी महागडी हेअर केअर प्रॉडक्टच वापरावी असं अजिबात नाही. कारण प्रत्येक वेळी महाग आणि दर्जेदार वाटणारी उत्पादने तुमच्या केसांच्या समस्या दूर करतीलच, याची खात्री नसते. त्यातच हिवाळ्यात आधीच त्वचा आणि केस कोरडे व निस्तेज होतात, आणि वरून अशा उत्पादनांचा त्वचेवर योग्य परिणाम होईल की नाही, याबद्दलही शंका असते.
मात्र काही घरगुती उपाय असे आहेत, जे पिढ्यान्पिढ्या वापरले जात असून आजही प्रभावी ठरतात. तुरटी हाही असाच एक उपाय आहे. अनेकांना वाटतं की तुरटी फक्त त्वचेसाठीच वापरली जाते, पण त्वचेसोबतच केसांसाठीही तुरटी खूप फायदेशीर ठरते. या लेखात आपण त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
केसांसाठी तुरटी
तुरटी केवळ त्वचेसाठीच नाही, तर केसांसाठीही अतिशय उपयुक्त मानली जाते. तुरटीमध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात, जे केसांशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. शिवाय तुरटी ही एक नैसर्गिक अॅस्ट्रिंजेंट असल्याने केसांना एकाच वेळी अनेक फायदे मिळतात.
तुरटीच्या पाण्याने केस कसे धुवावेत?
तुरटीचा एक छोटासा तुकडा घ्या आणि तो एका मग पाण्यात नीट विरघळवा. हवे असल्यास तुरटीचा तुकडा फोडून त्याची पावडर करूनही पाण्यात मिसळू शकता. आधी केस सॉफ्ट शाम्पू वापरून धुवा. नंतर स्वच्छ पाण्याने केस धुऊन घ्या. त्यानंतर तुरटीचे पाणी केसांवर ओता. हे पाणी 10 मिनिटे केसांमध्ये राहू द्या. शेवटी स्वच्छ पाण्याने केस नीट धुवा.
तुरटी वापरण्याचे फायदे
फिटकरीमधील अँटीमायक्रोबियल आणि अॅस्ट्रिंजेंट तत्व कोंडा कमी करण्यास मदत करतात आणि केसांच्या मुळांना बळकटी देतात. त्यामुळे कोंडा कमी होतो आणि केस मुळापासून मजबूत होतात. याशिवाय अॅस्ट्रिंजेंट गुणधर्म केसांमधील अतिरिक्त तेलकटपणा व चिकटपणा कमी करतात, ज्यामुळे केस सिल्की, स्मूद होतात आणि त्यांची नैसर्गिक चमकही वाढते.
कोणती काळजी घ्यावी?
- तुरटी वापरण्यापूर्वी तुमची त्वचा अॅलर्जिक नाही ना, याची खात्री करा.
- डोक्यावर फोड, दाणे किंवा जखमा असतील तर तुरटीचा वापर टाळा, कारण यामुळे जळजळ होऊ शकते.
- तुरटीचे पाणी वापरताना डोळे बंद ठेवा, कारण तुरटी डोळ्यांत गेल्यास जळजळ होऊ शकते.
हेअर एक्सपर्ट्सचा सल्ला का महत्त्वाचा?
जर एखाद्या व्यक्तीला केसांशी संबंधित गंभीर समस्या असतील जसे की दीर्घकाळापासून जास्त प्रमाणात केस गळणे, टाळूवर अॅलर्जी, खूप जास्त किंवा जुनाट कोंडा तर अशा वेळी घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घेणेच योग्य ठरते.
