जान्हवी कपूरचा आवडता ड्यूवी मेकअप नक्की असतो कसा ? हे वाचा, आणि करुन पहा.. - Marathi News | We can also do Janhvi Kapoor's favorite Dewey makeup. How is it | Latest sakhi News at Lokmat.com
>ब्यूटी > जान्हवी कपूरचा आवडता ड्यूवी मेकअप नक्की असतो कसा ? हे वाचा, आणि करुन पहा..

जान्हवी कपूरचा आवडता ड्यूवी मेकअप नक्की असतो कसा ? हे वाचा, आणि करुन पहा..

ड्यूवी मेकअप हा लाइट मेकअपचाा प्रकार. त्वचेतला ओलसरपणा जपत  नैसर्गिक सौंदर्य वृध्दिंगत करतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात पानावरचं दव  बघताना जो ओलावा नजरेत भरतो तोच ओलावा आणि चमक हा ड्यूवी मेकअप केल्यानंतर नजरेस भरते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 07:54 PM2021-05-15T19:54:38+5:302021-05-17T15:19:52+5:30

ड्यूवी मेकअप हा लाइट मेकअपचाा प्रकार. त्वचेतला ओलसरपणा जपत  नैसर्गिक सौंदर्य वृध्दिंगत करतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात पानावरचं दव  बघताना जो ओलावा नजरेत भरतो तोच ओलावा आणि चमक हा ड्यूवी मेकअप केल्यानंतर नजरेस भरते.

We can also do Janhvi Kapoor's favorite Dewey makeup. How is it | जान्हवी कपूरचा आवडता ड्यूवी मेकअप नक्की असतो कसा ? हे वाचा, आणि करुन पहा..

जान्हवी कपूरचा आवडता ड्यूवी मेकअप नक्की असतो कसा ? हे वाचा, आणि करुन पहा..

Next
Highlightsज्यांची त्वचा कोरडी असते त्यांना प्रामुख्याने या ड्यूवी मेकअपचा सल्ला दिला जातो. त्वचा ओलसर करणारा हा मेकअप आहे.  ड्यूवी मेकअप करताना दोन तास आधी आपली त्वचा ओलसर करण्यासाठी  भरपूर पाणी पिणं, ज्यूस घेणं किंवा फळ खाणं आवश्यक आहे.ड्यूवी मेकअपसाठी कुशन फाऊंडेशनच वापरावं लागतं. यामुळे ड्यूवी मेकअपचा उद्देश साधला जातो.

धनश्री संखे

अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकताच  इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. तिने केलेल्या मेकअपमुळे तिच्या या फोटोची खूपच चर्चा होऊ लागली  आहे. ओलसर त्वचेवरची नैसर्गिक चमक हे या मेकअपचं वैशिष्ट्य. या मेकअपला   'ड्यूवी मेकअप’ असं म्हणतात.  लाइट मेकअपचा असलेला हा प्रकार त्वचेतला ओलसरपणा जपत  नैसर्गिक सौंदर्य वृध्दिंगत करतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात पानावरचं दव  बघताना जो ओलावा नजरेत भरतो तोच ओलावा आणि चमक हा ड्यूवी मेकअप केल्यानंतर नजरेस भरते.

ड्यूवी मेकअप कसा करावा?

ड्यू म्हणजे मॉश्चराइस. ओलावा.   ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांना प्रामुख्याने या ड्यूवी मेकअपचा सल्ला दिला जातो. त्वचा ओलसर करणारा हा मेकअप आहे. ड्यूवी मेकअपची सुरुवात नैसर्गिक तेलांनी केली जाते.  बदाम तेल, खोबरेल तेल यांचा वापर केला जातो. या मेकअपमधे मॅट फिनीश असलेले कोणतेही घटक नसतात.

- ड्यूवी मेकअप करताना चेहेऱ्याला स्क्रब करणं अतिशय गरजेचं आहे. ओटस पावडरचं स्क्रब वापरु शकता. हार्श स्क्रब वापरु नये. नाहीतर त्वचा कोरडी होते.

- कोणताही मेकअप करताना आधी चेहेरा स्वच्छ करणं ही पहिली पायरी असते. मग चेहेऱ्यावर टोनर आणि मॉश्चराइजर लावून मेकअपची प्राथमिक तयारी करावी लागते. चेहेरा स्वच्छ केल्यावर टोनर लावावं. टोनर म्हणून काकडीचं पाणी किंवा गुलाब पाणी कापसानं लावावं. ते पसरवून लावू नये तर कापसानं ते चेहेऱ्यावर थपथप करत लावावं.

- टोनर नंतर एसपीएफ असलेलं मॉश्चराइजर लावणं गरजेचं असतं. आणि जर मॉश्चराइजर नसेल तर मग खोबरेल तेलाचाही उपयोग करता येतो. मेकअपच्या दोन तास अगोदर  थोडं खोबरेल तेल/ बदाम तेल  हातावर घेऊन चेहेऱ्यावर लावावं. यामुळे त्वचेवर तेज येतं. 

- प्रत्यक्ष मेकअप करताना क्लीनजिंग, टोनिंग मॉश्चरायझिंग करावं. तेलकट त्वचेसाठी जेल मॉश्चरायझर वापरावं आणि कोरडी त्वचा असली तर क्रीम बेस मॉश्चरायजर वापरावं.

- ड्यूवी मेकअप करताना दोन तास आधी आपली त्वचा ओलसर करण्यासाठी  भरपूर पाणी पिणं, ज्यूस घेणं किंवा फळ खाणं आवश्यक आहे. यामुळे त्वचा ओलसर (मॉश्चराइज)  होण्यास मदत होते. त्वचेला आतून चमक येते.

- ड्यूवी मेकअप करताना पहिले प्रायमर लावावं लागतं. प्रायमर महत्त्वाचा आहे कारण मेकअप टिकण्याचा कालावधी वाढतो.   त्वचेवरची रंध्रही कमीत कमी उघडी राहातात. यामुळे चेहेऱ्याची नैसर्गिक चमक उठून दिसते. 

- प्रायमर नंतर फाउंडेशन लावावं लागतं. ड्यूवी मेकअपसाठी कुशन फाऊंडेशनच वापरावं लागतं. तरच ड्यूवी मेकअपचा उद्देश साधला जातो. हेवी नसणारा आणि नैसर्गिक चमक राखणारा मेकअप ही ड्यूवी मेकअपची खासियत . ती प्रत्यक्षात आपल्या चेहेऱ्यावर आणताना कुशन फाउंडेशनचा उपयोग होतो. याचा मेकअप कव्हरेजही चांगला असतो. मेकअप कव्हरेज म्हणजे चेहेऱ्यावरचे डाग, खड्डे हे जास्तीत जास्त या मेकअपखाली झाकले जातात. आणि त्वचा चमकते.

- ड्यूवी मेकअपसाठी क्रीम बेस्ड प्रायमर लावावा. कुशन फाउंडेशनमधेच प्रायमर मिक्स करुन लावला तरी चालतो. कुशन फाउंडेशन लावताना नेहेमी ब्यूटी स्पंजचाच उपयोग करावा. 

-  कन्सिलरची गरज असेल तरच तो फाउंडेशनच्या आधी लावायचा असतो. नाहीतर लावू नये. ड्यूवी मेकअपमधे हेवी कव्हरेज मेकअप नसतो त्यामुळे कन्सिलर हे आवश्यक असेल तरच वापरण्याचा सल्ला दिला जातो.  म्हणजे चेहेऱ्यावर काळे डाग किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळं असतील तरच कन्सिलर वापरावा. नाहीतर ड्यूवी मेकअप करताना तो टाळलेलाच योग्य. पण कन्सिलरचा उपयोग केला तर ते नुसतंच लावायचं नाही तर ट्रान्सल्यूसण्ट पावडर लावून ते फिक्स करावं लागतं आणि मग फाउंडेशन लावावं.

- यानंतर ल्यूमिनायजिंग हायलायटर या मेकअपमधे वापरलं जातं. ल्यूमिनायजिंग हायलायटरमूळे त्वचा एकदम चमकदार दिसते. हे हायलायटरही थेट फाउंडेशनमधे एकत्र करुन लावलं तरी चालतं. 
-डोळ्यांचा मेकअप करताना टिंटेड बाम येतो तो लावावा. मग त्यावर आय मेकअप करावा.त्यात क्रीम आयशॅडो वापराव्या.
- गाल हायलाइट करण्यासाठी ब्ल्शरच्या ऐवजी ब्रॉन्जर वापरावं. यात ल्यूमिनायजिंग ब्रॉन्झी ग्लो पॅलेटस येतात ते वापरावं. ते वेगवेगळ्या जसे पीच, पिंक, ब्राऊन शेडसमधे उपलब्ध असतात.

- लिपस्टीक लावतानाही टिंटेड शेड लिपस्टिक लावावी. किंवा न्यूड लिपस्टिकचा वापर करावा. बाजारात थेट ड्यूवी लिपस्टिकही असतात. पण जर ड्यूवी लिपस्टिक नसतील तर मग टिंटेड किंवा न्यूड लिपस्टिक वापरावी.किंवा जी नेहेमी वापरता त्या लिपस्टिकवर टिंटेड बाम लावू शकता. ड्यूवी मेकअप करताना डार्क लिपस्टिक वापरु नये.

- आणि सर्वात शेवटी मेकअप सेट करण्यासाठी सात - आठ इंच अंतरावरुन चेहऱ्यावर फेशिअल मिस्ट स्प्रेकरावा.


(- धनश्री संखे, अल्यूर सलून स्पा आणि मिस अ‍ॅण्ड मिसेस अल्यूर , इंडिया च्या संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष)
- शब्दांकन - माधुरी पेठकर

Web Title: We can also do Janhvi Kapoor's favorite Dewey makeup. How is it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.